मुख्य मजकुरावर जा

Praise बद्दल बायबलमधील वचने

490 वचने · 106 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते आपल्या आज्ञा पृथ्वीवर पाठवितात; त्यांचा शब्द वायुवेगाने पसरतो.

  2. शुभ्र लोकरीसारख्या हिमाचा ते वर्षाव करतात आणि हिमकण जमिनीवर राखेसारखे विखुरतात.

  3. ते पृथ्वीवर गारांच्या खड्यांप्रमाणे वर्षाव करतात. त्यांच्या गोठविणार्‍या थंडीपुढे कोण टिकेल?

  4. परंतु नंतर ते उष्ण हवेला आज्ञा करतात, तेव्हा हिम वितळते आणि जलप्रवाह वाहू लागतो.

  5. त्यांनी आपले वचन याकोबाला विदित केलेले आहेत आणि विधी व नियम इस्राएलला स्पष्ट केले आहेत.

  6. इतर कोणत्याही राष्ट्राकरिता त्यांनी असे केले नाही; ते त्यांच्या आज्ञांबाबत अज्ञानी आहेत. याहवेहचे स्तवन करा.

  7. याहवेहचे स्तवन करा. आकाशमंडलातून त्यांचे स्तवन करा; ऊर्ध्वलोकी त्यांचे स्तवन करा.

  8. त्यांचे सर्व स्वर्गदूत, त्यांचे स्तवन करो; त्यांची सर्व स्वर्गीय सेना, त्यांचे स्तवन करो.

  9. सूर्य आणि चंद्रमा त्यांचे स्तवन करा; सर्व चमकत्या तारकांनो, त्यांचे स्तवन करा.

  10. हे सर्वोच्च आकाशांनो, आणि आकाशाच्याही वरील जलांनो, त्यांचे स्तवन करा.

  11. त्यांची निर्मिती याहवेहचे स्तवन करो, कारण त्यांनी आज्ञा दिली आणि ती अस्तित्वात आली.

  12. आणि त्यांनी त्यांची स्थापना सदासर्वकाळासाठी केली आहे— त्यांची राजाज्ञा कधीही रद्द केली जाणार नाही.

  13. पृथ्वीवर याहवेहचेच स्तवन होवो, खोल महासागर व त्यातील समस्त विशालकाय प्राण्यांनो,

  14. विजा व गारा, हिम व धुके, तसेच वादळी वारे, त्यांचे स्तवन करोत.

  15. अहो पर्वतांनो व सर्व टेकड्यांनो, फळझाडे व समस्त गंधसरू,

  16. हिंस्र पशू आणि सर्व गुरे, सूक्ष्म जीव व उडणारे पक्षी,

  17. पृथ्वीवरील राजे व सर्व राष्ट्रे, अहो अधिपती व त्यांच्या न्यायाधीशांनो,

  18. युवक व युवतींनो, वृद्ध व बालके.

  19. तुम्ही सर्व याहवेहचे स्तवन करा, कारण केवळ त्यांच्याच नामाला महिमा मिळो; त्यांचे ऐश्वर्य पृथ्वी आणि आकाशाहून महान आहे.

  20. त्यांनी त्यांच्या लोकांचे शिंग उभारले आहे, ते त्यांच्या सर्व नीतिमान भक्तांना, त्यांच्या अंतःकरणासमीप, त्यांना अत्यंत प्रिय अशा इस्राएली लोकांना स्तवन पात्र केले आहे. याहवेहचे स्तवन करा.

  21. याहवेहचे स्तवन करा. याहवेहसाठी एक नवे गीत गा, त्यांच्या भक्तांच्या सभेत त्यांची स्तुतिस्तोत्रे गायली जावोत.

  22. हे इस्राएला, आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव कर; अहो सीयोनकरांनो, आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावा.

  23. त्यांच्या गौरवार्थ नृत्य करीत, डफ आणि वीणा यांच्या संगीताच्या साथीवर स्तुती गा.

  24. कारण याहवेहला आपल्या लोकांमुळे संतोष होतो; ते नम्रजनांस विजयी करतात.

  25. या सन्मानामुळे त्यांचे सात्विक उल्लास करोत आणि आपल्या अंथरुणावर हर्षगीते गावोत.