मुख्य मजकुरावर जा

Afflicted Saints बद्दल बायबलमधील वचने

122 वचने · 31 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी याहवेहविरुद्ध पाप केल्यामुळे, ते माझी बाजू ऐकून मला न्याय देईपर्यंत मी याहवेहचा कोप सहन करेन. ते मला प्रकाशात आणतील; आणि मी त्यांचे न्यायीपण पाहीन.

  2. याहवेह चांगले आहेत, संकटसमयी आश्रयस्थान आहेत. त्यांच्यावर भरवसा ठेवणार्‍या प्रत्येकाची ते काळजी घेतात.

  3. धन्य आहेत ते, जे शोकग्रस्त आहेत, कारण त्यांना सांत्वन मिळेल.

  4. “जे तुम्ही थकलेले आणि भाराक्रांत आहात, ते तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन.

  5. माझे जू आपणावर घ्या आणि माझ्याकडून शिका; कारण मी सौम्य व लीन मनाचा आहे आणि तुमच्या आत्म्याला विसावा मिळेल.

  6. कारण माझे जू हलके व माझे ओझे सहज पेलवणारे आहे.”

  7. प्रभूने तिला पाहिले, तेव्हा त्यांचे हृदय कळवळले आणि ते तिला म्हणाले, “रडू नकोस.”

  8. परंतु तुमच्या डोक्यावरील एका केसाचा देखील नाश होणार नाही.

  9. खंबीरपणे उभे राहा, म्हणजे जीवन मिळवाल.

  10. नंतर येशूंना तो मनुष्य मंदिरात आढळला आणि येशूंनी त्याला सांगितले, “पाहा, तू आता बरा झाला आहेस. येथून पुढे पाप करू नकोस, नाही तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”

  11. “तुमची हृदये अस्वस्थ होऊ देऊ नका. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा; आणि माझ्यावरसुद्धा विश्वास ठेवा.

  12. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही; मी तुमच्याकडे येईन.

  13. “मी या सर्वगोष्टी तुम्हाला सांगितल्या, ते यासाठी की माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी. या जगात तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. परंतु धीर धरा! कारण मी जगावर विजय मिळविला आहे.”

  14. “आणि आता, जसे आत्म्याद्वारे मला यरुशलेमकडे जाण्यास भाग पाडले जात आहे. तिथे माझ्याबाबतीत काय होणार आहे याची मला जाणीव नाही.

  15. मला माहीत आहे की प्रत्येक शहरामध्ये तुरुंगवास व यातना यांना मला तोंड द्यावे लागणार आहे, असा इशारा पवित्र आत्मा मला देत आहे.

  16. तरीपण, माझे जीवन माझ्याकरिता मोलाचे नाही; माझे एकच ध्येय आहे की धाव संपविणे व जे कार्य प्रभू येशूंनी मला दिले आहे ते पूर्ण करणे म्हणजे परमेश्वराने जी कृपा केली आहे, त्याची शुभवार्ता इतरांना सांगणे हे होय.

  17. पौल म्हणाला, “तुम्ही रडून माझे हृदय का तोडता? यरुशलेममध्ये केवळ तुरुंगात पडण्याचीच माझी तयारी नाही, तर प्रभू येशूंच्या नावासाठी मरण्यास देखील मी तयार आहे.”

  18. आशेमध्ये हर्षित, संकटात सहनशील आणि प्रार्थनेमध्ये विश्वासू असा.

  19. आमची निंदा होत असता, आम्ही ममतेने उत्तर देतो. तरीही या क्षणापर्यंत आम्ही जगाचा गाळ व केरकचरा असे झालो आहोत.

  20. ते आपल्या सर्व दुःखांमध्ये आपले सांत्वन करतात, यासाठी की जे सांत्वन आम्हाला परमेश्वराकडून मिळाले आहे, त्या सांत्वनाने जे कोणत्याही दुःखात आहेत त्यांचे सांत्वन करावे.

  21. ज्याप्रकारे आम्ही ख्रिस्ताच्या अगणित दुःखांमध्ये सहभागी आहोत, त्याच प्रकारे आमचे सांत्वनही ख्रिस्ताद्वारे विपुल होते.

  22. खरोखर आम्हाला मृत्यूची दंडाज्ञा ठरलेली आहे असे वाटले, हे यासाठी झाले की आम्ही केवळ स्वतःवर अवलंबून न राहता, जे मृतांना उठवितात त्या परमेश्वरावरच अवलंबून राहावे.

  23. त्यांनी आम्हाला मरणाच्या धोक्यातून सोडविले आणि ते पुन्हा आम्हाला असेच सोडवतील. आम्ही त्यांच्यावर आशा ठेवली आहे की ते आम्हाला असेच पुढेही सोडवित राहतील.

  24. आम्ही परमेश्वराचे सेवक या नात्याने सर्वप्रकारे आमची योग्यता पटवून देण्याचा प्रयत्न करतो: मोठ्या धैर्याने, दुःख, ओझे व संकटे आम्ही सहन करतो.

  25. आम्हाला मारहाण, तुरुंग, दंगल, कष्ट, जागरणे आणि उपवास;