मुख्य मजकुरावर जा

Vows बद्दल बायबलमधील वचने: Of married women void without consent of husbands

7 वचने · 38 पैलू

Of married women void without consent of husbands बद्दल वचने

  1. “तिने नवस केल्यावर किंवा तिच्या ओठांनी अविचाराने शपथ उच्चारली व स्वतःला बांधील केल्यानंतर जर तिने विवाह केला

  2. आणि तिच्या पतीने त्याविषयी ऐकले आणि तिला काही बोलला नाही, तर तिचे नवस किंवा शपथ ज्याने तिने स्वतःला बांधील केले ते तिच्यावर कायम राहील.

  3. पण त्याविषयी ऐकून जर तिच्या पतीने तिला मनाई केली, तर ज्या नवसाने व शपथेने तिने स्वतःला बांधील करून घेतले आहे, ते तो रद्द करतो व याहवेह तिला क्षमा करतील.

  4. “आपल्या पतीबरोबर राहून एखादी स्त्री जर नवस करते किंवा स्वतःला बांधील करून शपथ घेते

  5. आणि तिचा पती त्याविषयी ऐकून तिला काही बोलत नाही किंवा तिला मनाई करीत नाही, तर ज्या नवसांनी व शपथांनी तिने स्वतःला बांधील करून घेतले आहे ते कायम राहतील.

  6. पण त्याविषयी ऐकून जर त्याने ते रद्द केले, तर तिच्या मुखातून आलेले कोणतेही नवस किंवा शपथ कायम राहणार नाहीत. तिच्या पतीने ते रद्द केले आहेत आणि याहवेह तिला क्षमा करतील.

  7. तिचा पती तिने केलेला नवस किंवा स्वतःचा त्याग करण्यासाठी घेतलेली शपथ कायम करेल किंवा रद्द करेल.