मुख्य मजकुरावर जा

Wicked बद्दल बायबलमधील वचने

724 वचने · 18 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा माझे हृदय दुःखित झाले आणि माझा आत्मा कटुतेने भरून गेला होता,

  2. त्यावेळस मी मूर्ख आणि अज्ञानी होतो; मी तुमच्यापुढे जनावरासारखा होतो!

  3. तरी नेहमी मी तुमच्याबरोबर आहे; तुम्ही माझा उजवा हात धरलेला आहे.

  4. तुमची सल्लामसलत माझे मार्गदर्शन करेल, आणि त्यानंतर गौरवात तुम्ही माझा स्वीकार कराल.

  5. स्वर्गात तुमच्याशिवाय माझे कोण आहे? पृथ्वीवर तुमच्याएवढे प्रिय मला दुसरे कोणीही नाही.

  6. माझे शरीर व माझे हृदय खचेल, तरी परमेश्वर माझ्या हृदयाचे सामर्थ्य असून सर्वकाळचा माझा वाटा आहेत.

  7. जे तुमच्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल; तुमच्याशी विश्वासघात करणार्‍यांना तुम्ही नष्ट करता.

  8. परंतु माझ्यासाठी परमेश्वराच्या सहवासात राहणे खूप सुंदर आहे. मी याहवेह माझे प्रभू यांना आश्रयस्थान केले आहे. जेणेकरून मी तुमच्या सर्व महान कृत्यांची घोषणा करेन.

  9. ते म्हणतात, “सर्व दुष्टांची शिंगे मी तोडून टाकीन, परंतु नीतिमान लोकांची शिंगे उंच करेन.”

  10. हजार लोक तुझ्याजवळ पडले, आणि दहा हजार तुझ्या उजव्या बाजूला पडले, तरी ती संकटे तुझ्या जवळदेखील येणार नाहीत.

  11. तू केवळ आपल्या दृष्टीने निरीक्षण करशील, आणि दुष्टांना केलेली शिक्षा बघशील.

  12. मतिमंद लोकांना त्याचे आकलन होत नाही; मूर्खांना हे समजत नाही की,

  13. दुष्ट लोक गवताप्रमाणे जरी भराभर उगवतात व त्यांची भरभराट होते, तरी त्यांच्यापुढे केवळ अनंतकालचा नाशच आहे.

  14. याहवेह, कुठवर दुष्कर्मी, हे दुष्ट कुठवर जयोत्सव करणार?

  15. ते उन्मत्त शब्दांचा वर्षाव करतात; सर्व दुष्कर्मी बढाईखोरीने भरलेले आहेत.

  16. हे याहवेह, ते तुमच्या लोकांना तुडवितात; तुमच्या वारसांना ते छळतात.

  17. ते विधवा, निर्वासितांचा वध करतात; आणि अनाथांचा जीव घेतात;

  18. ते म्हणतात, “याहवेह पाहत नाहीत; याकोबाचा परमेश्वर लक्ष देत नाही.”

  19. विचार करा, या लोकांमधील मूर्खांनो; निर्बुद्ध्यांनो, तुम्हाला शहाणपण कधी येणार?

  20. ते नद्या आटवून त्यांचे वाळवंट करतात, आणि झरे आटवून त्यांची कोरडी भूमी करतात;

  21. आणि दुष्टांना त्यांच्या पातकाबद्दल शासन करण्यासाठी, त्यांच्या चांगल्या भूमीचे ते क्षारभूमीत रूपांतर करतात.

  22. पुन्हा ते वाळवंटांचे जलमय भूमीत, आणि शुष्क भूमीचे वाहत्या झर्‍यात रूपांतर करतात.

  23. तिथे वस्ती करण्यासाठी त्यांनी भुकेल्यांस आणले, व त्या लोकांनी तिथे वस्ती करून शहरे स्थापित केली.

  24. त्या ठिकाणी त्यांनी शेती केली व आपले द्राक्षमळे लावले, ज्यांची त्यांना भरघोस पिके मिळाली.

  25. त्यांनी त्यांना मोठा आशीर्वाद दिला, त्यांची संख्या अनेक पटीने वाढली, तिथे त्यांच्या गुरांचीही हानी होऊ दिली नाही.