Tyre बद्दल बायबलमधील वचने: Proud and haughty
Proud and haughty बद्दल वचने
सर्वसमर्थ याहवेहनी ती योजना केली आहे, तिच्या सर्व वैभवाचा गर्व कमी करण्यासाठी आणि पृथ्वीवर नामांकित असलेल्या सर्वांना नम्र करण्यासाठी.
“मानवपुत्रा, सोरच्या अधिपतीला सांग: सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘आपल्या अंतःकरणातील गर्वाने तू म्हणालास, “मी देव आहे; देवाच्या आसनावर समुद्राच्या हृदयात मी बसतो.” तुला वाटते की तू देवासारखा सुज्ञ आहे, परंतु तू मानव आहेस आणि देव नाही.
तुझे हृदय तुझ्या सौंदर्यामुळे अहंकारी झाले, आणि तुझ्या वैभवामुळे तू तुझ्या ज्ञानाला भ्रष्ट केले. म्हणून मी तुला भूमीवर टाकून दिले; आणि राजांसमोर मी तुला तमाशा असे केले.