मुख्य मजकुरावर जा

Thanksgiving बद्दल बायबलमधील वचने

93 वचने · 57 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परमेश्वराचे आभारी आहोत, कारण पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होता, परंतु आता तुम्हाला जी शिकवण दिली आहे तिचे तुम्ही अंतःकरणापासून आज्ञापालन केले आणि तुम्ही समर्पित आहात.

  2. पण माझ्यामध्ये आणखी एक नियम आढळतो, आणि तो माझ्या मनातील नियमाशी युद्ध करतो आणि मला कैद करतो व मला पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.

  3. मी किती कष्टी मनुष्य! या मृत्यूच्या शरीरापासून मला कोण सोडवेल?

  4. परमेश्वराचा धन्यवाद असो! जे येशू ख्रिस्त आपला प्रभू यांच्याद्वारे मला मुक्त करतात. मी स्वतः माझ्या मनामध्ये परमेश्वराच्या नियमाचा गुलाम, परंतु माझ्या पापी स्वभावात मी पापाच्या नियमाचा दास आहे.

  5. जो कोणी एखादा दिवस विशेष पाळतो तो प्रभूसाठी पाळतो, आणि जो मांस खातो तो प्रभूसाठी खातो; कारण तो परमेश्वराचे आभार मानतो; जो वर्ज्य करतो तो प्रभूकरिता करतो आणि तोही परमेश्वराचे आभार मानतो.

  6. कारण आपल्यातील कोणी स्वतःकरिता जगत नाही आणि कोणी स्वतःकरिता मरत नाही.

  7. ख्रिस्त येशूंमध्ये जी कृपा तुम्हाला दिली, त्याबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.

  8. परंतु आपण परमेश्वराचे आभार मानू, कारण तेच आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय देतात.

  9. परंतु तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हाला मदत करावी. कारण जो कृपेचा अनुग्रह सर्वांच्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून आम्हास मिळाला आहे, त्याबद्दल आमच्यावतीने अनेकजण परमेश्वराची स्तुती करतील.

  10. परंतु परमेश्वराची स्तुती असो! कारण ते आम्हाला ख्रिस्ताच्या विजयोत्सवात आमचे नेत्रृत्व करण्यास आमच्यापुढे चालतात व आम्ही त्यांचे दास असून त्यांच्यामागे चालतो आणि प्रभूंच्या ज्ञानाविषयीचा सुगंध सर्वत्र पसरविण्यासाठी ते आमचा उपयोग करून घेतात.

  11. जशी मला तुमच्याविषयी कळकळ आहे तशीच तीताच्या हृदयात परमेश्वराने उत्पन्न केली आहे, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो.

  12. होय, तुम्ही सर्व दृष्टीने संपन्न व्हावे यासाठी की प्रत्येक प्रसंगी तुम्ही उदारपणे द्यावे व आमच्याद्वारे तुमच्या उदारतेबद्दल परमेश्वराचे आभारप्रदर्शन व्हावे.

  13. परमेश्वराच्या अवर्णनीय देणगीबद्दल त्यांची स्तुती असो.

  14. माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण ठेवून तुम्हासाठी आभार मानण्याचे मी थांबविले नाही.

  15. आपले प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आपले परमेश्वर आणि पिता यांचे प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी उपकार माना.

  16. जेव्हा मला तुमची आठवण होते त्या प्रत्येक वेळी मी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.

  17. आणि आनंदाने माझ्या सर्व प्रार्थनांमध्ये तुमच्या सर्वांसाठी सतत प्रार्थना करतो

  18. कारण पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत शुभवार्तेच्या प्रसारात तुम्ही भागीदार झाला आहात.

  19. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व परिस्थितीत, प्रार्थना व विनवणी करीत, उपकारस्तुतीसह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवा.

  20. आम्ही तुम्हासाठी प्रार्थना करतो त्यावेळी परमेश्वराचे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याचे सतत आभार मानतो,

  21. कारण ख्रिस्त येशूंमध्ये असलेला तुमचा विश्वास, आणि परमेश्वराच्या सर्व लोकांवर असलेली तुमची प्रीती याबद्दल आम्ही ऐकले आहे.

  22. विश्वास व प्रीती यामुळे निर्माण होणारी आशा जी स्वर्गात तुम्हासाठी राखून ठेवली आहे व ज्याबद्दल तुम्ही शुभवार्तेच्या सत्याचा संदेश आधी ऐकला आहे,

  23. ज्या दिवसापासून तुम्ही ती शुभवार्ता ऐकली व परमेश्वराची कृपा तुम्हाला त्याद्वारे समजून आली व तुमच्यामध्येही ती वाढत आहे, त्याचप्रमाणे ती आता जगभर वृद्धिंगत होऊन फळ देत आहे.

  24. त्यांच्यामध्ये मुळावलेले, बांधलेले, तुम्हाला शिकविलेल्या विश्वासात मजबूत असलेले आणि उपकारस्तुतीने भरून वाहणारे असा.

  25. ख्रिस्ताची शांती, तुमच्या अंतःकरणात राज्य करो; कारण एकाच शरीराचे अवयव म्हणून तुम्हीही या शांतीसाठी बोलावलेले आहात. तुम्ही कृतज्ञ राहा.