मुख्य मजकुरावर जा

The Jews बद्दल बायबलमधील वचने: Idolatry

12 वचने · 158 पैलू

Idolatry बद्दल वचने

  1. त्यांनी त्यांच्या उच्च स्थानांमुळे त्यांचा राग भडकविला; त्यांनी मूर्तींद्वारे त्यांना क्रोधाविष्ट केले.

  2. त्यांचे ऐकून परमेश्वराला अत्यंत क्रोध आला, आणि त्यांनी इस्राएलला पूर्णपणे नाकारले.

  3. त्यांनी मानवांमध्ये वस्ती केली होती, त्या शिलोह येथील निवासमंडपाचा त्यांनी त्याग केला,

  4. त्यांनी आपला कोश बंदिवासात जाऊ दिला, त्यांनी आपले वैभव शत्रूंच्या हाती पडू दिले.

  5. त्यांनी आपल्या लोकांना तलवारीच्या स्वाधीन केले, वतनावरचा त्यांचा क्रोध अनावर झाला होता.

  6. त्यांचे तरुण अग्नीने खाऊन टाकले; त्यांच्या कन्यांना विवाहगीते लाभलीच नाही.

  7. याजकांचा तलवारीने वध केला आणि त्यांच्या विधवांना रडण्याची संधी मिळालीच नाही.

  8. हे लोक, जे मला सतत चिरडीस आणतात, माझ्यासमक्ष माझा अपमान करतात. बागांमध्ये अर्पणे वाहतात आणि विटांनी बांधलेल्या वेदीवर धूप जाळतात;

  9. जे कबरांच्या मध्ये जाऊन बसतात आणि गुप्तते मध्ये जागरण करण्यात रात्र घालवितात; जे डुकरांचे मांस खातात, आणि त्यांच्या भांड्यात निषिद्ध मांसाचा रस्सा असतो;

  10. जे म्हणतात, ‘दूर हो; माझ्याजवळ येऊ नकोस, कारण मी तुझ्याहून अधिक पवित्र आहे!’ असे लोक माझ्या नाकातील धूर आहेत, एक अग्नी, जो संपूर्ण दिवस जळत असतो.

  11. “पाहा, ते माझ्यासमोर लिहून ठेवलेले आहे: मी शांत राहणार नाही, पण त्याची पूर्णपणे परतफेड करेन; तुमच्या पापांचे व तुमच्या पूर्वजांच्या पापांचेही, प्रतिफळ त्यांच्या मांडीवर मोजून टाकेन,” असे याहवेह म्हणतात. “कारण त्यांनी पर्वतांवर धूप जाळला आणि टेकड्यांवर माझा अपमान केला. मी त्यांच्या पूर्वीच्या दुष्कृत्यांचे पुरेपूर वेतन त्या मापाने त्यांच्या मांडीवर टाकेन.”

  12. Your iniquities, and the iniquities of your fathers together, saith the LORD, which have burned incense upon the mountains, and blasphemed me upon the hills: therefore will I measure their former work into their bosom.