मुख्य मजकुरावर जा

Music बद्दल बायबलमधील वचने

324 वचने · 57 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. इजिप्त देशातून राजदूत येतील; कूश परमेश्वरापुढे नम्र होईल.

  2. पृथ्वीवरील राष्ट्रांनो, परमेश्वराचे गुणगान गा, प्रभूचे स्तवन करा, सेला

  3. अनादि काळापासून अत्युच्च आकाशात स्वारी करतात, ज्यांचा प्रचंड आवाज ढगांच्या गर्जनांसारखा आहे.

  4. परमेश्वराच्या सामर्थ्याची घोषणा करा; त्यांचे ऐश्वर्य इस्राएलवर प्रकाशित आहे; त्यांचे महान सामर्थ्य आकाशात आहे.

  5. परमेश्वरा, तुम्ही आपल्या पवित्रस्थानात भयावह आहात; इस्राएलचे परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य आणि बळ देतात. परमेश्वर धन्यवादित असो!

  6. माझ्या परमेश्वरा, मी सतारीवर तुमच्या विश्वासूपणाबद्दल तुमचे स्तवन करेन; हे इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरा, मी वीणेवर तुमची स्तुती गाईन.

  7. संगीत निर्देशकाकरिता. “गित्तीथ” वर आधारित. आसाफाची रचना. परमेश्वर, जे आमचे सामर्थ्य आहेत, त्यांच्यासाठी हर्षाने गा; याकोबाच्या परमेश्वरासाठी जयघोष करा!

  8. खंजिरीच्या तालावर संगीताचा प्रारंभ करा, वीणा व सतारीवर मधुर स्वर वाजवा.

  9. नवचंद्राच्या समयी आणि पौर्णिमेच्या सणांच्या दिवशी, आमच्या आनंदोत्सवाच्या वेळी कर्णा वाजवा;

  10. संगीत समारंभात ते गातील, “माझे सर्व झरे तुमच्यामध्येच आहेत.”

  11. एक स्तोत्र. एक गीत. शब्बाथ दिवसासाठी निर्धारित. याहवेहची स्तुती गाणे, आणि हे परात्परा, तुमच्या नावाची गीते गाणे उत्तम आहे.

  12. प्रातःकाळी तुमच्या करुणामय प्रीतीची, आणि सायंकाळी तुमच्या विश्वसनीयतेची घोषणा,

  13. दशतंत्री सारंगीच्या संगीताद्वारे, आणि वीणेच्या तालावर गायन-वादन करीत आहे.

  14. या हो या, आपण याहवेहचा जयजयकार करू या; आपल्या तारणाच्या खडकासाठी आनंदाने जयघोष करू या.

  15. कृतज्ञ अंतःकरणांनी त्यांच्यापुढे येऊ; आणि वाद्यसंगीतासह स्तुतिस्तोत्रे गाऊन स्तवन करू.

  16. एक स्तोत्र. याहवेहप्रीत्यर्थ एक नवे गीत गा, कारण त्यांनी अद्भुत कार्य केले आहे; त्यांच्या उजव्या हाताने व पवित्र बाहूंनी तारण मिळविण्याचे कार्य केले आहे.

  17. याहवेहने त्यांचे तारण सर्व पृथ्वीला दाखविले आहे, आणि राष्ट्रांसमक्ष आपली नीतिमत्ता प्रकाशित केली आहे.

  18. इस्राएलवरील त्यांची प्रीती आणि त्यांच्या विश्वसनीयतेचे त्यांना स्मरण झाले आहे; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आपल्या परमेश्वराने केलेले तारण पाहिले आहे.

  19. अगे पृथ्वी, याहवेहकरिता अत्यानंदाने हर्षोल्लास कर, संगीतासह उचंबळून हर्षगीत गा;

  20. वीणेवरील संगीताच्या साथीने याहवेहचे स्तवन करा, वीणेच्या तालात आणि गीतांच्या सुरात गा,

  21. शिंगे आणि कर्णे हर्षनादाचा गजर करोत— याहवेह जे राजा आहेत, यांच्यापुढे आनंदाचा जयघोष करा.

  22. महासागर व त्यामधील सर्व स्तुतीचा हर्षनाद करोत, तसेच पृथ्वी आणि त्यावर राहणारे सर्व प्राणीही करोत.

  23. नदीच्या लाटा टाळ्या वाजवोत, डोंगर व टेकड्या परमेश्वरासमोर हर्षगान करोत;

  24. मी आजीवन याहवेहचे स्तोत्र गाईन; माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या परमेश्वराचे स्तुतिगान करेन.

  25. त्यांची स्तुतिस्तोत्रे गा आणि त्यांचे स्तवन करा; त्यांच्या सर्व अद्भुत कार्याचे वर्णन करा.