मुख्य मजकुरावर जा

The Jews बद्दल बायबलमधील वचने

231 वचने · 158 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. बांधकाम करीत होते त्यांच्यामागे उभे राहिले. जे कामकरी सामान नेआण करीत, ते आपली लढाईची शस्त्रे एका हातात ठेवून दुसऱ्या हाताने कामे करीत असत.

  2. आपल्या कमरेला तलवारी लटकवून प्रत्येकजण काम करीत असत. मात्र रणशिंग वाजविणारा माझ्याजवळच असे.

  3. मग मी प्रतिष्ठित लोक, अधिकारी आणि इतर लोकांना समजावून सांगितले, “काम इतके मोठे व विस्तृत आहे की त्यामुळे आपण भिंतीशी बांधकाम करीत असताना एकमेकांपासून लांब लांब असतो.

  4. म्हणून तुम्ही रणशिंगाचा आवाज ऐकाल, तेव्हा तुम्ही आम्ही असलेल्या जागी धावत आले पाहिजे आणि आपले परमेश्वर आपल्यासाठी लढतील!”

  5. आम्ही सूर्योदयापासून कामाला सुरुवात करून तारे दिसेपर्यंत करीत असू आणि अर्धे लोक भाले घेऊन नेहमीच असत.

  6. त्यावेळी मी सर्व लोकांना सांगितले, “प्रत्येकाने रात्रीच्या मुक्कामाला यरुशलेमच्या आतच राहावे, म्हणजे ते रात्री पहार्‍याचे व दिवसा तटाच्या बांधकामाचे कार्य करू शकतील.”

  7. त्यांनी त्यांच्या उच्च स्थानांमुळे त्यांचा राग भडकविला; त्यांनी मूर्तींद्वारे त्यांना क्रोधाविष्ट केले.

  8. त्यांचे ऐकून परमेश्वराला अत्यंत क्रोध आला, आणि त्यांनी इस्राएलला पूर्णपणे नाकारले.

  9. त्यांनी मानवांमध्ये वस्ती केली होती, त्या शिलोह येथील निवासमंडपाचा त्यांनी त्याग केला,

  10. त्यांनी आपला कोश बंदिवासात जाऊ दिला, त्यांनी आपले वैभव शत्रूंच्या हाती पडू दिले.

  11. त्यांनी आपल्या लोकांना तलवारीच्या स्वाधीन केले, वतनावरचा त्यांचा क्रोध अनावर झाला होता.

  12. त्यांचे तरुण अग्नीने खाऊन टाकले; त्यांच्या कन्यांना विवाहगीते लाभलीच नाही.

  13. याजकांचा तलवारीने वध केला आणि त्यांच्या विधवांना रडण्याची संधी मिळालीच नाही.

  14. आसाफाचे एक स्तोत्र. हे परमेश्वरा, इतर राष्ट्रांनी तुमच्या वतनावर आक्रमण केले आहे; त्यांनी तुमचे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे, आणि यरुशलेम नगरी नासधुशीचा ढीग झाली आहे.

  15. तुमच्या सेवकांचे मृतदेह उघड्यावर पडून आहेत, ते पक्ष्यांचे भक्ष्य झाले आहेत, तुमच्या भक्तांचे मास वन्यपशूंचा आहार झाला आहे.

  16. त्यांनी लोकांचे रक्त यरुशलेमच्या सभोवती पाण्याप्रमाणे वाहविले आहे, मृतांना पुरण्यासाठी कोणीही जिवंत नाही.

  17. आमच्या शेजार्‍यांसाठी व सभोवती असणार्‍यांसाठी, आम्ही तिरस्काराचे, तुच्छतेचे आणि उपहासाचे पात्र झालो आहोत.

  18. हे याहवेह, किती काळ? तुम्ही आमच्यावर सदासर्वकाळ संतप्त राहाल काय? तुमचा क्रोधाग्नी केव्हापर्यंत पेटलेला राहणार आहे?

  19. अशा राष्ट्रांवर, जी राज्ये तुमची प्रार्थना करण्याचे नाकारतात, जे तुमच्या नावाचा धावा करीत नाहीत; अशा राष्ट्रांवर तुमच्या क्रोधाचा वर्षाव करा.

  20. त्यांनी याकोबाला गिळंकृत केले आहे आणि त्याच्या मातृभूमीचा विध्वंस केला आहे.

  21. ते एका देशातून दुसर्‍या देशात, एका राज्यातून दुसर्‍या राज्यात भटकत असताना,

  22. याहवेहने कोणा मनुष्याला त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; त्यांच्याकरिता त्यांनी राजांना दटाविले:

  23. “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका; माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.”

  24. ते तुझा पाय कदापि घसरू देणार नाहीत; तुझे रक्षक डुलकीही घेत नाही.

  25. खरोखर जे इस्राएलचे रक्षक आहेत ते झोपी जात नाहीत किंवा डुलकीही घेत नाहीत.