Jeduthun
हे नावानेही ओळखले जाते: Ethan
Jeduthun चा उल्लेख असलेली वचने
आणि त्यांच्या डावीकडे, मरारी कुळातील सहायक: एथान जो किशीचा पुत्र, जो अब्दीचा पुत्र, जो मल्लूखचा पुत्र,
लेवी लोकांनी योएलचा पुत्र हेमान, बेरेख्याहचा पुत्र आसाफ व मरारी कुटुंबातील कुशायाहचा पुत्र एथान, हे प्रमुख वादक नेमले.
संगीतकार हेमान, आसाफ व एथान यांना कास्याच्या झांजा वाजविण्यासाठी नेमले होते.
तसेच ओबेद-एदोम आणि त्याचे अडुसष्ट नातलग आणि यदूथूनाचा पुत्र ओबेद-एदोम आणि होसाह यांचा द्वारपाल म्हणून समावेश केला.
त्यांच्यासोबत हेमान, यदूथून आणि नावे घेऊन निवडलेल्या इतर अनेकांची नेमणूक केली. या सर्वांना “याहवेहची प्रीती सनातन आहे” अशी त्यांची उपकारस्तुती करण्यासाठी नेमण्यात आले होते.
त्यांच्याबरोबर हेमान आणि यदूथून यांना कर्णे, झांजा व इतर वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती करण्याची जबाबदारी दिली. यदूथूनच्या पुत्रांची द्वारपाल म्हणून नेमणूक करण्यात आली.
दावीद व निवासमंडपाचे अधिकारी यांनी आसाफ, हेमान व यदूथूनच्या काही पुत्रांना सतारी, वीणा व झांजा वाजवून संदेशाची सेवा करण्यासाठी वेगळे केले. त्यांच्या सेवेनुसार त्यांची यादी अशी आहे:
यदूथून व त्याचे पुत्र: गदल्याह, सरी, यशायाह, शिमी, हशब्याह आणि मत्तिथ्याह, सर्व मिळून सहाजण, संदेश देणारे त्यांचे पिता यदूथूनच्या नेतृत्वाखाली वीणा वाजवून याहवेहचे उपकारस्मरण व स्तवन करीत असत.
हे सर्वजण याहवेहच्या मंदिरात आपल्या पित्याच्या नेतृत्वाखाली झांजा, सतारी व वीणा वाजवून परमेश्वराच्या भवनात सेवा करीत असत. आसाफ, यदूथून व हेमान राजाच्या नेतृत्वाखाली कार्य करीत.
सर्व लेवीय जे संगीतकार होते—आसाफ, हेमान, यदूथून आणि त्यांचे पुत्र आणि नातेवाईक—वेदीच्या पूर्व बाजूला उत्तम तागाची वस्त्रे घातलेले आणि झांजा, सारंग्या आणि वीणा वाजवित एकशेवीस याजक उभे राहिले.
हेमानच्या वंशातील: यहीएल आणि शिमी; यदूथूनच्या वंशातील: शमायाह आणि उज्जीएल.
दावीद, आसाफ, हेमान आणि राजाचा संदेष्टा यदूथून त्यांनी नेमून दिल्याप्रमाणे आसाफाचे वंशज जे संगीतकार होते त्यांनी आपआपले स्थान ग्रहण केले. प्रत्येक फाटकावरच्या द्वारपालांना त्यांचे काम सोडण्याची गरज नव्हती, कारण त्यांचे सहकारी लेव्यांनी त्यांच्यासाठी तयारी केली होती.
संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथून याकरिता दावीदाचे स्तोत्र. मी स्वतःशी म्हणालो, “मी आपले आचरण जपणार आणि माझी जीभ पापापासून जपणार; अनीतिमान लोक माझ्याभोवती असतील, तेव्हा मी माझ्या मुखाला मुसक्या बांधीन.”
संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथूनाच्या चालीवर आधारित. दावीदाचे स्तोत्र. परमेश्वरामध्ये निश्चितच माझ्या जिवास विश्रांती आहे; माझे तारण त्यांच्याकडून येते.
संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथूनसाठी. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत. मी परमेश्वराकडे मदतीसाठी धावा केला; परमेश्वराने माझे ऐकावे म्हणून मी त्यांचा धावा केला.