Skip to content

Praise बद्दल बायबलमधील वचने

490 वचने · 106 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण आता त्यांनी त्यांच्या दासीच्या लीन अवस्थेकडे दृष्टी टाकली आहे. यापुढे सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील.

  2. कारण ज्या सर्वशक्तिमान परमेश्वराने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत, त्यांचे नाव पवित्र आहे.

  3. त्यांचे भय बाळगणार्‍यांवर त्यांची करुणा एका पिढीपासून दुसर्‍या पिढीपर्यंत टिकून राहते.

  4. त्यांनी आपल्या बाहूने महान कार्य केले आहेत; जे अंतर्मनातील विचारांमध्ये गर्विष्ठ आहेत, त्यांना त्यांनी विखुरले आहे.

  5. त्यांनी शासकांना त्यांच्या सिंहासनावरून खाली आणले आहे. पण नम्रजनांस उच्च केले आहे.

  6. भुकेल्यास त्यांनी उत्तम गोष्टींनी तृप्त केले आहे. परंतु श्रीमंतांना रिकामे पाठविले आहे.

  7. त्यांचा सेवक इस्राएलास दयाळू ते असल्याचे आठवून त्याला साहाय्य पाठविले,

  8. जसे आपल्या पूर्वजांना त्यांनी वचन दिले होते, ते अब्राहाम आणि त्यांच्या संततीवर सदासर्वकाळ राहील.”

  9. तत्क्षणी जखर्‍याहचे तोंड उघडले व त्याची जीभ मोकळी झाली आणि तो बोलू लागला व परमेश्वराची स्तुती करू लागला.

  10. नंतर बालकाचा पिता जखर्‍याह पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि भविष्यवाणी करू लागला:

  11. “प्रभूची स्तुती करा! इस्राएलाच्या परमेश्वराची स्तुती करा, कारण ते आपल्या लोकांकडे आले आहेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी खंडणी भरली आहे.

  12. त्यांनी आपला सेवक दावीदाच्या घराण्यातून आपल्यासाठी तारणाचे शिंग उभारले आहे.

  13. जसे त्यांनी फार पूर्वी आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते—

  14. आमच्या शत्रूपासून आणि आमचा द्वेष करणार्‍या सर्वांच्या हातातून आमचा उद्धार करावा,

  15. आमच्या पूर्वजांवर दया करावी आणि त्यांच्या पवित्र कराराची आठवण करावी.

  16. आणि त्यांनी आमचा पूर्वज अब्राहामाला शपथ देऊन वचन दिले:

  17. आमच्या शत्रूंच्या हातून आमची सुटका करावी, आणि समर्थ होऊन निर्भयतेने त्यांची सेवा करावी,

  18. पवित्रपणाने आणि नीतिमत्त्वाने आमचे सर्व दिवस त्यांच्यासमोर घालवावेत.

  19. अचानक त्या दूताबरोबर स्वर्गदूतांचा एक मोठा समूह त्यांना दिसला, ते परमेश्वराची स्तुती करीत म्हणाले,

  20. “सर्वोच्च स्वर्गामध्ये परमेश्वराला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्यांची कृपादृष्टी झाली आहे, त्यांना शांती असो.”

  21. मेंढपाळांना जे सांगण्यात आले होते, त्याप्रमाणे सर्वगोष्टी घडल्या व त्यांनी सर्वगोष्टी ऐकल्या व पाहिल्यानंतर ते परमेश्वराचे गौरव व स्तुती करीत परत गेले.

  22. तेव्हा शिमोनाने बाळाला आपल्या हातात घेतले आणि परमेश्वराची स्तुती करीत म्हटले:

  23. तिने त्यावेळी तिथे येऊन, परमेश्वराची उपकारस्तुती केली आणि जे यरुशलेमची सुटका होण्याची वाट पाहत होते त्या प्रत्येकाला त्या बाळाविषयी सांगू लागली.

  24. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की ज्या नव्याण्णव नीतिमान लोकांना पश्चात्तापाची गरज नाही, त्यांच्यापेक्षा पश्चात्ताप करणार्‍या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होतो.

  25. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, पश्चात्ताप करणार्‍या एका पाप्याबद्दल परमेश्वराच्या दूतांच्या समक्षतेत आनंद केला जातो.”