Skip to content

Vows बद्दल बायबलमधील वचने

136 वचने · 38 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याचे दूध तोडल्यानंतर तिने बालकास लहान असतानाच तिच्याबरोबर घेतले, तसेच तीन वर्षाचा बैल, एक एफा सपीठ आणि द्राक्षारसाचा बुधला घेतला आणि त्याला शिलोह येथे याहवेहच्या मंदिरात आणले.

  2. तू त्यांच्याकडे प्रार्थना करशील आणि ते तुझे ऐकतील, आणि तुझे नवस तू फेडशील.

  3. महासभेत उभा राहून तुमची स्तुती करण्याची प्रेरणा तुमच्याकडूनच येत आहे; तुमचे भय धरणार्‍यांपुढे मी माझे नवस फेडीन.

  4. “परमेश्वराला उपकारस्तुतीचे यज्ञ कर; सर्वोच्च परमेश्वरापुढे आपले नवस फेड,

  5. आणि संकटकाळी माझा धावा कर; मी तुला संकटमुक्त करेन आणि तू माझे गौरव करशील.”

  6. माझ्या परमेश्वरा, मी तुम्हाला नवस केला आहे; मी तुम्हाला उपकारस्तुतीची अर्पणे करेन.

  7. कारण परमेश्वरा, मी तुम्हाला केलेला नवस तुम्ही ऐकला आहे आणि तुमच्या नावाचे भय धरणार्‍यांचे वतन तुम्ही मला दिले आहेत.

  8. म्हणजे मी तुमच्या नावाला सतत धन्यवाद देईन आणि दररोज माझी शपथ पूर्ण करेन.

  9. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे एक स्तोत्र. एक गीत. हे परमेश्वरा, तुमची स्तुती सीयोनेत अपेक्षित आहे; तुम्हाला केलेला नवस तिथे पूर्ण करण्यात येईल.

  10. मी तुमच्या मंदिरात होमार्पणे घेऊन, माझे नवस फेडण्यासाठी येणार आहे—

  11. कारण मी संकटात होतो, तेव्हा माझ्या ओठांनी अभिवचन दिले आणि माझ्या मुखाने मी ते विदित केले.

  12. तुमचे परमेश्वर याहवेह यांना केलेले सर्व नवस तुम्ही फेडा; शेजारच्या प्रत्येक राष्ट्राने त्यांच्यासाठी भेटी आणाव्यात; त्यांच्याबद्दल आदर आणि भीती बाळगावी.

  13. मी याहवेहस केलेले नवस त्यांच्या सर्व लोकांसमक्ष जाहीर रीतीने फेडीन.

  14. याहवेहच्या दृष्टीने, त्यांच्या निष्ठावानांचा मृत्यू अतिशय मोलवान आहे.

  15. हे याहवेह, मी निश्चितच तुमचा सेवक आहे; माझ्या मातेसमान मी देखील तुमची सेवा करेन; मला तुम्ही बंधन मुक्त केले आहे.

  16. मी तुम्हाला उपकारस्तुतीचे अर्पण करेन, आणि याहवेहच्या नामाचा धावा करेन.

  17. मी याहवेहस केलेले नवस त्यांच्या सर्व लोकांसमक्ष जाहीर रीतीने फेडीन.

  18. यरुशलेमात, तुमच्यासमक्ष याहवेहच्या या मंदिराच्या अंगणात ते पूर्ण करेन. याहवेहचे स्तवन करा.

  19. त्याने याहवेहची शपथ घेतली, याकोबाच्या सर्वसमर्थास असा नवस केला:

  20. “मी ना माझ्या घरात प्रवेश करेन अथवा ना अंथरुणात पडेन,

  21. माझ्या डोळ्यास झोप लागू देणार नाही, वा डुलकीही घेणार नाही,

  22. जेव्हापर्यंत याहवेहसाठी मी एक जागा उपलब्ध करीत नाही, याकोबाच्या सर्वसमर्थासाठी एक निवासस्थान बांधत नाही.”

  23. विचार न करता घाईघाईने समर्पण करणे आणि नंतर दिलेल्या शपथांचा विचार करणे, मनुष्यासाठी हा एक सापळा आहे.

  24. राजा लमुवेलची ही नीतिसूत्रे—त्याच्या आईने प्रेरणेने शिकविलेली ही वचने आहेत.

  25. माझ्या मुला ऐक! माझ्या पोटच्या मुला ऐक! माझ्या प्रार्थनांचे मिळालेले उत्तर, अशा माझ्या मुला ऐक!