Skip to content

Tyre बद्दल बायबलमधील वचने

113 वचने · 47 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सोर व सीदोनवर, आणि त्याच्या सीमेलगत असलेल्या हमाथवरही लागलेली आहे, जरी ते अत्यंत कुशल आहेत.

  2. सोर नगरीने स्वतःसाठी भक्कम गड बांधले आहेत; तिने रुपे धुळीच्या व सोने रस्त्यावरील कचऱ्याच्या राशीप्रमाणे साठवून ठेवले आहे.

  3. परंतु प्रभू तिची सर्व संपत्ती हिरावून घेतील आणि तिची समुद्रावरील शक्ती नष्ट करतील, आणि ती अग्नीत भस्म होईल.

  4. अष्कलोन हे पाहून भयभीत होईल; गाझा वेदनेने कळवळेल, व एक्रोन देखील निराशेने कोमेजून जाईल. गाझा नगरीच्या राजाला ठार करण्यात येईल आणि अष्कलोन नगरी ओसाड होईल.

  5. “खोराजिना, तुला धिक्कार असो! बेथसैदा, तुला धिक्कार असो! कारण जे चमत्कार तुमच्यामध्ये केले ते सोर आणि सीदोनात केले असते, तर त्यांनी गोणपाट नेसून आणि डोक्यात राख घालून केव्हाच पश्चात्ताप केला असता.

  6. परंतु मी तुम्हाला सांगतो, न्यायाचा दिवस तुमच्यापेक्षा सोर व सीदोनला अधिक सुसह्य असेल.

  7. नंतर येशूंनी तो प्रांत सोडला आणि सोर व सीदोन या प्रांतात गेले.

  8. येशूंनी जे सर्वकाही केले होते ते ऐकून, पुष्कळ लोक त्यांच्याकडे यहूदीया, यरुशलेम, इदूमिया, यार्देन नदीपलीकडील प्रदेश, सोर व सीदोन येथून आले होते.

  9. नंतर येशूंनी ते स्थान सोडले आणि ते सोर आणि सीदोन या प्रांतात गेले. ते एका घरात गेले आणि हे कोणाला कळू नये अशी त्यांची इच्छा होती; परंतु त्यांची उपस्थिती लपून राहू शकली नाही.

  10. ते खाली आले आणि एका सपाट मैदानावर उभे राहिले. त्यांच्याभोवती शिष्यांचा मोठा समुदाय आणि यरुशलेम, यहूदीया आणि सोर व सीदोन व उत्तरेकडील समुद्रकिनार्‍यांच्या नगरातूनही आलेले अनेक लोक होते.

  11. तो सोर व सीदोन येथील लोकांबरोबर भांडण करीत होता; ते आता एकत्र झाले आणि त्यांनी त्याच्याबरोबर विशेष भेट ठरविली. राजाचा विश्वासू वैयक्तिक सेवक ब्लस्तचा पाठिंबा मिळविल्यानंतर त्यांनी शांततेची मागणी केली, कारण ही शहरे त्यांच्या अन्नधान्याच्या पुरवठ्यासाठी हेरोद राजाच्या देशावर अवलंबून होती.

  12. जाताना आम्हाला सायप्रस बेट दिसले आणि त्याच्या दक्षिणेकडे जाऊन आम्ही पुढे सीरियातील सोर बंदरात उतरलो, कारण तिथे जहाजातील सामान खाली करावयाचे होते.

  13. तिथे आम्ही शिष्यांना शोधून काढले, मग तिथे त्यांच्याबरोबर आम्ही सात दिवस राहिलो. त्यांनी आत्म्याद्वारे पौलाला यरुशलेमकडे न जाण्याचा आग्रह केला.