मुख्य मजकुरावर जा

The Jews बद्दल बायबलमधील वचने: Under God's special protection

9 वचने · 158 पैलू

Under God's special protection बद्दल वचने

  1. सनातन परमेश्वर तुमचा आश्रय आहे, आणि सनातन बाहू तुझ्याखाली आहेत. तुझ्या शत्रूंना ते तुझ्यापुढून घालवून देतात, ‘त्यांचा नाश करा!’ असा ते आदेश देतात.

  2. म्हणून इस्राएल सुरक्षितेत जगेल; याकोबास संरक्षण प्राप्त होईल, धान्य आणि नव्या द्राक्षारसाने समृद्ध असलेल्या आणि आकाशातील जलांच्या दवबिंदूंनी सिंचित होणार्‍या भूमीत तो सुरक्षित राहील.

  3. इस्राएला, तू आशीर्वादित आहेस! इतर कोणत्या लोकांना याहवेहने वाचविले आहे काय? तेच तुझी ढाल व तुझे साहाय्य आहेत आणि तुझ्या वैभवाची तलवार आहेत. तुझे शत्रू तुझ्यापुढे थरथर कापतील, आणि तू त्यांची उच्च स्थाने पायाखाली तुडवशील!”

  4. ते एका देशातून दुसर्‍या देशात, एका राज्यातून दुसर्‍या राज्यात भटकत असताना,

  5. याहवेहने कोणा मनुष्याला त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; त्यांच्याकरिता त्यांनी राजांना दटाविले:

  6. “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका; माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.”

  7. ते तुझा पाय कदापि घसरू देणार नाहीत; तुझे रक्षक डुलकीही घेत नाही.

  8. खरोखर जे इस्राएलचे रक्षक आहेत ते झोपी जात नाहीत किंवा डुलकीही घेत नाहीत.

  9. याहवेह स्वतः तुझे रक्षण करतात— याहवेह तुझ्या उजव्या हाताजवळ सावलीसारखे आहेत.