मुख्य मजकुरावर जा

Protection बद्दल बायबलमधील वचने: Hosts

6 वचने · 57 पैलू

"Protection" साठी शोधा

Hosts बद्दल वचने

  1. ते त्यांचे सैनिक, मोठ्या संख्येने घोडे आणि रथ घेऊन समुद्र किनार्‍यावरील वाळूप्रमाणे एक मोठे सैन्य घेऊन बाहेर आले.

  2. हे सर्व राजे इस्राएलाशी लढण्यासाठी एकत्र आले व मेरोम सरोवरापाशी त्यांनी आपला तळ दिला.

  3. परंतु याहवेह यहोशुआला म्हणाले, “तू त्यांना भिऊ नकोस, कारण उद्या यावेळेस मी त्यांना मृत झालेले इस्राएलच्या हाती देईन. त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ जाळून टाक.”

  4. तेव्हा यहोशुआ आणि त्याचे सैन्य अकस्मात मेरोम सरोवराजवळ दाखल झाले आणि त्यांनी हल्ला केला.

  5. याहवेहने त्यांना इस्राएली लोकांच्या हाती दिले व त्यांनी शत्रूंचा सीदोन महानगरीपर्यंत व मिसरेफोत-मयिम या ठिकाणापर्यंत आणि पूर्वेस मिस्पेह खोर्‍यापर्यंत पाठलाग केला; अशा रीतीने या लढाईत शत्रूंचा एकही व्यक्ती जिवंत राहिला नाही.

  6. कोणताही राजा सैन्याच्या संख्येने विजय प्राप्त करतो असे नाही; कोणताही योद्धा आपल्या महान शक्तीने स्वतःचा बचाव करू शकतो असेही नाही.