Skip to content

Vows बद्दल बायबलमधील वचने: Unclassified scriptures relating to

79 वचने · 38 पैलू

Unclassified scriptures relating to बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर याकोबाने नवस केला, “जर परमेश्वर माझ्यासोबत असतील, या प्रवासात माझे रक्षण करतील, मला अन्नपाणी, वस्त्र देतील,

  2. व मला आपल्या पित्याच्या घरी सुखरुपपणे परत आणतील, तर याहवेह माझे परमेश्वर होतील

  3. मीच तुला बेथेलमध्ये भेटलेला परमेश्वर आहे. त्या ठिकाणी तू स्तंभाला तैलाभ्यंग करून शपथ वाहिली होती. आता तू हा देश सोडून आपल्या मायदेशी परत जा.’ ”

  4. किंवा जर कोणता व्यक्ती अविचाराने शपथ घेतो, मग ती शपथ चांगली असो वा वाईट असो, नंतर आपण ती शपथ अज्ञानाने घेतली हे त्याला कळून आले, तेव्हा तो दोषी ठरेल.

  5. जर कोणाला याची जाणीव होते की ते यापैकी कोणत्याही बाबतीत दोषी आहेत, तर त्याने जे पातक केले ते पातक कबूल करावे,

  6. आणि त्यांनी केलेल्या पापांचा दंड म्हणून कळपातील एक मादी कोकरू किंवा शेळी याहवेहला पापार्पण अशी करावी; आणि याजकाने त्यांच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे.

  7. परंतु एखाद्याला याहवेहला कोकरू देणे शक्य नसेल, तर त्याने आपल्या पापांबद्दल दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले, एक पापार्पणासाठी व एक होमार्पणासाठी आणावी.

  8. त्याने ती याजकाकडे आणावी आणि याजकाने प्रथम पापार्पणाचा यज्ञ करावा. त्याने त्या पक्ष्याची मान मुरगळावी, परंतु डोके मानेपासून वेगळे करू नये.

  9. नंतर पापार्पणाचे काही रक्त वेदीभोवती शिंपडावे. बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे; हे पापार्पण होय.

  10. दुसरा पक्षी त्याने विधिपूर्वक होमार्पण म्हणून अर्पावा. अशाप्रकारे याजकाने त्यांच्यासाठी त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल.

  11. “जर होले किंवा पारव्याची पिल्ले आणण्याइतकीही त्याची ऐपत नसेल, तर त्याने एफाचा दहावा भाग उत्तम पीठ आणावे. ते पापार्पण असल्यामुळे त्याने ते जैतुनाच्या तेलात मिश्रित करू नये किंवा त्यावर धूपही ठेवू नये.

  12. त्याने ते याजकाकडे आणावे आणि याजकाने त्यातील मूठभर पीठ घेऊन संपूर्ण पापार्पणाचे अंशात्मक प्रतीक म्हणून याहवेहला इतर अर्पणांचा होम करतात तसे त्याचे वेदीवर होम करावे. हे त्याच्यावतीने पापार्पण होय.

  13. अशारितीने याजकाने त्यांच्या अशा प्रकारच्या कोणत्याही पापांबद्दल प्रायश्चित्त करावे म्हणजे त्यांची क्षमा होईल. अन्नार्पणासंबंधी सांगितल्याप्रमाणे, पापार्पणाचे उरलेले पीठ याजकाचे होईल.”

  14. “अहरोन, त्याचे पुत्र व इस्राएली लोकांना सांग, ‘जर तुमच्यापैकी—इस्राएली लोकांपैकी किंवा इस्राएलात राहणारे विदेशी यापैकी कोणीही—याहवेहला वचनपूर्तीचे किंवा स्वैच्छिक होमार्पण आणले,

  15. तर ते तुमच्यावतीने मान्य होण्यासाठी निर्दोष गोर्‍हा, मेंढा किंवा बोकड यांचेच असावे.

  16. दोष असलेला कोणताही प्राणी अर्पण करू नये, कारण ते तुमच्यावतीने मान्य केले जाणार नाहीत.

  17. याहवेहसाठी कोणी स्वतःच्या गुरांतून किंवा शेरडामेंढरांतून शपथपूर्तीचे किंवा स्वखुशीचे शांत्यर्पण करेल, तर ते मान्य होण्यासाठी ते निर्दोष प्राण्याचेच असावे.

  18. याहवेहला आंधळा, हाड तुटलेला, लुळा किंवा अंगावर मस, इसब अथवा खरूज असलेला असा कोणताही प्राणी अर्पण करू नका. यापैकी काहीही वेदीवर याहवेहला हवन म्हणून अर्पण ठेऊ नका.

  19. तुम्ही एखाद्या गोर्‍ह्याला किंवा मेंढ्याला, एखादा अवयव जास्त वा कमी असेल, तर तो प्राणी स्वखुशीचे अर्पण म्हणून चालेल, पण शपथपूर्तीचे अर्पण म्हणून तो अर्पण करता येणार नाही.

  20. ज्या प्राण्याचे अंडकोश ठेचलेले किंवा चिरडलेले किंवा फाटलेले किंवा कापलेले असेल, त्याचे अर्पण याहवेहला कधीही करू नये. तुमच्या स्वतःच्या देशात असे करू नका.

  21. आणि तुम्ही अशा प्रकारचे प्राणी परराष्ट्रीयांकडून घेऊ नयेत आणि तुमच्या परमेश्वरासाठी अन्नार्पण करू नये. ते तुमच्यावतीने स्वीकारले जाणार नाहीत, कारण ते विकृत आहेत आणि त्यांच्यात दोष आहेत.’ ”

  22. “इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: जो देश मी तुम्हाला तुमच्या वस्तीसाठी देत आहे त्यात तुम्ही प्रवेश कराल

  23. आणि याहवेहसाठी सुवास म्हणून आपली खिल्लारे व गुरे यातून तुम्ही याहवेहसाठी अन्नार्पण कराल, मग ते होमार्पण किंवा यज्ञ असो, विशेष नवस असो किंवा स्वखुशीचे अर्पण किंवा सणाचे अर्पण असो.

  24. अर्पण आणणार्‍याने याहवेहसमोर एक पाव हीन जैतुनाच्या तेलात मळलेल्या बारीक सपिठाचा एका एफाचा दहावा भाग सादर करावा.

  25. होमार्पण किंवा यज्ञासाठी एका कोकराबरोबर, पेयार्पण म्हणून एक पाव हीन द्राक्षारस तयार करावा.