मुख्य मजकुरावर जा

Wicked बद्दल बायबलमधील वचने

724 वचने · 18 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु लोकांची संपत्ती कितीही असली, तरी ते नाशवंत पशूसारखेच आहेत.

  2. ज्यांचा स्वतःवर भरवसा आहे, व जे त्यांच्याशी सहमत आहेत, त्यांचेही असेच होणार. सेला

  3. ते आपल्या कबरांमध्ये मेंढरांप्रमाणे पडून राहतात; मृत्यू त्यांचा मेंढपाळ होईल (प्रातःकाळी नीतिमान लोक प्रभुत्व करतील) त्यांचे देह कबरेत उतरतील, कारण त्यांना कोणताच आधार राहिला नाही.

  4. परंतु परमेश्वर मला मृत्यूच्या सामर्थ्यापासून सोडवतील आणि माझा स्वीकार करतील. सेला

  5. समज नसलेल्या मनुष्याजवळ संपत्ती असली, तरी तो नाशवंत पशूसारखाच आहे.

  6. परंतु परमेश्वर दुष्ट लोकांना उद्देशून म्हणतात: माझ्या नियमांचे पाठांतर करू नका आणि माझा करार आपल्या ओठांनी उच्चारणारा तू कोण?

  7. कारण माझे नियम झुगारून तुम्ही माझी शिस्त अव्हेरली आहे.

  8. तुम्ही एखाद्या चोराला पाहता व त्याला साथ देता आणि तुम्ही व्यभिचाऱ्यांचे भागीदार होता.

  9. तुझी जीभ कपट रचते तुमच्या मुखातून ओंगळ भाषा बोलली जाते.

  10. तुम्ही बसून आपल्या भावाविरुद्ध साक्ष देता आणि आपल्या सख्ख्या भावाची निंदा करता.

  11. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे मासकील. हा त्यावेळचा संदर्भ आहे, ज्यावेळी एदोमी दवेगने शौलाला कळविले की दावीद अहीमेलेखच्या घरी आहे. हे बलवान पुरुषा, दुष्ट कृत्यांची बढाई का मारतोस, तू दिवसभर कशाचा अभिमान बाळगतोस, तू जो परमेश्वराच्या दृष्टीने निंदनीय आहेस?

  12. तू जो फसव्या कृतीत गुंतलेला आहे, दिवसभर तुझी जीभ तीक्ष्ण वस्तर्‍यासारखी विनाशाची योजना करीत असते.

  13. तुला चांगल्यापेक्षा दुष्टपणा, सत्य बोलण्यापेक्षा असत्य अधिक प्रिय आहे. सेला

  14. अगे कपटी जिभे, अपायकारक बोलणे तुला प्रिय आहे!

  15. संगीत दिग्दर्शकासाठी. माहलथवर आधारित, दावीदाचे मासकील. मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर अस्तित्वात नाही.” ते बहकलेले आहेत आणि त्यांची कृत्ये दुष्टच समजावी, कारण सत्कर्म करणारा कोणी नाही.

  16. मानवांमध्ये कोणी समंजस आहे का परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का हे पाहण्यासाठी परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतात.

  17. प्रत्येकजण भटकून गेलेला आहेत; प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे; सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.

  18. दुष्कृत्य करणार्‍यांना हे ठाऊक नाही काय? भाकरी खाण्यासारखे ते माझ्या लोकांना गिळून टाकतील. ते कधीही परमेश्वराला हाक मारत नाहीत.

  19. पण पाहा, जिथे भिण्याचे कारण नव्हते, तिथे ते भयाने भरले. परमेश्वराने त्यांची हाडे विखरून टाकली, ज्यांनी तुमच्याविरुद्ध तळ दिला होता; तुम्ही त्यांची फजिती केली, कारण ते परमेश्वराद्वारे लज्जित झाले आहेत.

  20. दुष्ट लोक जन्मतःच चुकीच्या मार्गांने जातात; गर्भात असतानाच ते लबाड्या करतात.

  21. त्यांचे विष सर्पाच्या विषासारखे आहे, ते कान बंद ठेवणार्‍या नागसर्पांसारखे आहेत,

  22. की गारुडी कितीही कुशल असला, तरी तो गारुड्याचा सूर ऐकणार नाही.

  23. संध्याकाळी ते परत येतात; कुत्र्यांसारखे गुरगुरत हल्ला करण्यास ते नगराभोवती हिंडतात.

  24. ते त्यांच्या तोंडातून काय ओकतात ते पाहा. त्यांच्या तोंडातील शब्द तलवारीसारखे धारदार आहेत आणि ते विचारतात, “आम्हाला कोण ऐकू शकेल?”

  25. तलवारीप्रमाणे ते आपल्या जिभांना धारदार करतात आणि बाणांप्रमाणे तीक्ष्ण असलेल्या कटुशब्दांनी लक्ष्य करतात.