Skip to content

Punishments बद्दल बायबलमधील वचने: Hanging

7 वचने · 47 पैलू

Hanging बद्दल वचने

  1. याहवेहने मोशेला म्हटले, “या लोकांच्या सर्व पुढार्‍यांना घे, त्यांना फासावर टांग व त्यांना दिवसाच्या प्रकाशात याहवेहसमोर उघडे कर, म्हणजे इस्राएलवर पेटलेला याहवेहचा क्रोध शांत होईल.”

  2. जर एखाद्या मनुष्याने असा काही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला ज्याची शिक्षा मृत्युदंड आहे व त्याला मृत्युदंड देण्यात आला आणि त्याला झाडावर टांगण्यात आले असेल,

  3. तर त्याचा मृतदेह रात्रभर तिथे ठेवू नये, तर त्याच दिवशी त्याचे दफन करावे; कारण जो कोणी खांबावर टांगलेला असेल, त्याच्यावर परमेश्वराचा शाप असतो. म्हणून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जो देश वतन म्हणून देत आहे, तो तुम्ही भ्रष्ट करू नये.

  4. यहोशुआने आय शहराच्या राजाचे शव एका झाडाला टांगून ठेवले आणि संध्याकाळपर्यंत ते तसेच सोडून दिले. सूर्यास्ताच्या वेळेस यहोशुआने त्यांना हुकूम केला की, त्याचे शरीर झाडावरून काढा आणि ते खाली नगरवेशीच्या प्रवेशमार्गात फेकून द्यावे. नंतर त्यांनी त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास रचून ठेवली, ती आजपर्यंत राहिली आहे.

  5. दावीद गेला आणि याबेश-गिलआद येथील नागरिकांकडून शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी घेतल्या. (त्यांनी त्यांची शरीरे बेथ-शान नगराच्या चौकातून चोरली होती, जिथे पलिष्ट्यांनी शौलाला गिलबोआत मारून टाकल्यानंतर त्यांना तिथे टांगले होते.)

  6. मग राजाच्या खोजापैकी हरबोना नावाचा सेवक म्हणाला, “महाराज, पन्नास हात उंचीचा खांब हामानाच्या घराजवळ उभा करण्यात आला आहे. राजाला मदत करण्यासाठी ज्या मर्दखयाने सूचना दिली होती, त्याला फाशी देण्यासाठी याने तो तयार करवून घेतलेला आहे.” तेव्हा राजा म्हणाला, “त्यावर यालाच फाशी द्या!”

  7. त्याप्रमाणे त्यांनी हामानाला मर्दखयासाठी तयार केलेल्या खांबावर फाशी दिले. तेव्हा राजाचा क्रोध शांत झाला.