मुख्य मजकुरावर जा

Music बद्दल बायबलमधील वचने

324 वचने · 57 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेहचे स्तवन करा. याहवेहच्या नामाचे स्तवन करा; तुम्ही, जे याहवेहचे सेवक आहात, ते सर्व याहवेहचे स्तवन करोत.

  2. व तुम्हीही, जे याहवेहच्या आवासात, आमच्या परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात सेवा करतात.

  3. याहवेहचे स्तवन करा, कारण ते चांगले आहेत; त्यांच्या नावाचा महिमा गा, कारण ते करणे मनोरम आहे.

  4. आम्ही बाबेलच्या नदीकाठावर बसलो आणि सीयोनाची आठवण करीत रडलो.

  5. आम्ही आमच्या वीणा वाळुंजाच्या फांद्यावर टांगल्या,

  6. कारण आम्हाला कैद करणाऱ्यांनी आम्हाला गात गाण्यास सांगितले, आमचा छळ करणार्‍यांनी आनंद गीते गाण्याची मागणी केली, ते म्हणाले, “आमच्या करमणुकी करिता सीयोनाचे एखादे गीत गाऊन दाखवा!”

  7. या परदेशात आमच्या याहवेहचे स्तवनगीत गाणे आम्हाला कसे शक्य आहे?

  8. हे यरुशलेम, मी तुला विसरलो, तर माझा उजवा हात त्याचे कौशल्य विसरो;

  9. जर मी यरुशलेमला माझा सर्वोच्च आनंद मानत नसेन, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.

  10. हे परमेश्वरा, मी तुमच्यासाठी एक नवे गीत गाईन; दशतंत्री वीणेवर मी तुमच्या स्तवनाचे संगीत बनवेन.

  11. याहवेहचे स्तवन करा. याहवेहसाठी एक नवे गीत गा, त्यांच्या भक्तांच्या सभेत त्यांची स्तुतिस्तोत्रे गायली जावोत.

  12. हे इस्राएला, आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव कर; अहो सीयोनकरांनो, आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावा.

  13. त्यांच्या गौरवार्थ नृत्य करीत, डफ आणि वीणा यांच्या संगीताच्या साथीवर स्तुती गा.

  14. त्यांच्या मुखात परमेश्वराची आराधना असो आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात धारण करून,

  15. याहवेहचे स्तवन करा. त्यांच्या मंदिरात त्यांचे स्तवन करा; त्यांच्या विशाल आकाशात त्यांचे स्तवन करा;

  16. त्यांच्या सामर्थ्यवान कृत्याबद्दल त्यांचे स्तवन करा; त्यांच्या अद्वितीय थोरवीकरिता त्यांचे स्तवन करा;

  17. कर्णा वाजवून त्यांचे स्तवन करा; सतार व वीणा वाजवून त्यांचे स्तवन करा;

  18. डफ वाजवून व नृत्य करून त्यांचे स्तवन करा; तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्यांचे स्तवन करा.

  19. खणखणणारे टाळ वाजवून त्यांचे स्तवन करा; झणझणणार्‍या झांजा वाजवून त्यांचे स्तवन करा.

  20. प्रत्येक सजीव प्राणी याहवेहचे स्तवन करो. याहवेहचे स्तवन करा.

  21. ज्याचे अंतःकरण दुःखाने भरले आहे, त्याच्यासाठी हर्षगीत गाणे, एखाद्याचे पांघरूण थंडीच्या दिवसात काढून घेणे, किंवा जखमेवर शिरका ओतणार्‍यासारखे आहे.

  22. मी स्वतःसाठी चांदी आणि सोन्याचा व राजांच्या व प्रांताच्या मौल्यवान वस्तूंचा मोठा संग्रह केला. मी गायक आणि गायिका ठेवल्या, तसेच उपपत्न्यांसाठी जनानखानाही तयार केला—जे मनुष्याचे हृदय हर्षित करते.

  23. माझ्या नेत्रांनी जे इच्छिले असे काहीही मी नाकारले नाही; माझ्या हृदयाला कोणत्याही सुखासाठी नकार दिला नाही. माझ्या सर्व कष्टसाध्य कार्याने माझे अंतःकरण हर्षित होत असे, हाच माझ्या सर्व परिश्रमांचा मोबदला होता.

  24. तरी जेव्हा माझ्या सर्व हस्तकृतीचे, आणि माझ्या कष्टसाध्य कार्याने मी काय मिळविले याचा मी आढावा घेतला, तर सर्वकाही व्यर्थ, वार्‍याचा पाठलाग करण्यासारखे होते; सूर्याखाली काहीच लाभले नाही.

  25. त्यांच्या मेजवानीत त्यांच्याकडे वीणा आणि सारंगी आहेत, वाद्ये आणि डफ आणि द्राक्षमद्य आहे, परंतु याहवेहनी केलेल्या कृत्यांकडे त्यांचे लक्ष नाही. याहवेहच्या हातांनी केलेल्या कार्यांचा ते आदर करीत नाहीत.