मुख्य मजकुरावर जा

Wicked बद्दल बायबलमधील वचने

724 वचने · 18 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नीतिमान आपल्या मित्रांची काळजीपूर्वकरित्या निवड करतो, परंतु दुष्ट लोकांचा मार्ग त्यांनाच बहकवितो.

  2. नीतिमत्ता प्रामाणिक मनुष्याचे रक्षण करते, परंतु दुष्टता पापी मनुष्याचा संपूर्ण विनाश करते.

  3. जो शिक्षण तुच्छ लेखतो, तो त्याचा परिणाम भोगेल, पण जो आज्ञेचा मान राखतो, त्याला चांगले प्रतिफळ मिळेल.

  4. दुष्ट निरोप्या संकटात पडतो, परंतु विश्वासू राजदूत आरोग्य आणतो.

  5. अभिलाषेची तृप्ती जीवाला मधुरता प्रदान करते, परंतु मूर्ख वाईटापासून वळण्याचा तिरस्कार करतात.

  6. अरिष्ट पातक्यांच्या पाठीस लागते, परंतु नीतिमानांना कल्याण हे प्रतिफळ मिळेल.

  7. मूर्खांना पापक्षालन करणे म्हणजे थट्टा वाटते, परंतु नीतिमान लोकांमध्ये सदिच्छा असतात.

  8. दुष्ट माणसे चांगल्या माणसांसमोर, आणि पापी माणसे नीतिमानांच्या द्वारासमोर शरणागती पत्करतील.

  9. वाईट योजना करणारे मार्ग चुकत नाहीत काय? परंतु चांगल्या योजना करणार्‍यांना प्रीती आणि विश्वासूपणा मिळतो.

  10. नीतिमान माणसे मृत्युक्षणीही परमेश्वरात आश्रयस्थान शोधतात. पण जेव्हा संकट येते तेव्हा दुर्जन चिरडले जातात.

  11. नीतिमानाच्या घरात विपुल समृद्धी असते, परंतु दुष्टांची मिळकत विनाश आणते.

  12. याहवेहना दुष्टांच्या अर्पणाचा वीट आहे, पण सात्विक लोकांची प्रार्थना त्यांना आनंद देते.

  13. दुष्टांच्या मार्गाचा याहवेह तिरस्कार करतात, पण जे नीतिमत्तेचा माग धरतात, त्यांच्यावर ते प्रीती करतात.

  14. जे सत्याचा मार्ग सोडतात, कठोर शिक्षा त्यांची वाट पाहते; आणि जे सुधारणेचा तिरस्कार करतील ते मृत्युमुखी पडतील.

  15. याहवेह दुष्टांपासून फारच दूर असतात, पण धार्मिकांच्या प्रार्थना मात्र ते ऐकतात.

  16. जे कोणी गरिबांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करतात, ते जेव्हा आक्रोश करतील तेव्हा त्यांना उत्तर मिळणार नाही.

  17. दुष्ट नीतिमानांसाठी, आणि विश्वासघातकी सरळ लोकांसाठी खंडणी असतो.

  18. अधिक मिळावे यासाठी तो दिवसभर तीव्र इच्छा करतो, परंतु नीतिमान राखून न ठेवता दान देतात.

  19. दुष्टांच्या यज्ञार्पणांचा याहवेहला वीट आहे— तर मग जेव्हा वाईट हेतूने अर्पण आणले जाते ते किती तिरस्करणीय असेल!

  20. दुष्टाच्या मार्गात काटे व पाश असतात; परंतु जे त्यांच्या जिवास जपतात, ते अशा मार्गांपासून दूर राहतात.

  21. मूर्खाचा तुम्ही कुटणीमध्ये भुगा केला, मुसळात त्याला धान्यासारखे भरडले, तरी त्याची मूर्खता तुम्हाला वेगळी करता येणार नाही.

  22. कोणीही पाठलाग करीत नाही, तरी दुष्ट माणसे पळत असतात; पण नीतिमान सिंहासारखे निर्भय असतात.

  23. नियमशास्त्राचा तिरस्कार करणारे दुर्जनांची स्तुती करतात, परंतु ते पालन करणारे, त्यांचा विरोध करतात.

  24. योग्य ते काय आहे हे दुष्टकर्म करणाऱ्यांना समजत नाही, परंतु जे याहवेहचा शोध घेतात, त्यांना ते पूर्णपणे समजते.

  25. जर कोणी माझ्या नियमशास्त्राकडे कानाडोळा केला, तर त्यांच्या प्रार्थनासुद्धा तिरस्करणीय वाटतात.