मुख्य मजकुरावर जा

Wicked बद्दल बायबलमधील वचने

724 वचने · 18 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दुष्ट लोक तारणप्राप्तीपासून फार दूर आहेत, कारण ते तुमच्या नियमांचा मुळीच शोध करीत नाहीत.

  2. परंतु जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात, त्यास याहवेह दुष्कर्म्यांबरोबर घालवून देतील. इस्राएलावर शांती असो.

  3. परंतु जेव्हा मी बोलाविले तेव्हा तुम्ही ऐकण्याचे नाकारले, आणि जेव्हा मी माझे हात पुढे केले, तेव्हा कोणीही लक्ष दिले नाही.

  4. कारण तुम्ही माझा सल्ला जुमानला नाही. आणि माझे धमकाविणे स्वीकारले नाहीत,

  5. यामुळेच मी देखील तुमच्या संकटकाळी तुम्हाला हसेन; जेव्हा तुमच्यावर आपत्ती येईल तेव्हा मी चेष्टा करेन—

  6. जेव्हा आपत्ती तुम्हाला वादळासारखी ग्रासून टाकेल, जेव्हा अनर्थ तुम्हाला वावटळीसारखे वाहून नेईल, जेव्हा संकटे आणि त्रास तुम्हाला पूर्णपणे दडपून टाकतील.

  7. “तेव्हा तुम्ही मला हाक माराल, परंतु मी उत्तर देणार नाही; ते माझा शोध करतील, परंतु मी सापडणार नाही,

  8. कारण त्यांनी ज्ञानाचा तिरस्कार केला, आणि याहवेहचे भय धरणे निवडले नाही.

  9. ते माझा सल्ला स्वीकारणार नाहीत; आणि माझ्या दटावणीला झिडकारतील म्हणून,

  10. सुज्ञान तुला दुष्ट माणसांच्या मार्गापासून आणि शब्द विकृत करणार्‍या माणसांपासून दूर ठेवील.

  11. ज्यांनी अंधाराच्या मार्गाने जाण्यासाठी सरळपणाच्या वाटा सोडून दिल्या आहेत,

  12. ज्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो आणि दुष्टांच्या कुटिलपणात जे उल्हासतात,

  13. ज्यांचे मार्ग विकृत आहेत आणि ज्यांच्या वाटा विपरीत आहेत!

  14. सुज्ञान तुला व्यभिचारी स्त्रीपासूनसुद्धा वाचवेल, तिच्या लाडिक बोलण्याने तुला मोहात पाडणार्‍या स्त्रीपासून,

  15. जिने आपला तारुण्यातील सहचारी सोडला आहे, आणि परमेश्वरासमोर केलेल्या कराराकडे दुर्लक्ष केले आहे.

  16. निश्चितच तिच्या घराची वाट मृत्यूकडे नेते आणि तिचे मार्ग मृतांच्या आत्म्यांकडे घेऊन जातात.

  17. तिच्याकडे जाणारा परत येत नाही किंवा जीवनाच्या मार्गावर येत नाही.

  18. कारण दुष्कर्म केल्याशिवाय ते स्वस्थ राहू शकत नाहीत; कोणाला तरी अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप येत नाही.

  19. त्रास देणारा आणि दुष्कर्मी मनुष्य, जो विपरीत गोष्टी बोलत फिरतो,

  20. तो आपले डोळे मिचकावितो, आपल्या पायांनी इशारे करतो, आणि आपल्या हाताच्या बोटांनी खुणावतो.

  21. जो त्याच्या हृदयात फसवणुकीच्या दुष्ट योजना करतो— तो नेहमीच भांडणाला चेतावणी देतो.

  22. म्हणून त्याच्यावर अचानक आपत्ती येईल; अकस्मात त्याचा नाश होईल, त्यावर कोणताही इलाज नसेल.

  23. आशीर्वाद हे नीतिमानाच्या मस्तकावरील मुकुट आहेत, परंतु दुष्ट मनुष्याच्या मुखात हिंसाचार दडलेला असतो.

  24. सात्विक व सरळ जीवन जगणारा निर्भयतेने चालतो, परंतु जो वाकड्या मार्गानी चालतो तो पकडला जाईल.

  25. नीतिमान मनुष्याचे ओठ अनेकांचे पोषण करतात; परंतु मूर्ख लोक विवेकाच्या अभावी नाश पावतात.