Skip to content

Praise बद्दल बायबलमधील वचने

490 वचने · 106 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. माझे मुख याहवेहची उपकारस्तुती करेल. प्रत्येक प्राणिमात्र त्यांच्या पवित्र नावाचे युगानुयुग गौरव करोत.

  2. याहवेहचे स्तवन करा. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर.

  3. आजीवन मी याहवेहचे स्तवन करेन; माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.

  4. तुम्ही अधिपतींवर भरवसा ठेवू नका; ते केवळ मानव आहेत; तारण करण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही.

  5. कारण जेव्हा त्यांचे प्राण जातात, त्यांचे शरीर भूमीत परत जाऊन मिळते; त्या दिवशी त्यांनी केलेल्या सर्व योजना नष्ट होतात.

  6. तो मनुष्य धन्य होय, ज्याचा साहाय्यकर्ता याकोबाचा परमेश्वर आहे, आणि ज्याची आशा याहवेह त्याच्या परमेश्वराच्या ठायी आहे,

  7. कारण त्यांनीच आकाश, पृथ्वी, सागर, आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले; ते सदासर्वदा विश्वासयोग्य आहेत.

  8. गरीब व गांजलेले यांना तेच योग्य न्याय देतात; तसेच भुकेल्यांस ते अन्न देतात; याहवेहच बंदिवानांना मुक्त करतात,

  9. ते आंधळ्यास दृष्टी प्रदान करतात, याहवेह ओझ्याखाली वाकलेल्यास उचलून उभे करतात, परमेश्वराला नीतिमान प्रिय आहेत.

  10. याहवेह निर्वासितांचे रक्षण करतात, आणि अनाथ व विधवा यांची काळजी घेतात, परंतु दुष्टांच्या योजना ते नष्ट करतात.

  11. याहवेह सर्वकाळ राज्य करतील, हे सीयोना, तुझे परमेश्वर पिढ्यान् पिढ्या राज्य करतील. याहवेहचे स्तवन करा.

  12. याहवेहचे स्तवन करा. परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गाणे किती मनोरम, किती यथार्थ आहे!

  13. यरुशलेम याहवेहची निर्मिती आहे; इस्राएलाच्या निर्वासितांचे तिथे पुनर्वसन करत आहेत.

  14. भग्नहृदयी लोकांना ते बरे करतात, आणि त्यांच्या जखमांवर पट्टी बांधतात.

  15. ते तार्‍यांची गणती करतात आणि त्यांनी प्रत्येकास नाव दिलेले आहे.

  16. ते अत्यंत महान आहेत आणि त्यांचे सामर्थ्य अमर्याद आहे; त्यांची बुद्धी अपरिमित आहे.

  17. याहवेह नम्रजनांस आधार देतात, परंतु दुर्जनास बहिष्कृत करतात.

  18. याहवेहच्या उपकारस्तुतीची गीते गा; वीणेच्या साथीवर आमच्या परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा.

  19. ते मेघांनी आकाश व्यापून टाकतात; पावसाच्या सरी भूमीवर पाठवितात आणि डोंगरावर हिरवे गवत रुजवितात.

  20. ते पशूंना त्यांचा आहार पुरवितात व हाक मारणार्‍या कावळ्यांच्या पिलांना अन्न देतात.

  21. घोड्यांचे बल त्यांना प्रसन्न करीत नाही, मानवाचे सामर्थ्यवान पायही त्यांना संतुष्ट करीत नाही.

  22. याहवेह त्यांचे भय बाळगणार्‍यांवर संतुष्ट असतात, तसेच जे त्यांच्या प्रेमदयेची आशा धरतात.

  23. यरुशलेम, याहवेहचा महिमा कर; सीयोने, आपल्या परमेश्वराची स्तुती कर.

  24. कारण त्यांनी तुझ्या वेशींचे स्तंभ बळकट केले आहेत आणि त्या नगरातील तुझ्या लोकांस आशीर्वाद दिला आहे.

  25. ते तुझ्या सर्व सीमांत शांतता प्रस्थापित करतात; ते उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतात.