Skip to content

Protection बद्दल बायबलमधील वचने

128 वचने · 57 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. माझ्या पावलांनी तुमचा मार्ग धरला आहेत, माझी पावले कधी घसरली नाहीत.

  2. तुमच्या पंखांच्या छायेखाली तुमच्या डोळ्याच्या बुबुळाप्रमाणे माझे रक्षण करा;

  3. संगीत दिग्दर्शकासाठी; याहवेहचा सेवक दावीदाची रचना. जेव्हा याहवेहने दावीदाला त्याच्या सर्व शत्रूंच्या हातातून आणि शौलाच्या तावडीतून सोडविले, तेव्हा दावीदाने या शब्दात याहवेहसाठी गीत गाईले. तो म्हणाला, याहवेह, माझे सामर्थ्य, माझे तुमच्यावर प्रेम आहे.

  4. याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे; माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो, माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग ते माझे शरणस्थान आहेत.

  5. मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो, तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात; तुमची आकडी व तुमची काठी मला धीर देतात.

  6. कोणताही राजा सैन्याच्या संख्येने विजय प्राप्त करतो असे नाही; कोणताही योद्धा आपल्या महान शक्तीने स्वतःचा बचाव करू शकतो असेही नाही.

  7. युद्धात विजय प्राप्तीसाठी घोड्यावर भिस्त ठेवणे निरर्थक आहे; घोडा बळकट असेल पण तो कोणाचा बचाव करू शकत नाही.

  8. दुष्टांचे सामर्थ्य मोडून टाकले जाईल, परंतु याहवेह नीतिमानांना आधार देतात.

  9. जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही, कारण याहवेह त्याला आपल्या हाताने सावरतील.

  10. संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या मुलांची रचना. अलामोथ चालीवर आधारित. एक गीत. परमेश्वर आमचे आश्रय व सामर्थ्य आहेत; संकटात साहाय्य करण्यास ते सदा सिद्ध असतात.

  11. परमेश्वराने स्वतःला तिच्या राजमहालांमध्ये उंच आश्रयदुर्ग असे तिला प्रकट केले आहे.

  12. संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. दावीद शौलाच्या उपस्थितीपासून निसटून गुहेत लपून बसला त्या संदर्भाचे आहे. माझ्या परमेश्वरा, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा. कारण मी तुमचा आश्रय घेतला आहे; संकटे जाईपर्यंत मी तुमच्या पंखांच्या छायेखाली आश्रय घेईन.

  13. परंतु मी दररोज सकाळी तुमचे सामर्थ्य आणि तुमची दया यांची गीते गाईन, कारण माझ्या दुःखाच्या व संकटाच्या दिवसात तुम्ही माझे आश्रयदुर्ग आणि शरणस्थान आहात.

  14. फक्त तेच माझे खडक आणि माझे तारण; तेच माझा दुर्ग आहेत, माझे ढळणे अशक्य आहे.

  15. मी तुम्हाला बिलगून राहतो; तुमचा उजवा हात मला सावरून धरतो.

  16. ज्यांचा कोणी सहायक नाही अशा धावा करणार्‍या दुःखितांना तो मुक्त करेल.

  17. दुर्बल आणि दरिद्री यांची त्याला दया येवो; तो गरजवंताला मृत्यूपासून वाचवेल.

  18. तो त्यांना छळ आणि हिंसा यांच्यापासून वाचवेल, कारण त्यांचे जीवित रक्त मोलाचे आहे.

  19. खरोखर याहवेहच आमची संरक्षक ढाल आहेत, आणि आमचा राजादेखील इस्राएलचे पवित्र परमेश्वरच आहेत.

  20. कारण ते पारध्याच्या पाशापासून आणि प्राणघातक मरीपासून तुझे रक्षण करतील.

  21. ते आपल्या परांनी तुझ्यावर पाखर घालतील, त्यांच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल; त्यांचे सत्य तुझी ढाल व गड होईल.

  22. तुला अंधकाराच्या आतंकाचे भय वाटणार नाही, किंवा दिवसा सुटणार्‍या बाणांचेही नाही.

  23. अंधारात दबा धरून राहणार्‍या मरीचे, किंवा भर दुपारी येणार्‍या आपत्तीचेही भय वाटणार नाही.

  24. हजार लोक तुझ्याजवळ पडले, आणि दहा हजार तुझ्या उजव्या बाजूला पडले, तरी ती संकटे तुझ्या जवळदेखील येणार नाहीत.

  25. ते तुझा पाय कदापि घसरू देणार नाहीत; तुझे रक्षक डुलकीही घेत नाही.