मुख्य मजकुरावर जा

Music बद्दल बायबलमधील वचने

324 वचने · 57 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “तुम्ही गिबियाहात शिंग फुंका, रामाह येथे कर्णा वाजवा. बेथ-आवेन येथे उंच आवाजात युद्धाची घोषणा करा; बिन्यामीन आमचे नेतृत्व करा.

  2. तुमच्या गीतांचा गोंगाट माझ्यापासून दूर ठेवा! मी तुमच्या वीणांचे संगीत ऐकणार नाही.

  3. तुम्ही वीणेच्या सुरावर निरर्थक गाणी गाता, आणि दावीदासारखे आहोत याची भ्रामक कल्पना करता.

  4. मी तुमचे धार्मिक उत्सव शोकामध्ये उलटवेन आणि तुमची सर्व गीते विलापात बदलून टाकीन. मी तुम्हा सर्वांना गोणपाट घालेन आणि तुमचे मुंडण करेन. मी तो काळ एकुलत्या एक मुलासाठी विलाप करण्यासारखा आणि त्याचा शेवट कडू दिवसासारखा करेन.

  5. सार्वभौम याहवेह माझे सामर्थ्य आहेत; मला उंची गाठण्यास समर्थ करण्यास ते माझी पावले हरणाच्या पावलांसारखी करतील. गायकवर्गाच्या संचालकास सूचना: हे कवन गाताना तंतुवाद्यांची साथ असावी.

  6. महाप्रतापी योद्धा जे रक्षणकर्ता आहेत, ते याहवेह तुझे परमेश्वर तुझ्यासह आहेत. त्यांना तुझ्यामुळे अत्यंत आनंद होतो; तुझ्यावरील प्रीतीमुळे ते तुजवर दोषारोपण करणार नाहीत. त्याऐवजी तुझ्याबद्दल ते गीत गाऊन उल्हास व्यक्त करतील.”

  7. येशू त्या सभागृहाच्या अधिकार्‍याच्या घरी आले, तेव्हा त्यांनी आकांत करणारा मोठा जमाव तिथे पाहिला. लोक बासरी वाजवून शोक करीत होते.

  8. “ ‘आम्ही तुमच्यासाठी बासरी वाजविली तरी तुम्ही नाचला नाही; आम्ही शोकगीत गाईले, तरी तुम्ही शोक केला नाही.’

  9. मग त्या सर्वांनी मिळून एक गीत गाईले आणि ते जैतुनाच्या डोंगराकडे गेले.

  10. “तेवढ्यात थोरला मुलगा शेतातील आपले काम आटोपून घरी आला आणि त्याला घरातून येणारे नृत्यसंगीत ऐकू आले.

  11. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला प्रार्थना करीत असताना आणि परमेश्वराचे गीत गात असताना इतर कैदी ते ऐकत होते.

  12. जर मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेमध्ये बोलत असलो, पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणार्‍या झांजेसारखा आहे.

  13. जर कर्णे स्पष्ट स्वर काढणार नाही, तर युद्धावर जाण्यासाठी तयारी कोण करेल?

  14. मी काय करावे? मी आत्म्याने प्रार्थना करेन, परंतु माझ्या बुद्धीनेही प्रार्थना करेन, मी आत्म्याने गीते गाईन व त्याचबरोबर बुद्धीनेही गीते गाईन.

  15. आत्म्याने प्रेरित स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते गाऊन एकमेकांशी बोला. भजने गाऊन व संगीताद्वारे तुमच्या मनापासून प्रभूची स्तुती करा.

  16. स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते, यांच्याद्वारे कृतज्ञ अंतःकरणातून परमेश्वराला गाणी गाऊन एकमेकांना पूर्ण सज्ञानाने शिकविताना आणि बोध देताना ख्रिस्ताचा संदेश तुम्हामध्ये विपुलतेने राहो.

  17. ते म्हणतात, “मी तुमचे नाव माझ्या बंधुभगिनींसमोर जाहीर करेन; मी मंडळीमध्ये तुमचे स्तवन गाईन.”

  18. कोकर्‍याने ती गुंडाळी घेतली, तेव्हा त्या चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजनांनी कोकर्‍याच्या पुढे दंडवत केले. त्या प्रत्येकाजवळ एकएक वीणा आणि धूपद्रव्याने भरलेले सोन्याचे धूपपात्र होते. यातील धूप म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना आहेत.

  19. ते नवे गीत गाऊ लागले. गीताचे शब्द असे: “ती गुंडाळी घ्यावयास व त्याचे शिक्के फोडून तो उघडण्यास तुम्ही पात्र आहात, कारण तुमचा वध करण्यात आला होता आणि तुम्ही आपल्या रक्ताने परमेश्वरासाठी प्रत्येक वंश, भाषा, लोक व राष्ट्रे विकत घेतले आहे,

  20. मग मी स्वर्गातून तो मोठ्या धबधब्याच्या गर्जनेसारखा आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटासारखा एक ध्वनी ऐकला. तो अनेक वीणावादक आपआपल्या वीणा वाजवित असल्यासारखा होता.

  21. लोकांचा हा अतिभव्य गायकवृंद परमेश्वराचे राजासन, चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजन यांच्यासमोर एक नवे गीत गात होता. पृथ्वीवरून खंडणी भरून सोडविलेल्या या 1,44,000 लोकांशिवाय दुसर्‍या कोणालाही हे गाणे शिकता येत नव्हते.

  22. मग माझ्यासमोर अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी मी पाहिले. पहिला पशू, त्याची मूर्ती, त्याची खूण व त्याच्या नावाची संख्या, या सर्वांवर विजय संपादन केलेले सर्वजण, काचेच्या समुद्राच्या किनारीवर उभे होते. सर्वांच्या हातात परमेश्वराने दिलेल्या वीणा होत्या.

  23. ते परमेश्वराचा सेवक मोशेचे आणि कोकर्‍याचे गीत गात होते: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा! तुमची कृत्ये थोर आणि अलौकिक आहेत! हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत!

  24. त्या नगरीत आता कर्णे, वीणा, बासरी, यांचा सूरही कधी ऐकू येणार नाही. तिथे कसल्याच प्रकारचे उद्योगधंदे पुन्हा आढळणार नाहीत. तिथे गिरणीचा आवाज पुन्हा ऐकू येणार नाही.