मुख्य मजकुरावर जा

The Jews बद्दल बायबलमधील वचने: Jacob

8 वचने · 158 पैलू

"The Jews" साठी शोधा

Jacob बद्दल वचने

  1. तेव्हा त्याला एक स्वप्न पडले. त्यात त्याने पृथ्वीवर उभी केलेली व तिचे वरचे टोक स्वर्गाला टेकलेले आहे अशी एक शिडी पाहिली. परमेश्वराचे दूत त्या शिडीवरून वर जाताना व खाली उतरतांना त्याने पाहिले.

  2. शिडीच्या वरच्या टोकाला याहवेह उभे राहून त्यास म्हणाले, “मी याहवेह, तुझा पिता अब्राहाम व इसहाक यांचा परमेश्वर आहे. ज्या भूमीवर तू झोपला आहेस ती मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन.

  3. तुझे गोत्र धुळीच्या कणांइतके वाढतील. ते नेगेव पासून पूर्वेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत विस्तार करतील. तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील.

  4. पाहा, मी तुझ्याबरोबर आहे आणि ज्या ठिकाणी तू जाशील, त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करेन आणि याच भूमीवर तुला सुखरुपपणे परत आणेन. तुला दिलेले अभिवचन पूर्ण होईपर्यंत मी तुझ्याबरोबर सतत राहीन.”

  5. याकोब पद्दन-अराम वरून बेथेल येथे आला तेव्हा परमेश्वराने त्याला पुन्हा एकदा दर्शन देऊन आशीर्वाद दिला.

  6. परमेश्वर त्याला म्हणाले, “तुझे नाव याकोब आहे, पण आता येथून पुढे, तुला याकोब म्हणजे ‘ठक’ असे म्हणणार नाहीत, तर इस्राएल असे म्हणतील.” याप्रकारे त्याला इस्राएल हे नाव देण्यात आले.

  7. परमेश्वर त्याला म्हणाले, “मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे; फलद्रूप हो आणि तुझी संख्या अनेक पटीने वाढो. तुझे एक मोठे राष्ट्र निर्माण व्हावे म्हणून मी तुझी वृद्धी करेन. पुष्कळ राजे तुझ्या वंशजातून उदय पावतील.

  8. अब्राहाम व इसहाक यांना जो देश मी दिला तो मी तुला व तुझ्यानंतर तुझ्या वंशजांना देईन.”