Skip to content

Praise बद्दल बायबलमधील वचने

490 वचने · 106 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांच्या मुखात परमेश्वराची आराधना असो आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात धारण करून,

  2. राष्ट्रांसाठी त्यांनी नेमलेल्या शिक्षा अंमलात आणण्यास सिद्ध व्हावे;

  3. त्या राष्ट्रांच्या राजांना बेड्या घाला आणि त्यांच्या पुढार्‍यांना लोखंडी साखळदंडानी बांधा.

  4. त्यांना दिलेल्या शिक्षांची अंमलबजावणी करा. हाच याहवेहच्या विश्वासू लोकांचा गौरव आहे. याहवेहचे स्तवन करा.

  5. याहवेहचे स्तवन करा. त्यांच्या मंदिरात त्यांचे स्तवन करा; त्यांच्या विशाल आकाशात त्यांचे स्तवन करा;

  6. त्यांच्या सामर्थ्यवान कृत्याबद्दल त्यांचे स्तवन करा; त्यांच्या अद्वितीय थोरवीकरिता त्यांचे स्तवन करा;

  7. कर्णा वाजवून त्यांचे स्तवन करा; सतार व वीणा वाजवून त्यांचे स्तवन करा;

  8. डफ वाजवून व नृत्य करून त्यांचे स्तवन करा; तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्यांचे स्तवन करा.

  9. खणखणणारे टाळ वाजवून त्यांचे स्तवन करा; झणझणणार्‍या झांजा वाजवून त्यांचे स्तवन करा.

  10. प्रत्येक सजीव प्राणी याहवेहचे स्तवन करो. याहवेहचे स्तवन करा.

  11. आणि ते एकमेकांना म्हणत होते: “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वसमर्थ याहवेह आहेत; त्याच्या तेजाने सर्व पृथ्वी भरली आहे!”

  12. त्या दिवशी तुम्ही म्हणाल: “याहवेह, मी तुमची स्तुती करेन, जरी तुम्ही माझ्यावर रागावला होता, तरी तुमचा राग दूर झाला आहे आणि तुम्ही माझे सांत्वन केले आहे.

  13. निश्चितच परमेश्वर माझे तारण आहेत; मी भरवसा ठेवेन आणि घाबरणार नाही. याहवेह, याहवेह स्वतः माझे सामर्थ्य आणि माझे संरक्षण आहेत; ते माझे तारण झाले आहेत.”

  14. तारणाच्या विहिरींतून तुम्ही आनंदाने पाणी काढाल.

  15. त्या दिवशी तुम्ही म्हणाल: “याहवेहची स्तुती करा, त्यांच्या नावाची घोषणा करा; त्यांनी जे काही केले आहे ते राष्ट्रांमध्ये माहीत होऊ द्या, आणि असे घोषित करा की, त्यांचे नाव गौरवान्वित आहे.

  16. याहवेहसाठी गीत गा, कारण त्यांनी गौरवशाली कार्ये केली आहेत; हे सर्व जगाला माहीत करून द्या.

  17. सीयोनच्या लोकांनो, मोठ्याने गर्जना करा आणि आनंद गीते गा, कारण इस्राएलचे महान पवित्र परमेश्वर तुमच्यामध्ये आहेत.”

  18. ते हर्षाने आरोळ्या मारतील; आनंदाने गजर करतील, पश्चिमेकडून ते याहवेहच्या ऐश्वर्याची स्तुती करतील.

  19. म्हणून पूर्वेकडे याहवेहचा गौरव करा; समुद्राच्या बेटांवर, इस्राएलचे परमेश्वर याहवेहच्या नावाचा गौरव करा.

  20. पृथ्वीच्या दिगंतापासून आपण हे गाणे ऐकतो: “नीतिमान परमेश्वराचा गौरव असो.” पण मी म्हणालो, “माझा नाश होत आहे, माझा नाश होत आहे! माझा धिक्कार असो! फसवणूक करणारा विश्वासघात करतो! फसवणूक करून तो विश्वासघात करतो!”

  21. याहवेह तुम्ही माझे परमेश्वर आहात; मी तुम्हाला उंचावेन आणि तुमच्या नावाची स्तुती करेन, कारण परिपूर्ण विश्वासूपणाने तुम्ही अद्भुत गोष्टी केल्या आहेत, ज्या फार पूर्वीपासून योजलेल्या होत्या.

  22. आणि ज्यांना याहवेहने सोडविले, ते लोक परत येतील. ते हर्षगीते गात सीयोनात प्रवेश करतील; अनंतकाळचा उल्हास त्यांच्या मस्तकावर असेल. हर्ष व उल्हासाने ते भरून जातील, दुःख व शोक दूर पळून जातील.

  23. कारण अधोलोक तुमची स्तुती करू शकत नाही, मृत्यू तुमचे स्तुतिगान करू शकत नाही. जे खाली गर्तेत जातात ते तुमच्या विश्वासूपणाची आशा करू शकत नाहीत.

  24. जिवंत, जे जिवंत आहेत—ते तुमची स्तुती करतात, जसे मी आज करीत आहे; पालक त्यांच्या मुलांना तुमच्या विश्वासूपणाबद्दल सांगतात.

  25. याहवेहसाठी एक नवे गीत गा, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची स्तुतिस्तोत्रे गा, तुम्ही जे सागराच्या खोलात जाऊन राहता आणि त्यात असलेले सर्वकाही, तुम्ही बेटांनो व त्यावर राहणारे सर्वजण गीत गा.