मुख्य मजकुरावर जा

The Jews बद्दल बायबलमधील वचने: Their country trodden under foot by the Gentiles

4 वचने · 158 पैलू

Their country trodden under foot by the Gentiles बद्दल वचने

  1. याहवेह तुमच्यावर दुरून, पृथ्वीच्या सीमेवरून एक राष्ट्र पाठवतील, ते गरुडाप्रमाणे झेप घेऊन तुमच्यावर तुटून पडतील, ते असे राष्ट्र असेल ज्यांची भाषा तुम्हाला समजणार नाही,

  2. ते क्रूर चेहर्‍याचे राष्ट्र असेल, जे तुमच्यातील वृद्धांना आदर देणार नाहीत किंवा तरुणांना दयामाया दाखविणार नाहीत.

  3. तुमचा नाश होईपर्यंत ते तुमच्या गुराचे वत्स व तुमच्या भूमीचा उपज खाऊन टाकतील. तुमचे धान्य, नवीन द्राक्षारस, जैतुनाचे तेल, वासरे आणि कोकरे ही सर्व नाहीशी करून तुमचा पूर्णपणे नाश करतील.

  4. ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालेल आणि तुमचे सर्व उंच व मजबूत तट, ज्यावर तुमची भिस्त आहे, ते पाडून टाकतील. याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या देशातील सर्व शहरांना ते वेढा घालतील.