Tyre बद्दल बायबलमधील वचने: Strength and beauty of its ships
Strength and beauty of its ships बद्दल वचने
त्यांनी तुझ्या फळ्या सनीरच्या देवदारूच्या बनविल्या; त्यांनी लबानोनचे गंधसरू घेतले आणि डोलकाठी बनविली.
त्यांनी तुझी वल्ही बाशानच्या एला झाडाची बनविली; त्यांनी तुझ्या बैठकी कित्तीम द्वीपातील सुरूच्या लाकडाच्या बनविल्या आणि त्यांना हस्तिदंताने सजविले.
तुझे शीड इजिप्तचे नक्षीदार रेशमी ताग होते ते तुझा झेंडा होते; तुझे छत एलिशाह द्वीपातील निळ्या व जांभळ्या रंगाच्या कापडाचे होते.