Tyre बद्दल बायबलमधील वचने: Its second destruction by the Macedonians
Its second destruction by the Macedonians बद्दल वचने
ते तुझ्यासाठी विलाप व शोक करीत असता, ते तुझ्यासाठी विलापगीत गातील: “सोर, जी समुद्रात निःशब्द झाली, तिच्याप्रमाणे अजून कोण आहे?”
म्हणून मी परकीय लोकांना तुझ्याविरुद्ध आणेन, जे राष्ट्रांमध्ये सर्वात क्रूर आहेत; तुझे सौंदर्य व ज्ञान याविरुद्ध ते त्यांची तलवार उपसतील आणि ती तुझ्या चमकत्या वैभवाला भेदून जाईल.
ते तुला खाली गर्तेत आणतील, आणि तिथे समुद्राच्या मधोमध तुझा भयानक मृत्यू होईल.
तुझ्या पुष्कळ पापाने व खोट्या व्यापारामुळे तू तुझी पवित्रस्थाने विटाळलीस. म्हणून तुझ्यातून अग्नी येईल आणि तुला भस्म करेल असे मी केले, आणि सर्व बघणार्यांच्या देखत मी तुला राखेत मिळविले.
सोर व सीदोनवर, आणि त्याच्या सीमेलगत असलेल्या हमाथवरही लागलेली आहे, जरी ते अत्यंत कुशल आहेत.
सोर नगरीने स्वतःसाठी भक्कम गड बांधले आहेत; तिने रुपे धुळीच्या व सोने रस्त्यावरील कचऱ्याच्या राशीप्रमाणे साठवून ठेवले आहे.
परंतु प्रभू तिची सर्व संपत्ती हिरावून घेतील आणि तिची समुद्रावरील शक्ती नष्ट करतील, आणि ती अग्नीत भस्म होईल.