Skip to content

Tyre बद्दल बायबलमधील वचने: Its commerce

17 वचने · 47 पैलू

Its commerce बद्दल वचने

  1. तुम्ही बेटावरील रहिवाशांनो, आणि तुम्ही सीदोनचे व्यापारी, ज्यांना खलाश्यांनी श्रीमंत केले आहे, शांत राहा.

  2. प्रचंड जलाशयावरून शिहोरचे धान्य आले; नाईल नदीकाठापासून कापणी केलेले पीक हे सोरचे उत्पन्न होते, आणि ती राष्ट्रांची बाजारपेठ झाली.

  3. सोरला सांग, तू जी समुद्राच्या प्रवेशद्वाराजवळ वसलेली, अनेक समुद्रतटावर लोकांशी व्यापार करणारी, ‘त्या तुझ्याविषयी सार्वभौम याहवेह म्हणतात: “ ‘अगे सोर, तू म्हणतेस, “मी सौंदर्याने परिपूर्ण आहे.”

  4. “ ‘तुझ्या महान संपत्तीमुळे तार्शीशने तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाच्या मोबदल्यात त्यांनी चांदी, लोखंड, कथील व शिसे दिली.

  5. “ ‘ग्रीस, तूबाल व मेशेख यांनीही तुझ्याबरोबर व्यापार केला; त्यांनी तुझ्या मालाच्या मोबदल्यात मानवप्राणी व कास्याच्या वस्तू दिल्या.

  6. “ ‘बेथ-तोगर्माहचे लोक तुझ्या मालाच्या मोबदल्यात स्वाराचे घोडे, युद्धाचे घोडे आणि खेचरे देत असत.

  7. “ ‘ददानच्या लोकांनी तुझ्याबरोबर व्यापार केला आणि पुष्कळ समुद्रतट तुझे ग्राहक होते; त्यांनी तुला मोबदला म्हणून हस्तिदंत आणि टेंबुरणीचे लाकूड दिले.

  8. “ ‘तुझ्याकडील पुष्कळ उत्पादनांमुळे अरामने तुझ्याबरोबर व्यापार केला; आणि तुझ्या मालाचा मोबदला म्हणून त्यांनी तुला नीलमणी, जांभळ्या तागाचे कापड, नक्षीकाम केलेले कापड, बारीक सूत, प्रवाळ व माणके दिली.

  9. “ ‘यहूदाह व इस्राएलने तुझ्याबरोबर व्यापार केला; आणि तुझ्या मालाचे वेतन म्हणून त्यांनी तुला मिन्नीथचा गहू व मेवा, मध, जैतुनाचे तेल आणि मलम दिले.

  10. “ ‘तुझ्या पुष्कळ उत्पादनांमुळे व महान संपत्तीमुळे दिमिष्कने तुझ्याबरोबर व्यापार केला. त्यांनी तुला हेल्बोनचा द्राक्षारस व झहारची लोकर

  11. आणि यावान येथील खास घडविलेले लोखंड, दालचिनी व वेत या तुझ्या मालाबद्दल इझालच्या द्राक्षारसाची पिंपे त्यांनी तुला देऊ केली.

  12. “ ‘ददान तुझ्याबरोबर व्यापार करून तुला घोड्यावर पसरविण्यासाठी खोगीर देत असे.

  13. “ ‘अरबी लोक व केदारचे सर्व राजपुत्र तुझे ग्राहक होते; त्यांनी तुला कोकरे, एडके व बोकडे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला.

  14. “ ‘शबा आणि रामाहच्या व्यापारांनी तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाचा मोबदला म्हणून त्यांनी तुला सर्वप्रकारचे उत्तम मसाले, मोलवान रत्ने व सोने दिले.

  15. “ ‘हारान, कन्नेह आणि एदेन व शबा, अश्शूर व किलमाद येथील व्यापार्‍यांनी तुझ्याबरोबर व्यापार केला.

  16. तुझ्या बाजारपेठेत त्यांनी सुंदर वस्त्रे, निळे कापड, नक्षीदार काम व दोर्‍यांनी वळवून घट्ट गाठ बांधलेले वेगवेगळ्या रंगाचे गालिचे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला.

  17. “ ‘तार्शीशची जहाजे तुझा माल वाहून तुझी सेवा करीत असत. तू समुद्रावर प्रवास करीत असता तू मालाने भरलेली असे.