Skip to content

Anger बद्दल बायबलमधील वचने

72 वचने · 38 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याचप्रमाणे, हनानीचा पुत्र येहू संदेष्ट्याच्या द्वारे याहवेहचे जे वचन बाशा व त्याच्या घराण्याकडे आले, कारण त्याने याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते केले व त्याने केलेल्या कृत्यांमुळे याहवेहचा क्रोध भडकविला, त्यामुळे यरोबोअमच्या घराण्यासारखे त्याचे झाले; आणि त्याचा नाश झाला.

  2. यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या सव्विसाव्या वर्षी, बाशाचा पुत्र एलाह तिरजाह येथे इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने दोन वर्षे राज्य केले.

  3. जिम्री, जो त्याच्या अधिकार्‍यांपैकी एक होता, जो त्याच्या निम्म्या रथांचा सेनापती होता, त्याने त्याच्याविरुद्ध कट रचला. एलाह त्यावेळी तिरजाह येथे, राजवाड्याचा अधिकारी अरजाच्या तिरजाह येथील घरी मद्यधुंद झाला होता.

  4. तेव्हा जिम्री आत आला व त्याच्यावर वार करून त्याला मारून टाकले आणि त्याचा उत्तराधिकारी म्हणून राजा झाला. यहूदीयाचा राजा आसाच्या सत्ताविसाव्या वर्षी असे झाले.

  5. तो राजा झाला व राजासनावर बसताच, त्याने बाशाच्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकले. कोणीही पुरुष, नातेवाईक किंवा मित्र त्याने जिवंत सोडला नाही.

  6. याप्रकारे बाशाविरुद्ध याहवेहचे जे वचन येहू संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले गेले होते त्यानुसार, जिम्रीने बाशाच्या संपूर्ण घराण्याचा नाश केला;

  7. कारण बाशाने व त्याचा पुत्र एलाहनी जी पापे केली आणि इस्राएली लोकांना देखील ती पापे करावयाला भाग पाडले होते, म्हणून त्यांनी त्यांच्या व्यर्थ मूर्तींमुळे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला होता.

  8. त्यांनी त्यांच्यावर आपला तीव्र राग, क्रोध, संताप आणि शत्रुत्व— आणि नाश करणारा देवदूतांचा एक गट सोडला.

  9. त्यांनी आपल्या क्रोधास मोकळी वाट करून दिली; त्यांनी त्यांचे जीव मृत्यूपासून वाचविले नाहीत, तर त्यांना पीडेच्या हवाली केले.

  10. याहवेह कृपावान व करुणामय आहेत, ते मंदक्रोध व प्रीतीने विपुल आहेत.

  11. ते सर्वदाच दोष देत राहणार नाहीत, व त्यांचा क्रोध सर्वकाळ टिकून ठेवत नाहीत.

  12. मनुष्याची सुज्ञता त्याला मंदक्रोधी राखते; आणि चुकांकडे दुर्लक्ष करणे त्याची प्रतिष्ठा असते.

  13. राजाचा क्रोध सिंहाच्या गर्जनेसारखा असतो, परंतु त्याची कृपादृष्टी गवतावरील दवबिंदूसारखी असते.

  14. तापट माणसांची मैत्री करू नका, जो शीघ्रकोपी आहे त्याच्याबरोबर राहू नका,

  15. नाहीतर तुम्ही त्यांचाच कित्ता गिरवाल, आणि तुम्ही स्वतःच आपला जीव पाशात घालाल.

  16. दगड जड आहे आणि वाळू वजनदार असते, परंतु मूर्खाने दिलेली चिथावणी या दोन्हींपेक्षाही जड असते.

  17. क्रोध क्रूर असतो आणि राग पूरासमान असतो; पण मत्सरापुढे कोण उभा राहू शकेल?

  18. टवाळी करणारे शहरात गोंधळ करतात, परंतु सुज्ञ लोक राग घालवून टाकतात.

  19. सुज्ञानी मनुष्य जर मूर्खाबरोबर न्यायालयात गेला, तर मूर्ख संतापतो आणि थट्टा करतो आणि तिथे शांतिभंग करतो.

  20. मी त्यांना कायमचे दोषी ठरविणार नाही, नेहमीच क्रोध प्रकट करणार नाही, नाहीतर मी प्रत्यक्ष माझ्या हातांनी घडवले लोक माझ्यामुळे मूर्छित होतील.

  21. मी त्यांच्या पापमय लोभामुळे संतापलो; आणि त्यांना ताडण केले व माझे मुख रागाने लपविले, तरी त्यांनी स्वेच्छेने करण्याचे सोडले नाही.

  22. “द्राक्षकुंड मी एकट्यानेच तुडविले; राष्ट्रातून माझ्यासोबत कोणी नव्हते. माझ्या क्रोधाने मी ती तुडविली आणि त्यांना आपल्या संतापाने चिरडले; त्यांचेच रक्त माझ्या वस्त्रांवर उडाले, म्हणून माझी सर्व वस्त्रे माखली.

  23. माझ्याकरिता तो सूड घेण्याचा दिवस होता; आणि ते उद्धार करण्याचे वर्ष आले होते.

  24. मी शोधले, परंतु तिथे साहाय्याला कोणीही नव्हते, कोणी मदतीला नसल्यामुळे मला धक्का बसला; तेव्हा माझ्या स्वतःच्या बाहूने माझ्याकरिता मी उद्धार मिळविला, आणि माझ्या स्वतःच्या क्रोधाने मला राखले.

  25. क्रोधाच्या भरात मी राष्ट्रांना तुडविले; माझ्या संतापाच्या भरात मी त्यांना मद्यधुंद केले आणि त्यांचे रक्त जमिनीवर ओतले.”