मुख्य मजकुरावर जा

The Jews बद्दल बायबलमधील वचने: Following practices of others

9 वचने · 158 पैलू

Following practices of others बद्दल वचने

  1. ज्या भूमीत तुम्ही राहणार आहात तेथील राष्ट्रांचा याहवेह तुमचे परमेश्वर नाश करतील. मग त्यांना तिथून घालवून दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी वस्ती करावी,

  2. आणि तुमच्यासमोर ते नष्ट झाल्यानंतर, तुम्ही त्यांच्या दैवतांची चौकशी कराल “ही राष्ट्रे त्यांच्या दैवतांची उपासना कशी करीत होती? आपणही तसेच करावे,” तसे करण्याचा तुम्हाला मोह होईल, तेव्हा त्यांच्या दैवतांच्या मोहात अडकू नये याची खबरदारी घ्या.

  3. त्यांच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची उपासना कदापि करू नये, कारण त्यांच्या दैवतांच्या उपासनेमध्ये ते अशी घृणित कृत्ये करतात, ज्यांचा याहवेह तिरस्कार करतात. ते आपल्या पुत्रांना जाळतात आणि कन्यांचा त्यांच्या दैवतांना होम करतात.

  4. जेव्हा तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या वचनदत्त देशात याल, तेव्हा त्या देशात राहणार्‍या राष्ट्रांच्या अमंगळ चालीरीती शिकू नका.

  5. तुमच्यामध्ये आपल्या पुत्राचा किंवा कन्येचा होम करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा किंवा चेटके करणारा, दुष्ट आत्म्यांची मदत घेऊन भविष्य सांगणारा, जादूटोणा करणारा,

  6. अथवा वशीकरण करणारा, अथवा कोणी मध्यस्थ अथवा मृतात्म्यांना बोलावून त्यांच्याशी मसलत करणारा असू नये.

  7. जो कोणी अशी कृत्ये करतो त्याचा याहवेहला तिरस्कार आहे; आणि त्यांच्या या अमंगळ कृत्यांमुळेच त्या राष्ट्रांना याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्यापुढून घालवून देणार आहेत.

  8. तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे निर्दोषपणे चालावे.

  9. जी सर्व राष्ट्रे शकुनमुहूर्त पाहणार्‍यांचे व दैवज्ञांची भाकिते ऐकतात त्या राष्ट्रांचा ताबा तुम्ही घेणार आहात, त्यामधून त्यांना हुसकावून लावा. परंतु याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला अशा गोष्टी करण्याची परवानगी देत नाहीत.