मुख्य मजकुरावर जा

Salvation बद्दल बायबलमधील वचने

158 वचने · 106 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जे विश्वास ठेवतील आणि बाप्तिस्मा घेतील, त्यांचे तारण होईल. पण जे विश्वास ठेवण्यास नकार देतील, ते दंडास पात्र ठरतील.

  2. त्यांनी आपला सेवक दावीदाच्या घराण्यातून आपल्यासाठी तारणाचे शिंग उभारले आहे.

  3. आमच्या शत्रूपासून आणि आमचा द्वेष करणार्‍या सर्वांच्या हातातून आमचा उद्धार करावा,

  4. आमच्या शत्रूंच्या हातून आमची सुटका करावी, आणि समर्थ होऊन निर्भयतेने त्यांची सेवा करावी,

  5. त्यांच्या पापांच्या क्षमेद्वारे, त्याच्या लोकांना तारणाचे ज्ञान देशील.

  6. मी तुमचे तारण माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.

  7. आणि सर्व लोक परमेश्वराचे तारण पाहतील.’ ”

  8. येशू त्याला म्हणाले, “आज या घरात तारणाने प्रवेश केला आहे, हा मनुष्य अब्राहामाचा पुत्र आहे.

  9. त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो, नवीन जन्म झाल्याशिवाय कोणालाही परमेश्वराचे राज्य पाहता येणार नाही.”

  10. जसा मोशेने जंगलात साप उंच केला, त्याचप्रमाणे मानवपुत्रालाही उंच केले जाईल,

  11. जो कोणी त्याजवर विश्वास ठेवेल, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.”

  12. कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.

  13. परमेश्वराने आपल्या पुत्राला या जगामध्ये, जगाला दोष लावण्यासाठी नव्हे तर, त्यांच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले आहे.

  14. आणखी त्याने पुष्कळ शब्दांनी त्यांना इशारा दिला आणि विनवणी करून म्हटले, “या भ्रष्ट पिढीपासून तुम्ही स्वतःला वाचवा.”

  15. तारण दुसर्‍या कोणामध्येही सापडणार नाही, कारण ज्या नावाने आपले तारण होईल, असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मानवजातीमध्ये दिलेले नाही.”

  16. आता परमेश्वराने त्यांना उच्च केले व राजपुत्र आणि तारणारा म्हणून स्वतःच्या उजवीकडे बसविले आहे, ते यासाठी की इस्राएली लोकांना पश्चात्ताप व पापक्षमेचा लाभ व्हावा.

  17. नाही! आमचा विश्वास आहे की प्रभू येशूंच्या कृपेद्वारे आपल्याप्रमाणे त्यांनाही तारण मिळाले आहे.”

  18. ती पौलाच्या आणि आमच्यामागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर परमेश्वराचे सेवक आहेत आणि तारण कसे मिळेल याचा मार्ग हे तुम्हाला सांगत आहेत.”

  19. त्यांनी सांगितले, “प्रभू येशूंवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.”

  20. शुभवार्तेची मला लाज वाटत नाही, कारण त्यावर विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाचे, प्रथम यहूदीयांचे नंतर गैरयहूदीयांचे तारण करण्यास ती परमेश्वराचे सामर्थ्य आहे.

  21. परंतु परमेश्वर आम्हावरील स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण असे देतात की, आम्ही पापी असताना, ख्रिस्त आम्हासाठी मरण पावले.

  22. त्यांच्या रक्ताने आपल्याला नीतिमान ठरविले, तर किती विशेषकरून परमेश्वराच्या सर्व भावी क्रोधापासून त्यांच्याद्वारे आपला उद्धार होईल!

  23. आपण परमेश्वराचे शत्रू असताना, त्यांच्या पुत्राच्या मरणाद्वारे आपला समेट झाला, त्याअर्थी समेट झाल्यानंतर, कितीतरी अधिक त्यांच्या जीवनाद्वारे तारले जाऊ!

  24. आणि या आशेमध्येच आपण तारण पावलो आहोत. जी आशा दृश्य आहे ती आशाच नव्हे. जे काही आहे त्याची आशा कोण धरेल?

  25. “येशू प्रभू आहे,” असे तुम्ही मुखाने जाहीर कराल व परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून उठविले असा तुमच्या अंतःकरणात विश्वास धराल, तर तुमचे तारण होईल.