मुख्य मजकुरावर जा

Zobah बद्दल बायबलमधील वचने

59 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याशिवाय दावीद त्याच्या स्मारकाची उभारणी करण्यास फरात नदीकडे गेला असता, त्याने सोबाहचा राजा हादादेजर याचा हमाथाच्या परिसरात पराभव केला.

  2. दावीदाने त्याचे एक हजार रथ, सात हजार रथस्वार आणि वीस हजार पायदळ ताब्यात घेतले. परंतु रथाच्या घोड्यांपैकी शंभर घोडे सोडून बाकी घोड्यांच्या नसा कापून टाकल्या.

  3. जेव्हा दिमिष्कातील अरामी लोक सोबाहचा राजा हादादेजरच्या मदतीला आले तेव्हा दावीदाने त्यांच्यातील बावीस हजार जणांना ठार केले.

  4. नंतर त्याने दिमिष्कातील अरामी राज्यात ठाणे बसविले आणि अरामी लोक त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले. दावीद जिथेही गेला, तिथे याहवेहने त्याला विजय दिला.

  5. हादादेजरचे अधिकारी वाहत असलेल्या सोन्याच्या ढाली दावीदाने घेतल्या आणि त्या यरुशलेमात आणल्या.

  6. हादादेजरच्या मालकीची नगरे तिबहाथ व कून येथून दावीद राजाने पुष्कळ कास्य आणले. शलोमोनाने हे नंतर वितळविले व मंदिर बांधण्याच्या कामात कास्याची मोठी टाकी, खांब आणि वेदीवरील यज्ञार्पणांसाठी लागणारी उपकरणे बनविण्याच्या उपयोगात आणले.

  7. हमाथाचा राजा तोऊ याने जेव्हा ऐकले की, दावीदाने सोबाहचा राजा हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे,

  8. जेव्हा अम्मोनी लोकांना समजून आले की, दावीदाला आपण घृणास्पद झालो आहोत, तेव्हा हानून व अम्मोन्यांनी अराम-नहराईम, अराम-माकाह व सोबाह येथून एक हजार तालांत चांदी देऊन सैन्य, रथ व घोडदळ ही भाड्याने आणली.

  9. त्याने भाड्याने बत्तीस हजार रथ व सारथी आणले. तसेच माकाहचा राजा व त्याचे संपूर्ण सैन्य बोलाविले. त्या सैन्याने मेदबा येथे तळ दिला. अम्मोन्यांनी आपल्या नगरातून भरती केलेल्या सैन्यासह तिथे येऊन युद्धासाठी मोर्चा बांधला.

  10. हे ऐकून, दावीदाने संपूर्ण लढाऊ सैन्यासह योआबाला पाठवले.

  11. तेव्हा अम्मोन्यांचे सैन्य बाहेर आले आणि युद्धाच्या तयारीने त्यांच्या नगराच्या दरवाजाजवळ येऊन थांबले, युद्ध करण्यासाठी आलेले राजे एकीकडे मोकळ्या प्रदेशात एकटेच होते.

  12. शत्रूचे सैन्य आपल्यापुढे व मागे आहे हे योआबाला समजले; तेव्हा त्याने इस्राएली सैन्यातून उत्तम योद्धे निवडले व त्यांना अरामी सैन्याशी लढण्यास पाठविले.

  13. बाकीचे सैन्य त्याने आपला भाऊ अबीशाई याच्या हाती दिले आणि त्यांना अम्मोनी लोकांविरुद्ध लढण्यास पाठविले गेले.

  14. योआब म्हणाला, “जर अरामी सैन्य माझ्यावर भारी झाले तर तुम्ही माझी सुटका करावी; परंतु जर अम्मोनी सैन्य तुझ्यावर भारी झाले तर मी तुला सोडविण्यास येईन.

  15. खंबीर व्हा, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या परमेश्वराच्या शहरांसाठी आपण धैर्याने लढू. याहवेहच्या दृष्टीने जे बरे ते याहवेह करतील.”

  16. तेव्हा योआब आणि त्याच्या बरोबरचे सैन्य अराम्यांशी लढण्यास पुढे गेले आणि ते अरामी त्याच्यापुढून पळून गेले.

  17. जेव्हा अम्मोनी सैन्याला समजले की, अरामी सैन्याने पळ काढला आहे, तेव्हा त्यांनी सुद्धा त्याचा भाऊ अबीशाई याच्यापुढून पळ काढून ते शहरात गेले. तेव्हा योआब यरुशलेमास परत गेला.

  18. नंतर अरामी लोकांनी पाहिले इस्राएलकडून त्यांचा पराभव झाला आहे, तेव्हा त्यांनी दूत पाठवून फरात नदीच्या पूर्वेकडून अधिक अरामी सैन्य बोलाविले. हादादेजर राजाचा सेनापती शोफख या सेनेचे नेतृत्व करीत होता.

  19. याविषयी जेव्हा दावीदाला सांगण्यात आले, तेव्हा त्याने सर्व इस्राएली सैन्य एकत्र केले आणि यार्देन नदी पार करून शत्रुसैन्याशी युद्ध सुरू केले. दावीदाने पुन्हा युद्धसीमेची खूण तयार केली व अराम्यांविरुद्ध युद्ध केले.

  20. परंतु अरामी सैन्यांनी इस्राएल समोरून पळ काढला आणि दावीदाने त्यांच्यातील सात हजार रथस्वारांना व चाळीस हजार पायदळांना ठार मारले. त्याने त्यांचा सेनापती शोफख यालाही ठार केले.

  21. जेव्हा हादादेजरच्या जहागीरदारांनी पाहिले की इस्राएलपुढे त्यांचा पराभव झाला, त्यांनी दावीदाशी समेट केला व ते त्याच्या अधीन झाले. यानंतर अरामी लोक पुन्हा कधीही अम्मोन्यांना त्याच्या युद्धामध्ये मदत करण्यास तयार झाले नाही.

  22. नंतर शलोमोन हमाथ-सोबाहकडे गेला आणि ते ताब्यात घेतले

  23. संगीत दिग्दर्शकासाठी. “शूशन एदूथ” कराराची कुमुदिनीच्या चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. हे शिकविण्यासाठी लिहिले गेले आहे. दावीद अराम-नहराईम आणि अराम-झोबाह देशांशी युद्ध करीत असतानाच्या परिस्थितीचा हा उल्लेख आहे. त्याचवेळी सेनापती योआब, क्षार खोर्‍यात परतला, त्याने बारा हजार एदोमाच्या सैनिकांचा नाश केला. हे परमेश्वरा, तुम्ही आमचा त्याग केला, आम्हाला फोडून टाकले आहे; तुम्ही आमच्यावर कोपला आहात—आता आम्हाला पूर्वस्थितीवर आणा!

  24. तुम्ही भूमी कंपित केली आहे आणि तुम्ही तिला दुभंगले आहे; आता तुम्हीच तिला नीटनेटके करा, कारण ती सर्वस्वी हादरली आहे.

  25. तुम्ही आमच्याबाबत अतिशय कठोर झाले आहात; तुम्ही आम्हाला झोकांड्या खावयास द्राक्षारस दिला आहे.