Skip to content

Wicked बद्दल बायबलमधील वचने

724 वचने · 18 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग ते जाऊन इतरांना जाहीर करून सांगतील, ‘मी पाप केले होते, जे सरळ ते मी विकृत केले, परंतु ज्यास मी पात्र होतो ते मला मिळाले नाही.

  2. परमेश्वराने मला त्या मृत्यूच्या गर्तेत जाण्यापासून वाचविले, आणि जीवनाच्या प्रकाशाचा आनंद उपभोगत मी जीवन जगेन.’

  3. “परमेश्वर मानवासाठी या सर्वगोष्टी करतात; दोनदा किंवा तीनदाही ते करीत असतात—

  4. त्याचा जीव त्या गर्तेपासून फिरवितात, यासाठी की जीवनाचा प्रकाश त्याच्यावर उज्वल व्हावा.

  5. परंतु दुष्टाच्या अहंकारामुळे जेव्हा ते लोक आरोळी मारतात तेव्हा परमेश्वर उत्तर देत नाहीत.

  6. खरोखर, परमेश्वर त्यांच्या रिक्त विनंत्या ऐकत नाहीत; सर्वसमर्थ त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत.

  7. धन्य ते लोक, जे दुष्टांच्या मसलतीने चालत नाहीत, किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहत नाहीत, आणि थट्टा करणार्‍यांच्या संगतीमध्ये बसत नाहीत.

  8. पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे, आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो.

  9. ते अशा वृक्षासारखे आहेत जे सतत वाहणार्‍या जलप्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या ऋतूमध्ये फळ देते आणि ज्यांची पाने कोमेजत नाहीत. त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम सिद्धीस जाते.

  10. परंतु दुष्ट तसे नाहीत. ते वार्‍याने उडून जाणार्‍या भुश्यासारखे आहेत.

  11. म्हणून दुष्ट न्यायसभेत, किंवा पापी लोक नीतिमानांच्या सभेमध्ये उभे राहणार नाहीत.

  12. कारण नीतिमानांच्या मार्गावर याहवेह दृष्टी ठेवतात, परंतु दुष्टांचा मार्ग सर्वनाशाकडेच ओढून नेतो.

  13. तुमच्या उपस्थितीत गर्विष्ठ उभे राहू शकत नाही. अनीतीने वागणार्‍या सर्वांचा तुम्हाला वीट आहे.

  14. खोटे बोलणाऱ्यांचा तुम्ही त्यांना नाश करता. खुनी आणि कपटींचा याहवेहला तिरस्कार आहे.

  15. त्यांच्या मुखातून निघालेल्या एकाही शब्दावर विश्वास ठेऊ शकत नाही; त्यांचे हृदय द्वेषाने भरलेले आहे. त्यांचे कंठ उघड्या कबरेप्रमाणे आहे; त्यांच्या जिभेने ते खोटे बोलतात.

  16. परमेश्वर नीतिमान न्यायाधीश आहेत, जे दुष्टाईचा सदैव तिरस्कार करतात.

  17. जे दुष्टपणाचा वेणा देतात, ते उपद्रवाचे गर्भधारण करतात आणि फसवणुकीला जन्म देतात.

  18. जे खड्डा खणतात आणि माती काढून खोल करतात ते स्वतःच त्यांनी खणलेल्या खड्ड्यात पडतात.

  19. त्यांच्या दुष्टाईने त्यांनाच शासन होते; त्यांची हिंसा त्यांच्याच डोक्यावर येऊन बसते.

  20. दुष्ट त्याच्या गर्विष्ठपणामुळे परमेश्वराचा घेतच नाहीत; परमेश्वराचा विचारही त्याच्या मनात येत नाही.

  21. दुष्टाला प्रत्येक प्रयत्नात यश मिळते; तुमच्या नियमांचा तो तिरस्कार करतो. त्याच्या विरोधकांकडे तो तुच्छतेने बघतो.

  22. तो स्वतःशीच म्हणतो, “मला कधीही काही हलवू शकणार नाही.” “मला कोणीही काही इजा करणार नाही,” अशी फुशारकी तो मारतो.

  23. लबाडी व धमक्यांनी त्याचे मुख भरलेले आहे; त्याच्या जिभेखाली उपद्रव आणि दुष्टता आहे.

  24. गावात तो दबा धरून बसतो; गुप्तस्थळी तो निर्दोषाचे रक्त पाडतो. त्याची नजर असहाय्याची शिकार करण्यासाठी टपलेली असते;

  25. तो सिंहासारखा दबा धरून बसतो; तो लाचार लोकांना पकडण्याच्या प्रतिक्षेत असतो; तो दीनांना पकडून आपल्या जाळ्यात ओढत नेतो.