Thanksgiving बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
इस्राएलच्या याहवेह परमेश्वराचे गौरव, स्तुतिगान व त्यांचे उपकारस्मरण करण्याकरिता दावीदाने कोशापुढे सेवा करणार्या काही लेवी लोकांची नेमणूक केली:
त्या दिवसापासून दावीदाने याहवेहची अशा प्रकारे उपकारस्तुती करण्यासाठी आसाफ व त्याचे सहायक नेमले:
दररोज सकाळी याहवेहसमोर उभे राहून ते उपकारस्तुतीचे स्तवनगान करीत असत व संध्याकाळीही ते हीच कामे करीत.
मग कुटुंबप्रमुख, इस्राएल गोत्राचे अधिकारी, हजार सैनिकांचे अधिकारी, आणि शंभर सैनिकांचे अधिकारी, राजाचे शासकीय अधिकारी यांनी स्वेच्छेने दान दिले.
परमेश्वराच्या मंदिराच्या कामासाठी त्यांनी पाच हजार तालांत आणि दहा हजार दारिक सोने, दहा हजार तालांत चांदी, अठरा हजार तालांत कास्य आणि एक लाख तालांत लोखंड दिले.
ज्यांच्याकडे रत्ने होती ती त्यांनी खजिन्यामध्ये जमा करण्यासाठी याहवेहच्या मंदिरातील खजिनदार गेर्षोनी यहीएलकडे सोपविली.
पुढाऱ्यांच्या या स्वेच्छेने दिलेल्या प्रतिसादाने सर्व लोक आनंदित झाले, कारण त्यांनी स्वयंस्फुर्तीने व पूर्ण अंतःकरणाने, आनंदाने याहवेहच्या सेवेला दिले, दावीद राजालाही मोठा आनंद झाला.
दावीदाने सर्व सभेदेखत याहवेहची स्तुती केली, तो म्हणाला, “हे याहवेह परमेश्वरा, आमच्या इस्राएलच्या पित्याच्या परमेश्वरा, अनादि ते अनंतकालापर्यंत तुमची स्तुती असो.
याहवेह, तुमचे सामर्थ्य व महिमा महान आहे; गौरव, वैभव व ऐश्वर्य ही सदासर्वकाळ तुमचीच असो, पृथ्वीवरील व स्वर्गातील सर्वकाही तुमचेच आहे! याहवेह, हे सर्व तुमचेच राज्य आहे; तुमचे प्रभुत्व सर्वांवर आहे.
श्रीमंती व सन्मान तुमच्याकडूनच येतात; तुम्ही सर्व गोष्टीचे शासक आहात. सर्वांना मोठेपणा व सामर्थ्य देण्याकरिता केवळ तुमच्याच बाहूत सामर्थ्य आणि अधिकार आहे.
आता, हे आमच्या परमेश्वरा, आम्ही तुमचे उपकार मानतो, आणि तुमच्या वैभवी नावाची स्तुती करतो.
“परंतु मी कोण, माझी शक्ती आणि माझे लोक कोण, जे तुम्हाला इतक्या उदारतेने दान देऊ शकतील? आमच्याजवळचे सर्वकाही तुमच्याकडूनच मिळालेले आहे आणि तेच आम्ही तुम्हाला देत आहोत.
सर्व लेवीय जे संगीतकार होते—आसाफ, हेमान, यदूथून आणि त्यांचे पुत्र आणि नातेवाईक—वेदीच्या पूर्व बाजूला उत्तम तागाची वस्त्रे घातलेले आणि झांजा, सारंग्या आणि वीणा वाजवित एकशेवीस याजक उभे राहिले.
रणशिंग वाजविणारे आणि संगीतकार याहवेहस्तव एकसुरात स्तुतिगान आणि आभारप्रदर्शन करण्यासाठी सहभागी झाले. कर्णे, झांजा आणि इतर वाद्यांसहित गायकांनी याहवेहची स्तुती करण्यासाठी त्यांचा आवाज उंचाविला व ते गाईले: “ते चांगले आहेत; त्यांचे प्रेम सर्वकाळ टिकते.” तेव्हा याहवेहचे मंदिर मेघांनी भरून गेले,
हिज्कीयाहने याजक आणि लेवी यांची निरनिराळ्या विभागांवर—त्यांच्यातील प्रत्येकाने याजक किंवा लेवी यांनी त्यांना दिलेल्या कार्यानुसार—होमार्पण आणि शांत्यर्पण करण्यासाठी, सेवा करण्यासाठी आणि याहवेहच्या निवासस्थानाच्या फाटकांजवळ उपकारस्तुती आणि स्तुतिगान करण्यासाठी नेमणूक केली.
मत्तन्याह, हा मीखाहचा पुत्र, तो जब्दीचा पुत्र, जो आसाफाचा पुत्र, तो उपकारस्तुतीत व प्रार्थनेत नेतृत्व करणारा प्रमुख होता; बकबुकियाह, त्याच्या सहकाऱ्यातील दुसरा; आणि अब्दा, हा शम्मुवाचा पुत्र, तो गालालचा पुत्र, जो यदूथूनाचा पुत्र होता.
मी यहूदाह पुढार्यांना तटावर नेले. धन्यवाद देण्याकरिता त्यांचे दोन मोठे गायकवृंद तयार केले. स्तुतिस्तोत्रे गात त्या रांगा एकमेकींच्या विरुद्ध दिशेने चालल्या. एक गायकवृंद तटाच्या वर उजवीकडे म्हणजे उकिरडा वेशीकडे चालली.
नंतर धन्यवाद देणारे दोन्ही गायकवृंद परमेश्वराच्या भवनात जाऊन त्यांनी आणि अर्ध्या अधिकाऱ्यांसह मी देखील आपले नेमलेले स्थान ग्रहण केले.
म्हणून हे याहवेह, राष्ट्रांमध्ये मी तुमची थोरवी गाईन; मी आपल्या नावाची स्तुती गाईन.
अहो याहवेहच्या भक्तांनो, त्यांची स्तुतिस्तोत्रे गा, त्यांच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या.
जेणेकरून मी शांत न राहता, माझ्या हृदयाने सदैव तुमची स्तुतिस्तोत्रे गात राहावे. याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी सदासर्वकाळ तुमची प्रशंसा करीतच राहीन.
महासभेत मी तुमचे आभार व्यक्त करेल; मोठ्या मेळाव्यासमोर मी तुमची उपकारस्तुती करेन.
“परमेश्वराला उपकारस्तुतीचे यज्ञ कर; सर्वोच्च परमेश्वरापुढे आपले नवस फेड,
मी परमेश्वराची स्तुती गीत गाऊन करेन आणि उपकारस्तुती करून त्यांचे गौरव करेन.
संगीत दिग्दर्शकासाठी. अल्तश्केथ या चालीवर आधारित. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत हे परमेश्वरा, आम्ही तुमची उपकारस्तुती करतो, तुमची उपकारस्तुती करतो, कारण तुमचे नाव समीप आहे; लोक तुमच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करतात.