मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मार्क १:३०सुमारे इ.स. २७

    तिथे शिमोनाची सासू तापाने फणफणली असून अंथरुणावर पडून होती आणि त्यांनी लगेच तिच्याबद्दल येशूंना सांगितले.

  2. मार्क १:३१सुमारे इ.स. २७

    येशू तिच्याजवळ गेले आणि त्यांनी तिचा हात धरून तिला उठविले. तेव्हा एकाएकी तिचा ताप नाहीसा झाला आणि ती त्यांची सेवा करू लागली.

  3. मार्क १:३२सुमारे इ.स. २७

    त्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी लोकांनी येशूंकडे सर्व रोग्यांना आणि भूतग्रस्तांना आणले.

  4. मार्क १:३३सुमारे इ.स. २७

    संपूर्ण शहर दारात गोळा झाले होते,

  5. मार्क १:३४सुमारे इ.स. २७

    तेव्हा येशूंनी वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांनी ग्रासलेल्या पुष्कळांना बरे केले व अनेक दुरात्म्यांना हाकलून दिले, परंतु दुरात्म्यांना बोलण्यास सक्त मनाई केली, कारण ते कोण आहेत, हे त्यांना माहीत होते.

  6. मार्क १:३५सुमारे इ.स. २७

    अगदी पहाटेस, अंधार असताना, ते उठले आणि घर सोडून एकांतस्थळी गेले आणि तिथे त्यांनी प्रार्थना केली.

  7. मार्क १:३६सुमारे इ.स. २७

    शिमोन व त्याचे सोबती त्यांना शोधीत तिथे गेले.

  8. मार्क १:३७सुमारे इ.स. २७

    ते सापडल्यावर ते त्यांना म्हणाले, “सर्वजण तुमचा शोध करीत आहे!”

  9. मार्क १:३८सुमारे इ.स. २७

    येशूंनी म्हटले, “आपण दुसरीकडे कुठेतरी आसपासच्या गावात जाऊ म्हणजे मला तिथे प्रवचन देता येईल कारण त्यासाठीच मी आलो आहे.”

  10. मार्क १:३९सुमारे इ.स. २७

    मग ते सर्वत्र गालील प्रांतात प्रवास करीत, त्यांच्या सभागृहांमध्ये उपदेश करीत आणि दुरात्म्यांना बाहेर काढीत फिरले.

  11. मार्क १:४०सुमारे इ.स. २७

    एक कुष्ठरोगी येशूंकडे आला आणि गुडघे टेकून विनंती करून म्हणाला, “तुमची इच्छा असेल तर मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात.”

  12. मार्क १:४१सुमारे इ.स. २७

    येशूंना कळवळा आला. त्यांनी आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो!”

  13. मार्क १:४२सुमारे इ.स. २७

    त्याचा कुष्ठरोग निघून गेला आणि तो शुद्ध झाला.

  14. मार्क १:४३सुमारे इ.स. २७

    येशूंनी त्याला निक्षून सांगितले:

  15. मार्क १:४४सुमारे इ.स. २७

    “पाहा हे कोणाला सांगू नकोस. परंतु जा, स्वतःस याजकाला दाखव आणि मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे, कुष्ठरोग बरे झाल्यानंतर जे अर्पण करावयाचे असते, ते कर, म्हणजे तू शुद्ध झाला आहेस याचे हे प्रमाण प्रत्येकाला पटेल.”

  16. मार्क १:४५सुमारे इ.स. २७

    याउलट, त्याने ही बातमी जाहीरपणे सांगून पसरविली की त्यामुळे येशूंना उघडपणे गावात प्रवेश करता येईना, म्हणून ते एकांतस्थळी राहिले. पण तिथेही चहूकडून लोक त्यांच्याकडे आले.

  17. मार्क २:१सुमारे इ.स. ३१

    काही दिवसानंतर, जेव्हा येशू कफर्णहूम या ठिकाणी पुन्हा आले, तेव्हा लोकांनी ऐकले की ते घरी आले आहेत.

  18. मार्क २:२सुमारे इ.स. ३१

    ते इतक्या मोठ्या संख्येने जमले की जागा उरली नाही, दाराबाहेरही जागा उरली नाही आणि येशूंनी वचनातून लोकांना उपदेश केला.

  19. मार्क २:३सुमारे इ.स. ३१

    तेवढ्यात काही लोक एका पक्षघाती मनुष्याला त्यांच्याकडे घेऊन आले, त्याला चार जणांनी उचलून आणले.

  20. मार्क २:४सुमारे इ.स. ३१

    आणि तिथे मोठी गर्दी असल्यामुळे ते त्या मनुष्याला येशूंजवळ घेऊन जाऊ शकले नाहीत, तेव्हा त्यांनी येशू जिथे बसले होते त्या ठिकाणचे छप्पर उघडले आणि तिथून त्या मनुष्याला त्याच्या अंथरुणासहित खाली सोडले

  21. मार्क २:५सुमारे इ.स. ३१

    जेव्हा येशूंनी त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा ते त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”

  22. मार्क २:६सुमारे इ.स. ३१

    हे ऐकून तिथे बसलेले काही नियमशास्त्र शिक्षक आपसात विचार करू लागले,

  23. मार्क २:७सुमारे इ.स. ३१

    “हा मनुष्य अशाप्रकारे का बोलतो? तो दुर्भाषण करतो! परमेश्वराशिवाय पापांची क्षमा कोण करू शकतो?”

  24. मार्क २:८सुमारे इ.स. ३१

    ते काय विचार करीत आहेत, हे येशूंनी लगेच त्यांच्या आत्म्यामध्ये ओळखले आणि ते त्यांना म्हणाले, “तुम्ही या गोष्टींचा असा विचार का करता?

  25. मार्क २:९सुमारे इ.स. ३१

    या पक्षघाती मनुष्याला ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपले अंथरूण उचलून घे व चालू लाग’? यातून काय म्हणणे सोपे आहे.