मुख्य मजकुरावर जा

Thanksgiving बद्दल बायबलमधील वचने

93 वचने · 57 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. एक स्तोत्र. एक गीत. शब्बाथ दिवसासाठी निर्धारित. याहवेहची स्तुती गाणे, आणि हे परात्परा, तुमच्या नावाची गीते गाणे उत्तम आहे.

  2. कृतज्ञ अंतःकरणांनी त्यांच्यापुढे येऊ; आणि वाद्यसंगीतासह स्तुतिस्तोत्रे गाऊन स्तवन करू.

  3. सर्व नीतिमान, याहवेहच्या ठायी आनंद करा, आणि त्यांच्या पवित्र नावाला गौरव द्या.

  4. उपकारस्तुती करीत त्यांच्या द्वारातून आत जा; स्तुती करीत त्यांच्या अंगणात प्रवेश करा; त्यांचे उपकार माना, त्यांच्या नावाला महिमा द्या.

  5. याहवेहचे स्तवन करा, त्यांच्या नावाची घोषणा करा; त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रात जाहीर करा.

  6. याहवेहची स्तुती असो! याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.

  7. याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत; त्यांची दया सनातन आहे.

  8. मी तुम्हाला उपकारस्तुतीचे अर्पण करेन, आणि याहवेहच्या नामाचा धावा करेन.

  9. याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत, त्यांची करुणा सनातन आहे.

  10. देवाधिदेवाचे उपकारस्मरण करा, त्यांची करुणा सनातन आहे.

  11. प्रभूंच्या प्रभूचे आभार माना, त्यांची करुणा सनातन आहे.

  12. हे आमच्या पूर्वजांच्या परमेश्वरा, मी तुम्हाला धन्यवाद देतो व तुमची स्तुती करतो: तुम्हीच मला ज्ञान आणि सामर्थ्य दिले, मी तुम्हाला जे काही मागितले, ते मला ज्ञात करून दिले, तुम्ही आम्हाला राजाचे स्वप्न ज्ञात करून दिले.”

  13. जेव्हा दानीएलला हे फर्मान निघाल्याचे समजले, तेव्हा तो घरी गेला व माडीवर खोलीत गेला. या खोलीच्या खिडक्या यरुशलेमच्या दिशेकडे उघडलेल्या होत्या. आपल्या नित्याच्या रिवाजाप्रमाणे दिवसातून तीन वेळा त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि त्याच्या परमेश्वराचे आभार मानले.

  14. परंतु मी, उपकारस्तुतीच्या जयघोषाने, तुमच्यासाठी यज्ञ अर्पण करेन. मी जो नवस केला होता, तो मी पूर्ण करेन. मी म्हणेन, ‘तारण याहवेहकडून येते.’ ”

  15. त्यावेळी येशूंनी ही प्रार्थना केली, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, स्वतःस ज्ञानी आणि सुज्ञ समजणार्‍या लोकांपासून या गोष्टी गुप्त ठेऊन, त्या तुम्ही लहान बालकांना प्रगट केल्यास म्हणून मी तुमचे आभार मानतो.

  16. त्यांनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला व त्याबद्दल आभार मानले आणि मग तो प्याला त्यांना दिला व म्हणाले, “तुम्ही प्रत्येकजण यामधून प्या;

  17. तेव्हा शिमोनाने बाळाला आपल्या हातात घेतले आणि परमेश्वराची स्तुती करीत म्हटले:

  18. तिने त्यावेळी तिथे येऊन, परमेश्वराची उपकारस्तुती केली आणि जे यरुशलेमची सुटका होण्याची वाट पाहत होते त्या प्रत्येकाला त्या बाळाविषयी सांगू लागली.

  19. परूशी स्वतः उभा राहिला आणि प्रार्थना केली: ‘हे परमेश्वरा, मी तुमचे फार आभार मानतो, कारण मी इतर लोकांसारखा लुटारू, कुकर्मी, व्यभिचारी किंवा या जकातदारासारखा नाही.

  20. मग येशूंनी त्या भाकरी घेतल्या, आभार मानले व जे बसले होते ते खाऊन तृप्त होईपर्यंत वाटल्या. त्यानंतर मासळ्यांचेही त्यांनी तसेच केले.

  21. यास्तव त्यांनी ती धोंड बाजूला केली. मग येशूंनी दृष्टी वर करून म्हटले, “हे पित्या, तुम्ही माझे ऐकले म्हणून मी तुमचे आभार मानतो.

  22. हे म्हटल्यानंतर, मग त्याने भाकर घेऊन सर्वांसमक्ष परमेश्वराचे आभार मानले व ती मोडून खाल्ली.

  23. तेथील बंधुजनांनी आम्ही येणार असे ऐकले आणि ते प्रवास करून अप्पियाची पेठ व तीन उतार शाळा या ठिकाणी आम्हाला येऊन भेटले. त्यांना पाहून पौलाने परमेश्वराचे आभार मानले आणि त्याला प्रोत्साहन प्राप्त झाले.

  24. प्रथम, तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे, म्हणून मी तुम्हा प्रत्येकासाठी येशू ख्रिस्ताद्वारे माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.

  25. परमेश्वराचे ज्ञान त्यांना निश्चित होते, पण त्यांनी परमेश्वर म्हणून त्यांचे गौरव केले नाही अथवा त्यांचे आभारही मानले नाहीत. याउलट त्यांचे विचार पोकळ झाले आणि त्यांची मूर्ख मने अंधाराने व्याप्त झाली.