मुख्य मजकुरावर जा

Punishments बद्दल बायबलमधील वचने

133 वचने · 47 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शिमीने राजाला उत्तर दिले, “तुम्ही जे म्हणता ते योग्य आहे. माझे स्वामी जे म्हणतात त्याप्रमाणे आपला सेवक करेल.” आणि शिमी बराच काळ यरुशलेमात राहिला.

  2. परंतु तीन वर्षानंतर, शिमीचे दोन गुलाम, माकाहचा पुत्र आखीश, गथच्या राजाकडे पळून गेले आणि शिमीला सांगण्यात आले, “तुझे गुलाम गथमध्ये आहेत.”

  3. हे ऐकताच, त्याने आपल्या गाढवावर खोगीर घातले आणि त्याच्या गुलामांचा शोध करीत आखीशकडे गथ येथे गेला. शिमीने जाऊन गथवरून आपल्या गुलामांना परत आणले.

  4. जेव्हा शलोमोनला सांगण्यात आले की शिमी यरुशलेमहून गथला गेला होता आणि परत आला आहे.

  5. तेव्हा राजाने शिमीला बोलावून घेतले आणि त्याला म्हटले, “याहवेहसमोर तुझ्याकडून शपथ घेऊन तुला मी चेतावणी दिली नव्हती काय की, ‘तू यरुशलेम सोडून कुठेही जाशील त्या दिवशी खचितच तू मरशील’? त्यावेळी तू मला म्हणालास, ‘तुम्ही जे काही म्हणता ते बरे आहे, मी त्याप्रमाणे करेन.’

  6. तर मग तू याहवेहला दिलेली शपथ आणि मी दिलेली आज्ञा का पाळली नाही?”

  7. पुढे राजा शिमीला म्हणाला, “माझे पिता दावीदाशी तू किती चुकीचा वागला हे तुला तुझ्या मनात ठाऊक आहे. याहवेहच तुला तुझ्या चुकीचा मोबदला देतील.

  8. परंतु शलोमोन राजा आशीर्वादित राहील आणि दावीदाचे राजासन याहवेहसमोर सदा सुरक्षित राहील.”

  9. तेव्हा यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला राजाने आज्ञा दिली आणि त्याने बाहेर जाऊन शिमीवर वार केला आणि तो मेला. आता शलोमोनच्या हातात राज्य प्रस्थापित झाले.

  10. यहूदीयाच्या सैन्याने दहा हजार माणसांनासुद्धा जिवंत पकडले, त्यांना एका कड्याच्या टोकावर नेले आणि तिथून खाली फेकले, त्या सर्वांचे तुकडे झाले.

  11. तुमच्या परमेश्वराची आज्ञा न मानणार्‍यांना आणि राजांचे नियम मोडणार्‍यांना ताबडतोब मृत्यू, हद्दपारी, मालमत्तेची जप्ती, किंवा तुरुंगवास यापैकी कोणतीही शिक्षा द्यावी.

  12. तेव्हा मी त्यांना धमकाविले, त्यांना शाप दिला. काही पुरुषांना मार दिला व त्यांचे केस उपटून परमेश्वराची शपथ घालून त्यांच्याकडून वचन घेतले व म्हटले, “इतःपर तुम्ही आपल्या कन्यांचा त्यांच्या पुत्रांशी वा त्यांच्या कन्यांचा आपल्या पुत्रांशी विवाह करून देणार नाही.

  13. मग राजाच्या खोजापैकी हरबोना नावाचा सेवक म्हणाला, “महाराज, पन्नास हात उंचीचा खांब हामानाच्या घराजवळ उभा करण्यात आला आहे. राजाला मदत करण्यासाठी ज्या मर्दखयाने सूचना दिली होती, त्याला फाशी देण्यासाठी याने तो तयार करवून घेतलेला आहे.” तेव्हा राजा म्हणाला, “त्यावर यालाच फाशी द्या!”

  14. त्याप्रमाणे त्यांनी हामानाला मर्दखयासाठी तयार केलेल्या खांबावर फाशी दिले. तेव्हा राजाचा क्रोध शांत झाला.

  15. कारण ते तर खूपच दुष्ट, आणि दंडास पात्र असे पाप आहे.

  16. इजिप्तींनी योसेफाच्या पायांना खोडे घालून इजा केली, त्याची मान लोखंडी गळपट्ट्यात अडकविली.

  17. निर्दोषांना दंड देणे योग्य नव्हे, तसेच प्रामाणिक अधिपतींना शिक्षा करणे हे निश्चितच चुकीचे आहे.

  18. मूर्खाचा तुम्ही कुटणीमध्ये भुगा केला, मुसळात त्याला धान्यासारखे भरडले, तरी त्याची मूर्खता तुम्हाला वेगळी करता येणार नाही.

  19. जे मला चाबकाचे फटकारे मारतात, त्यांना मी आपली पाठ देऊ केली, जे माझी दाढी उपटतात, त्यांना मी आपले गाल देऊ केले; उपहास करणारे व थुंकणाऱ्यांपासून मी तोंड लपवित नाही.

  20. पशहूराने यिर्मयाह संदेष्ट्याला पकडून फटके मारविले आणि याहवेहच्या मंदिराजवळच्या बिन्यामीन दरवाजाजवळ खोड्यात अडकवून ठेवले.

  21. मग त्यांनी यिर्मयाहला बाहेर काढले व त्याला दोरांच्या साहाय्याने राजपुत्र मल्कीयाह याच्या राजवाड्याच्या आवारातील एका अंधार विहिरीत सोडले; त्यात पाणी नव्हते, पण तळाशी खूप गाळ होता आणि यिर्मयाह त्या गाळात रुतला.

  22. मी आपला ईर्षायुक्त क्रोध तुझ्यावर आणेन आणि संतापाने ते तुझ्याशी वागतील. ते तुझे नाक व कान कापतील आणि तुझ्यातील मागे राहिलेले ते तलवारीने पडतील आणि त्यातूनही जे वाचतील ते अग्नीने भस्म होतील.

  23. त्यावर राजाने ज्योतिषांना उत्तर दिले, “मी हा दृढ निश्चय केले आहे: जर मला ते स्वप्न कोणते आणि त्याचा अर्थ काय हे तुम्ही सांगितले नाहीतर मी तुमचे तुकडे करेन आणि तुमच्या घरादारांचे उकिरडे केले जातील.

  24. जो कोणी दंडवत घालून उपासना करणार नाही, त्याला ताबडतोब अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात येईल.”

  25. तेव्हा राजाने हुकूम दिला आणि दानीएलला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. राजा दानीएलला म्हणाला, “ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस ते तुझी सुटका करो!”