मुख्य मजकुरावर जा

Tyre बद्दल बायबलमधील वचने

113 वचने · 47 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग ते तुझ्यासाठी विलाप करून तुला म्हणतील: “ ‘हे प्रसिद्ध शहरा, ज्या तुझ्यात खलाशी लोक वसत होते! ज्या तुला समुद्रातही शक्ती होती, तू व तुझे रहिवासी; तिथे राहत असलेल्या सर्वांना आतंक होतीस त्या तुझा नाश कसा झाला.

  2. आता तुझ्या पतनाच्या दिवशी समुद्रतट कापतात; तू कोसळून पडली म्हणून समुद्रातील द्वीपे भयभीत झाली आहेत.’

  3. मी तुझा भयंकर शेवट करेन आणि तुझे अस्तित्व मी नाहीसे करेन. तुझा शोध घेतला, तरी तू पुन्हा कधीही सापडणार नाहीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

  4. सोरला सांग, तू जी समुद्राच्या प्रवेशद्वाराजवळ वसलेली, अनेक समुद्रतटावर लोकांशी व्यापार करणारी, ‘त्या तुझ्याविषयी सार्वभौम याहवेह म्हणतात: “ ‘अगे सोर, तू म्हणतेस, “मी सौंदर्याने परिपूर्ण आहे.”

  5. उंच समुद्रांवर तुझे राज्य होते; तुला बांधणार्‍यांनी तुझे सौंदर्य पूर्णतेस आणले.

  6. त्यांनी तुझ्या फळ्या सनीरच्या देवदारूच्या बनविल्या; त्यांनी लबानोनचे गंधसरू घेतले आणि डोलकाठी बनविली.

  7. त्यांनी तुझी वल्ही बाशानच्या एला झाडाची बनविली; त्यांनी तुझ्या बैठकी कित्तीम द्वीपातील सुरूच्या लाकडाच्या बनविल्या आणि त्यांना हस्तिदंताने सजविले.

  8. तुझे शीड इजिप्तचे नक्षीदार रेशमी ताग होते ते तुझा झेंडा होते; तुझे छत एलिशाह द्वीपातील निळ्या व जांभळ्या रंगाच्या कापडाचे होते.

  9. “ ‘पर्शिया, लूद आणि पूत व कूशच्या माणसांनी तुझ्या सैन्यात योद्धे म्हणून सेवा केली. त्यांनी त्यांच्या ढाली व शिरटोप तुझ्या भिंतीवर टांगून तुला वैभवी बनविले.

  10. आरवद व हेलेकच्या माणसांनी चहूकडून तुझ्या तटांचे रक्षण केले; गम्मादचे पुरुष तुझ्या बुरुजावर होते. त्यांनी त्यांच्या ढाली तुझ्या भिंतींवर चोहीकडे टांगल्या; त्यांनी तुझे सौंदर्य पूर्णतेस आणले.

  11. “ ‘तुझ्या महान संपत्तीमुळे तार्शीशने तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाच्या मोबदल्यात त्यांनी चांदी, लोखंड, कथील व शिसे दिली.

  12. “ ‘ग्रीस, तूबाल व मेशेख यांनीही तुझ्याबरोबर व्यापार केला; त्यांनी तुझ्या मालाच्या मोबदल्यात मानवप्राणी व कास्याच्या वस्तू दिल्या.

  13. “ ‘बेथ-तोगर्माहचे लोक तुझ्या मालाच्या मोबदल्यात स्वाराचे घोडे, युद्धाचे घोडे आणि खेचरे देत असत.

  14. “ ‘ददानच्या लोकांनी तुझ्याबरोबर व्यापार केला आणि पुष्कळ समुद्रतट तुझे ग्राहक होते; त्यांनी तुला मोबदला म्हणून हस्तिदंत आणि टेंबुरणीचे लाकूड दिले.

  15. “ ‘तुझ्याकडील पुष्कळ उत्पादनांमुळे अरामने तुझ्याबरोबर व्यापार केला; आणि तुझ्या मालाचा मोबदला म्हणून त्यांनी तुला नीलमणी, जांभळ्या तागाचे कापड, नक्षीकाम केलेले कापड, बारीक सूत, प्रवाळ व माणके दिली.

  16. “ ‘यहूदाह व इस्राएलने तुझ्याबरोबर व्यापार केला; आणि तुझ्या मालाचे वेतन म्हणून त्यांनी तुला मिन्नीथचा गहू व मेवा, मध, जैतुनाचे तेल आणि मलम दिले.

  17. “ ‘तुझ्या पुष्कळ उत्पादनांमुळे व महान संपत्तीमुळे दिमिष्कने तुझ्याबरोबर व्यापार केला. त्यांनी तुला हेल्बोनचा द्राक्षारस व झहारची लोकर

  18. आणि यावान येथील खास घडविलेले लोखंड, दालचिनी व वेत या तुझ्या मालाबद्दल इझालच्या द्राक्षारसाची पिंपे त्यांनी तुला देऊ केली.

  19. “ ‘ददान तुझ्याबरोबर व्यापार करून तुला घोड्यावर पसरविण्यासाठी खोगीर देत असे.

  20. “ ‘अरबी लोक व केदारचे सर्व राजपुत्र तुझे ग्राहक होते; त्यांनी तुला कोकरे, एडके व बोकडे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला.

  21. “ ‘शबा आणि रामाहच्या व्यापारांनी तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाचा मोबदला म्हणून त्यांनी तुला सर्वप्रकारचे उत्तम मसाले, मोलवान रत्ने व सोने दिले.

  22. “ ‘हारान, कन्नेह आणि एदेन व शबा, अश्शूर व किलमाद येथील व्यापार्‍यांनी तुझ्याबरोबर व्यापार केला.

  23. तुझ्या बाजारपेठेत त्यांनी सुंदर वस्त्रे, निळे कापड, नक्षीदार काम व दोर्‍यांनी वळवून घट्ट गाठ बांधलेले वेगवेगळ्या रंगाचे गालिचे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला.

  24. “ ‘तार्शीशची जहाजे तुझा माल वाहून तुझी सेवा करीत असत. तू समुद्रावर प्रवास करीत असता तू मालाने भरलेली असे.

  25. सर्व वल्हेकरी जहाज टाकून देतील; नावाडी आणि सर्व खलाशी किनार्‍यावर उभे राहतील.