मुख्य मजकुरावर जा

Protection बद्दल बायबलमधील वचने

128 वचने · 57 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुझे आता आणि सर्वकाळ येणे व जाणे, यावर याहवेह बारकाईने लक्ष ठेवतील.

  2. प्रवाशांचे आराधना गीत. ज्यांचा याहवेहवर विश्वास आहे, ते सीयोन पर्वतासारखे स्थिर आहेत, कारण ते कधीही ढळत नाहीत, तर सर्वकाळ टिकतात.

  3. यरुशलेमला वेष्टण करणारे पर्वत जसे तिचे रक्षण करतात, तसेच आता आणि सदासर्वकाळ, याहवेह आपल्या लोकांना वेष्टून त्यांचे रक्षण करतात.

  4. प्रवाशांचे एक आराधना गीत. शलोमोनाची रचना. याहवेहने घर बांधले नाही, तर बांधकाम करणार्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत; याहवेहने शहराचे रक्षण केले नाही, तर पहारेकर्‍यांचे जागणे व्यर्थ आहे.

  5. जे त्यांच्यावर प्रीती करतात, याहवेह त्या सर्वांचे रक्षण करतात, परंतु ते सर्व दुष्टांचा नायनाट करतील.

  6. तुम्ही अधिपतींवर भरवसा ठेवू नका; ते केवळ मानव आहेत; तारण करण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही.

  7. परंतु जे माझे ऐकतात ते सर्वजण सुरक्षित राहतील, आणि निर्भयतेने स्वस्थ जीवन जगतील.”

  8. तू जेव्हा विसावा घेशील, तेव्हा तुला भीती वाटणार नाही; जेव्हा तू झोपशील, तुला गोड झोप लागेल.

  9. कारण याहवेह तुझ्या बाजूला असतील आणि ते तुझा पाय पाशात अडकू देणार नाहीत.

  10. प्रकोपाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी असते, परंतु नीतिमत्व मृत्यूपासून सोडविते.

  11. जे आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, तो नाश पावतील, परंतु नीतिमान मनुष्य हिरव्या पानाप्रमाणे बहरेल.

  12. याहवेहचा आदर मनुष्याचा दृढ गड आहे, आणि त्याच्या मुलाबाळांना सुरक्षित आश्रयस्थान लाभते.

  13. याहवेहचे नाव बळकट दुर्ग आहे; नीतिमान तिकडे धाव घेतात आणि सुरक्षित राहतात.

  14. लढाईसाठी घोड्याला तयार केले आहे, परंतु विजय देणे याहवेहच्याच हाती असते.

  15. दिवसाच्या उष्णतेपासून ते एक आश्रय व सावली आणि वादळ व पावसापासून ते एक आश्रयस्थान आणि लपण्याचे ठिकाण असेल.

  16. एफ्राईमचे मस्तक शोमरोन आहे, आणि शोमरोनचा प्रमुख केवळ रमाल्याहचा पुत्र आहे. जर तुम्ही तुमच्या विश्वासामध्ये स्थिर राहिला नाही तर तुम्ही उभे राहणारच नाही.’ ”

  17. तुमची रणनीती तयार करा, परंतु ती उलथवून टाकली जाईल; तुमची योजना सुचवा, परंतु ती चालणार नाही, कारण परमेश्वर आमच्याबरोबर आहेत.

  18. तुम्ही गरिबांसाठी आश्रयस्थान असे आहात, गरजवंतासाठी त्यांच्या संकटातील आश्रयस्थान आहात, वादळामध्ये निवारा आहात आणि उष्णतेमध्ये सावली आहात. कारण निर्दयी लोकांचा श्वास हा भिंतीवर चालून येणाऱ्या वादळासारखा आहे,

  19. इजिप्तकडे, ज्यांनी दिलेली अभिवचने निरुपयोगी आहेत. म्हणून मी इजिप्तला निरुपयोगी राहाब म्हणतो.

  20. ज्याप्रमाणे पक्षी डोक्यावर घिरट्या घालतात, त्याप्रमाणे सर्वसमर्थ याहवेह यरुशलेमची ढाल होतील; ते तिला संरक्षण देऊन सोडवतील, ते त्यांना ओलांडून जातील आणि त्याला सोडवतील आणि त्याचा बचाव करतील.”

  21. प्रत्येकजण वाऱ्यापासून आश्रयस्थान आणि वादळापासून आश्रयस्थान, वाळवंटामध्ये असलेल्या पाण्याच्या प्रवाहासारखा आणि तहानलेल्या भूमीमध्ये मोठ्या खडकाच्या सावलीसारखा असेल.

  22. भिऊ नका, कारण मी तुम्हाबरोबर आहे; हिंमत खचू देऊ नका, कारण मी तुमचा परमेश्वर आहे. मी तुम्हाला समर्थ करेन व तुम्हाला मदत करेन; मी माझ्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुम्हाला उचलून धरेन.

  23. ते त्याला आपल्या खांद्यावर घेतात व वाहून नेतात; नंतर ते त्याला त्याच्या स्थानी ठेवतात, तेव्हा ते दैवत तिथेच राहते. त्या ठिकाणाहून त्याला हालता येत नाही. कोणी त्याचा धावा केला, तरी ते उत्तर देऊ शकत नाही; ते कोणालाही त्यांच्या संकटातून सोडवू शकत नाही.

  24. मी लज्जित होणार नाही, कारण सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात. म्हणूनच मी माझा चेहरा गारगोटीसारखा कठीण केला आहे आणि मी लज्जित होणार नाही, हे मला माहीत आहे.

  25. उठा, उठा, हे याहवेहच्या भुजा, सामर्थ्याचे वस्त्र परिधान करा. उठा, पूर्वी जसे जागे झाले होते, पुरातन पिढीत जसे उठले होते. नाईल नदीतील राहाब सर्पाचे तुकडे केले, ते तुम्हीच नाही का, त्या समुद्रातील राक्षसाचा छेद केला, ते तुम्हीच नाही का?