मुख्य मजकुरावर जा

The Jews बद्दल बायबलमधील वचने

231 वचने · 158 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि मग तुम्हाला समजेल की मी तुम्हाला हा सावधानतेचा इशारा दिला आहे, जेणेकरून लेवी वंशाशी माझा करार कायम राहील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  2. “माझा करार लेवी वंशाशी होता, जीवन आणि शांतीचा करार आणि मी हे सर्व त्याला दिले; हे प्राप्त व्हावे म्हणून आदर करण्याची गरज होती आणि त्याने मला आदर दिला व माझ्या नामाचे भय बाळगले.

  3. सत्याचे शिक्षण त्याच्या मुखात होते व त्याच्या जिभेवर काहीही असत्य असे नव्हते. तो माझ्यासह शांती व नीतिमत्तेत चालला आणि त्याने अनेकांना त्यांच्या पापी जीवनापासून वळविले.

  4. “याजकांच्या ओठात याहवेहसंबंधीचे ज्ञान साठविलेले असावे, कारण तो सर्वसमर्थ याहवेहचा संदेष्टा आहे आणि लोक त्याच्या मुखाद्वारे शिकवण शोधतात.

  5. अहो ढोंग्यांनो! यशायाह संदेष्ट्याने तुमच्या ढोंगीपणाचे अचूक वर्णन केले आहे, तो म्हणतो:

  6. “ ‘हे लोक केवळ त्यांच्या मुखाने माझा सन्मान करतात, पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत.

  7. माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.’ ”

  8. सर्वात शेवटी, त्याने आपल्या पुत्राला त्यांच्याकडे पाठविले व म्हणाला, ‘ते माझ्या पुत्राचा तरी मान राखतील.’

  9. “पण शेतकर्‍यांनी जमीनदारांच्या पुत्राला येताना पाहिले, तेव्हा ते आपसात म्हणाले, ‘हा तर वारस आहे. चला, आपण त्याला ठार मारू या आणि त्याचे वतन घेऊ या.’

  10. त्याप्रमाणे त्यांनी त्याला धरले आणि त्याचा वध करून त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले आणि त्याचा जीव घेतला.

  11. “आता, जेव्हा द्राक्षमळ्याचा धनी येईल, त्यावेळी तेव्हा तो त्या भाडेकर्‍यांचे काय करेल असे तुम्हाला वाटते?”

  12. त्यांनी उत्तर दिले, “तो या दुष्ट लोकांना ठार करेल आणि जे त्याला हंगामाच्या वेळी फळ देतील, अशा दुसर्‍या शेतकर्‍यांना तो द्राक्षमळा भाड्याने देईल.”

  13. येशूंनी त्यांना म्हटले, “धर्मशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय: “ ‘जो दगड बांधणार्‍यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला आहे; प्रभूने हे केले आहे, आणि आमच्या दृष्टीने ते अद्भुत आहे.’

  14. “यास्तव परमेश्वराचे राज्य तुमच्याकडून काढून घेतले जाईल आणि जे लोक फळ देतील त्यांना दिले जाईल.

  15. मी ख्रिस्तामध्ये सत्य बोलतो, असत्य नाही, पवित्र आत्मा माझ्या विवेकबुद्धीला पुष्टी देतो.

  16. माझे अंतःकरण मोठ्या दुःखाने व अविरत पीडेने भरून गेले आहे.

  17. मी माझ्या बंधूंसाठी जे शारीरिक रीतीने माझे स्वजातीय आहेत, त्यांच्यासाठी शापित होऊन ख्रिस्तापासून वेगळे होऊ शकलो असतो तर बरे झाले असते.

  18. आम्ही मोशेसारखे नाही, ज्याने लोप पावत चाललेले वैभव इस्राएली लोकांनी पाहू नये म्हणून आपल्या मुखावर आच्छादन घातले.

  19. परंतु त्यांची मने आता मंद झाली व जुना करार वाचला जात असताना आजही तेच आच्छादन आहे. ते फक्त ख्रिस्तामध्येच दूर केले जाईल.

  20. आज या दिवसापर्यंत जेव्हा मोशेचा ग्रंथ वाचला जातो, तेव्हा त्यांच्या हृदयावर आच्छादन राहते.

  21. परंतु जेव्हा कोणी प्रभूकडे वळतो, त्यावेळी हे आच्छादन काढले जाते.

  22. कारण ते स्वतःच आपली शांती आहेत, त्यांनी दोन गटास एक केले आणि त्यांना विभक्त करणारी शत्रुत्वाची भिंत पाडली. त्यांनी आपल्या देहाने नियमशास्त्राला त्यांच्या आज्ञापालन व विधीसहित दूर केले. यात त्यांचा उद्देश हा होता की या दोघांमधून स्वतःसाठी एक नवा मनुष्य उत्पन्न करून शांती प्रस्थापित करावी.

  23. Having abolished in his flesh the enmity, even the law of commandments contained in ordinances; for to make in himself of twain one new man, so making peace;

  24. कारण त्यांनी क्रूसाद्वारे वैरभाव नाहीसा करून व दोघांना एक शरीर करून परमेश्वराशी समेट घडवून आणला.

  25. कारण बंधू आणि भगिनींनो, यहूदीयामध्ये तुम्ही ख्रिस्त येशूंमध्ये असलेल्या परमेश्वराच्या मंडळ्यांचे अनुकरण करणारे झालात म्हणून स्वतःच्या बांधवांकडून तुम्हाला दुःख सहन करावे लागले, त्याच गोष्टी यहूदी लोकांकडूनही या मंडळ्यांना सहन कराव्या लागल्या.