मुख्य मजकुरावर जा

The Jews बद्दल बायबलमधील वचने: Obliged to unite against enemies

51 वचने · 158 पैलू

Obliged to unite against enemies बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, “जर तुम्ही हे कराल, म्हणजे जर तुम्ही याहवेहसमोर युद्धासाठी स्वतःला हत्यारबंद कराल

  2. आणि याहवेह आपल्या शत्रूंना आपल्यासमोरून घालवून देईपर्यंत तुम्ही सर्व जे हत्यारबंद झालेले आहात, ते याहवेहच्या पुढे यार्देन पार कराल;

  3. तर जेव्हा याहवेहपुढे देश ताब्यात घेतला जाईल, तेव्हा तुम्ही परत जा व याहवेहच्या व इस्राएलच्या कर्तव्यातून तुम्ही मुक्त व्हाल आणि हा देश याहवेहसमोर तुमचे वतन होईल.

  4. तेव्हा दानपासून ते बेअर-शेबापर्यंतचे आणि गिलआदाच्या प्रदेशातून सर्व इस्राएली एकत्र आले आणि मिस्पाह येथे याहवेहसमोर जमा झाले.

  5. इस्राएलाच्या सर्व गोत्रप्रमुखांनी परमेश्वराच्या लोकांच्या सभेत आपले स्थान घेतले, जे तलवारीने सज्ज असलेले चार लाख लोक होते.

  6. (बिन्यामीन लोकांनी ऐकले की इस्राएली लोक वर मिस्पाह येथे गेले आहेत.) जेव्हा इस्राएली लोकांनी म्हटले, “आम्हाला सांग हे दुष्कर्म कसे घडले.”

  7. तेव्हा तो लेवी, ज्या स्त्रीची हत्या करण्यात आली होती तिचा पती म्हणाला, “मी आणि माझी उपपत्नी बिन्यामीनच्या गिबियाह येथे रात्र घालविण्यास आलो.

  8. रात्रीच्या वेळेस गिबियाहतील लोक माझ्यामागे आले आणि घरास वेढा घातला व माझा घात करण्याचा त्यांचा बेत होता. त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला आणि ती मरण पावली.

  9. तेव्हा मी उपपत्नीला घेतले आणि तिच्या शरीराचे कापून बारा तुकडे केले व ते इस्राएलांच्या वारसांच्या सर्व प्रांतात पाठवून दिले, कारण इस्राएलात त्यांनी हे अपवित्र आणि घृणास्पद कृत्य केले.

  10. तर आता इस्राएलांच्या सर्व लोकांनो, बोला आणि तुम्ही कोणता निर्णय घेतला ते मला सांगा.”

  11. सर्व पुरुष एकत्र उठून एकमुखाने म्हणाले, “आपल्यापैकी कोणीही घरी परतणार नाही. नाही, आपल्यापैकी कोणीही त्याच्या घरी परतणार नाही.

  12. पण आता आम्ही हे गिबियाहविषयी करणार: आपण चिठ्ठ्या टाकून त्याच्या क्रमानुसार त्यांच्या विरोधात जाऊ.

  13. आपण इस्राएलाच्या सर्व गोत्रांतून शंभरातून दहा आणि हजारातून शंभर आणि दहा हजारातून एक हजार पुरुष निवडू आणि हे सैन्याकरिता भोजनसामुग्री आणतील. जेव्हा ते सैन्य बिन्यामीनच्या गेबा येथे पोहोचेल, तेव्हा इस्राएलात त्यांनी केलेल्या भयंकर घृणास्पद कृत्याबद्दल शिक्षा करेल.”

  14. अशा रीतीने सर्व इस्राएली लोक एकत्र आले आणि त्यांनी शहराविरुद्ध एकजूट केली.

  15. मग इस्राएली गोत्रांनी, सर्व बिन्यामीन गोत्राकडे दूत पाठवून विचारले, “तुमच्यामध्ये ही भयंकर गोष्ट झाली आहे ती काय आहे?

  16. गिबियाह नगरातील या दुष्कर्म्यांना आमच्या स्वाधीन करा म्हणजे आम्ही त्यांना ठार मारू आणि इस्राएलातील दुष्टता काढून टाकू.” परंतु बिन्यामीन लोक आपल्या इस्राएली भाऊबंदाचे ऐकेनात.

  17. बिन्यामीन वंशज आपल्या नगरातून येऊन ते गिबियाह येथे इस्राएली लोकांविरुद्ध युद्ध करण्यास एकत्र झाले.

  18. बिन्यामीन लोकांनी ताबडतोब आपआपल्या नगरांतून सव्वीस हजार तलवार चालविण्यास निपुण अशी माणसे आणि गिबियाह येथील स्थानिक सातशे कुशल तरुण जमविले.

  19. या सर्व सैनिकांमध्ये सातशे निवडक पुरुष डावखुरे होते. ते एवढे नेमबाज होते की त्यांच्या गोफणीचा नेम केसभरदेखील चुकत नसे.

  20. बिन्यामीन गोत्राला सोडून इस्राएलांच्या सेनेतील तलवार चालविण्यास निपुण पुरुषांची संख्या चार लाख होती, ते सर्व योद्धे होते.

  21. इस्राएली लोक वर बेथेल येथे गेले आणि परमेश्वराशी मसलत केली. ते म्हणाले, “बिन्यामीन लोकांशी लढण्यासाठी आमच्यातील कोण प्रथम वर जाईल?” याहवेहने उत्तर दिले, “यहूदाहने प्रथम जावे.”

  22. इस्राएली लोक दुसर्‍या दिवशी उठले आणि त्यांनी गिबियाहजवळ तळ दिला.

  23. मग इस्राएली लोक बिन्यामीन लोकांशी लढण्यासाठी गेले आणि त्यांनी गिबियाह येथे त्यांच्याविरुद्ध युद्धाची व्यूहरचना केली.

  24. बिन्यामीन लोक गिबियाहतून बाहेर आले आणि त्यांनी त्या दिवशी युद्धभूमीवर इस्राएली लोकांचे बावीस हजार पुरुष ठार केले.

  25. परंतु इस्राएली लोकांनी एकमेकांना प्रोत्साहन दिले आणि पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी मोर्चा दिला होता, दुसर्‍या दिवशी त्याच ठिकाणी पुन्हा मोर्चा दिला.