Protection बद्दल बायबलमधील वचने: Defending them against their enemies
Defending them against their enemies बद्दल वचने
जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूशी युद्ध करण्यास जाल आणि तुमच्यासमोर घोडे व रथ आणि तुमच्या सैन्यापेक्षा फारच मोठे शत्रुसैन्य पाहाल, तेव्हा त्यांना घाबरू नका. कारण ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशातून सुखरुपपणे बाहेर आणले, ते याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाबरोबर असतील.
तुम्ही युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी, याजकाने पुढे यावे आणि सैन्याला सांगावे.
त्याने म्हणावे: “हे इस्राएली लोकहो, ऐका: जेव्हा आज तुम्ही लढण्यासाठी तुमच्या शत्रूविरुद्ध पुढे जात आहात; मन कचरू देऊ नका वा भयभीत होऊ नका; त्यांना घाबरू वा भिऊ नका.
कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाबरोबर जात आहेत. ते तुमच्यासाठी तुमच्या शत्रूविरुद्ध लढतील आणि तुम्हाला विजय प्राप्त करून देतील.”
सनातन परमेश्वर तुमचा आश्रय आहे, आणि सनातन बाहू तुझ्याखाली आहेत. तुझ्या शत्रूंना ते तुझ्यापुढून घालवून देतात, ‘त्यांचा नाश करा!’ असा ते आदेश देतात.
पश्चिमेकडील लोक याहवेहच्या नावाचे भय धरतील, आणि सूर्योदयाकडील लोक त्यांच्या वैभवाचा गौरव करतील. ज्याला याहवेहचा श्वास जोराने पुढे नेतो तसे ते कोंडलेल्या महापूरासारखे येतील.