- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Punishments बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
नंतर दावीदाने बातमी घेऊन आलेल्या मनुष्याला विचारले, “तू कुठला आहेस?” त्याने उत्तर दिले, “मी एका परदेशी मनुष्याचा पुत्र, एक अमालेकी आहे.”
दावीदाने त्याला विचारले, “याहवेहच्या अभिषिक्ताचा नाश करण्यासाठी तुझा हात उचलताना तुला भीती कशी वाटली नाही?”
तेव्हा दावीदाने त्याच्या माणसांतील एकाला बोलाविले आणि म्हटले, “जा, त्याला मारून टाक!” तेव्हा त्याने त्याच्यावर वार केला आणि तो मनुष्य मरण पावला.
कारण दावीद त्याला म्हणाला होता, “तुझ्या रक्ताचा दोष तुझ्याच डोक्यावर असो. जेव्हा तू असे म्हणालास की, ‘मी याहवेहच्या अभिषिक्ताला ठार मारले आहे,’ तुझ्या स्वतःच्या तोंडाने स्वतःविरुद्ध साक्ष दिली आहे.”
तेव्हा दावीदाने त्याच्या माणसांना आज्ञा दिली आणि त्यांनी त्यांना जिवे मारले. त्यांनी त्यांचे हात आणि पाय तोडून टाकले आणि त्यांची शरीरे हेब्रोन येथील तळ्याजवळ टांगली. परंतु त्यांनी इश-बोशेथचे डोके घेतले आणि ते हेब्रोन येथे अबनेरच्या कबरेत पुरले.
दावीद गेला आणि याबेश-गिलआद येथील नागरिकांकडून शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी घेतल्या. (त्यांनी त्यांची शरीरे बेथ-शान नगराच्या चौकातून चोरली होती, जिथे पलिष्ट्यांनी शौलाला गिलबोआत मारून टाकल्यानंतर त्यांना तिथे टांगले होते.)
“तर तू स्वतः समजून घे की जेरुइयाहचा पुत्र योआब माझ्याशी कसा वागला; इस्राएलच्या सैन्याचे दोन सेनापती, नेरचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा यांना त्याने काय केले. त्याने त्यांना जसे युद्धकाळात मारावे तसे शांतीच्या काळात जिवे मारले आणि त्या रक्ताने त्याचा कंबरपट्टा आणि पायतणे डागाळली आहेत.
तुझ्या सुज्ञतेनुसार त्यांचे कर, परंतु त्याचे पिकलेले डोके शांतीने कबरेत जाऊ देऊ नकोस.
“आणि बहूरीम येथील बिन्यामीन गेराचा पुत्र शिमी तुमच्यात आहे हे विसरू नकोस, मी महनाईमकडे जाताना त्या दिवशी ज्याने मला भयंकर शाप दिला होता. पण जेव्हा तो मला यार्देनकडे भेटण्यास आला, तेव्हा ‘मी तुला तलवारीने ठार मारणार नाही’ अशी याहवेहच्या नावाने मी त्याला शपथ दिली होती.
परंतु त्याला निर्दोष समजू नको. तू सुज्ञ व्यक्ती आहेस; त्याचे काय करावे हे तुला कळेल. त्याचे पिकलेले डोके रक्ताळलेले असे कबरेत पाठव.”
तेव्हा शलोमोन राजाने याहवेहची शपथ घेतली: “अदोनियाहने ही जी विनंती केली आहे त्यासाठी त्याचा जीव देऊन त्याने किंमत मोजली नाही तर, परमेश्वर माझे पाहो आणि माझ्याशी अधिक कठोरपणे वागो!
तर आता, ज्यांनी मला माझे पिता दावीदाच्या राजासनावर स्थापित केले आहे आणि त्यांनी वचन दिल्याप्रमाणे माझे घराणे स्थापित केले आहे, ते याहवेह जिवंत आहेत; आज अदोनियाहला जिवे मारले जाईल!”
म्हणून शलोमोन राजाने यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला आज्ञा केली, आणि त्याने अदोनियाहवर वार केला आणि तो मेला.
राजा अबीयाथार याजकाला म्हणाला, “तू अनाथोथ येथे आपल्या शेताकडे परत जा. वास्तविक तू सुद्धा मरण्यास पात्र आहे, परंतु मी तुला आता मारणार नाही, कारण माझे पिता दावीद याच्यासमोर तू सार्वभौम याहवेहचा कोश वाहिला आणि माझे पिता दावीदाच्या सर्व कष्टांमध्ये तू सहभागी होतास.”
म्हणून शलोमोनने अबीयाथारला याहवेहच्या याजकपदावरून काढून टाकले, याप्रकारे एलीच्या घराण्याबद्दल याहवेहने शिलोह येथे बोललेले शब्द पूर्णतेस आले.
जेव्हा योआबाला ही बातमी कळली, तो याहवेहच्या मंडपाकडे पळून गेला आणि वेदीवरील शिंगे धरून राहिला. अबशालोमसोबत तो जरी मिळाला नव्हता तरीही अदोनियाहसोबत त्याने कट रचला होता.
शलोमोन राजाला सांगण्यात आले की योआब याहवेहच्या मंडपात पळून जाऊन वेदीच्या बाजूला आहे. तेव्हा शलोमोनने यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला हुकूम दिला, “जा, त्याच्यावर वार कर.”
तेव्हा बेनाइयाह याहवेहच्या मंडपामध्ये गेला आणि योआबाला म्हणाला, “राजा म्हणतो ‘बाहेर ये!’ ” परंतु त्याने उत्तर दिले, “नाही, मी येथेच मरेन.” तेव्हा बेनाइयाहने राजाला कळवले, “योआबाने मला असे उत्तर दिले.”
तेव्हा राजाने बेनाइयाहला आज्ञा केली, “तो म्हणतो तसे कर. त्याला मारून त्याला गाडून टाक आणि योआबाने विनाकारण रक्त सांडल्याच्या दोषातून मला व माझ्या सर्व कुटुंबाला मुक्त कर.
त्याने केलेल्या रक्तपाताबद्दल याहवेह त्याची परतफेड करतील, कारण माझे पिता दावीदच्या नकळत त्याने दोन माणसांवर हल्ला केला आणि त्यांना तलवारीने ठार केले. ते दोघेजण; इस्राएलच्या सैन्याचा सेनापती नेरचा पुत्र अबनेर आणि यहूदीयाच्या सैन्याचा सेनापती येथेरचा पुत्र अमासा; हे योआबापेक्षा अधिक चांगले आणि सरळ होते.
त्यांच्या रक्ताचा दोष योआबाच्या व त्याच्या वंशजांच्या माथ्यावर सर्वकाळ असो. परंतु दावीद व त्याचे वंशज, त्याचे घराणे आणि त्याचे राजासन यावर याहवेहची शांती सदा असो.”
तेव्हा यहोयादाचा पुत्र बेनाइयाहने जाऊन योआबावर वार केला आणि त्याला मारून टाकले आणि त्याला रानात त्याच्या घरी पुरले.
मग राजाने यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला योआबाच्या जागी सैन्याचा अधिकारी म्हणून आणि अबीयाथाराच्या जागी सादोकला याजक म्हणून नेमले.
नंतर राजाने शिमीला बोलावून सांगितले, “तुझ्यासाठी यरुशलेमात घर बांध आणि तिथे राहा, इतर कुठेही जाऊ नकोस.
ज्या दिवशी तू निघून किद्रोनचे खोरे पार करशील, तेव्हा हे समज की तू खचितच मरशील; आणि तुझे रक्त तुझ्याच माथ्यावर असणार.”