Skip to content

Heman

12 वचने · 15 कुटुंब सदस्य

Heman चा उल्लेख असलेली वचने

  1. ज्या पुरुषांनी त्यांच्या पुत्रांसह मिळून सेवा केली त्यांची नावे: कोहाथी पासून: गायक हेमान, जो योएलचा पुत्र, जो शमुवेलाचा पुत्र,

  2. लेवी लोकांनी योएलचा पुत्र हेमान, बेरेख्याहचा पुत्र आसाफ व मरारी कुटुंबातील कुशायाहचा पुत्र एथान, हे प्रमुख वादक नेमले.

  3. संगीतकार हेमान, आसाफ व एथान यांना कास्याच्या झांजा वाजविण्यासाठी नेमले होते.

  4. त्यांच्यासोबत हेमान, यदूथून आणि नावे घेऊन निवडलेल्या इतर अनेकांची नेमणूक केली. या सर्वांना “याहवेहची प्रीती सनातन आहे” अशी त्यांची उपकारस्तुती करण्यासाठी नेमण्यात आले होते.

  5. त्यांच्याबरोबर हेमान आणि यदूथून यांना कर्णे, झांजा व इतर वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती करण्याची जबाबदारी दिली. यदूथूनच्या पुत्रांची द्वारपाल म्हणून नेमणूक करण्यात आली.

  6. दावीद व निवासमंडपाचे अधिकारी यांनी आसाफ, हेमान व यदूथूनच्या काही पुत्रांना सतारी, वीणा व झांजा वाजवून संदेशाची सेवा करण्यासाठी वेगळे केले. त्यांच्या सेवेनुसार त्यांची यादी अशी आहे:

  7. हेमान व त्याचे पुत्र: बुक्कीयाह, मत्तन्याह, उज्जीएल, शबुएल आणि यरिमोथ; हनन्याह, हनानी, अलियाथाह, गिद्दल्ती, रोमामती-एजेर; योश्बेकाशाह, मल्लोथी, होथीर आणि महजिओथ हे होते.

  8. (हे सर्व राजाचा संदेष्टा हेमानचे पुत्र होते. परमेश्वराने दिलेल्या अभिवचनानुसार त्याला हा कर्णा देण्यात आला होता. परमेश्वराने हेमानाला चौदा पुत्र आणि तीन कन्या दिल्या.)

  9. हे सर्वजण याहवेहच्या मंदिरात आपल्या पित्याच्या नेतृत्वाखाली झांजा, सतारी व वीणा वाजवून परमेश्वराच्या भवनात सेवा करीत असत. आसाफ, यदूथून व हेमान राजाच्या नेतृत्वाखाली कार्य करीत.

  10. सर्व लेवीय जे संगीतकार होते—आसाफ, हेमान, यदूथून आणि त्यांचे पुत्र आणि नातेवाईक—वेदीच्या पूर्व बाजूला उत्तम तागाची वस्त्रे घातलेले आणि झांजा, सारंग्या आणि वीणा वाजवित एकशेवीस याजक उभे राहिले.

  11. हेमानच्या वंशातील: यहीएल आणि शिमी; यदूथूनच्या वंशातील: शमायाह आणि उज्जीएल.

  12. दावीद, आसाफ, हेमान आणि राजाचा संदेष्टा यदूथून त्यांनी नेमून दिल्याप्रमाणे आसाफाचे वंशज जे संगीतकार होते त्यांनी आपआपले स्थान ग्रहण केले. प्रत्येक फाटकावरच्या द्वारपालांना त्यांचे काम सोडण्याची गरज नव्हती, कारण त्यांचे सहकारी लेव्यांनी त्यांच्यासाठी तयारी केली होती.