मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहूदीया प्रांतातील आणि सर्व यरुशलेमातील लोक त्याच्याकडे आले. त्यांनी पापे कबूल केल्यानंतर, यार्देन नदीमध्ये योहानाकडून त्यांचा बाप्तिस्मा होत असे.

  2. योहान उंटाच्या केसांपासून तयार केलेल्या कापडाचा झगा घालीत असे, कंबरेला चामड्याचा पट्टा बांधत असे. तो टोळ आणि रानमध सेवन करीत असे.

  3. त्याचा संदेश हा होता: “माझ्यानंतर एकजण येत आहे, जे माझ्यापेक्षा फार सामर्थ्यवान आहेत व त्यांच्या पादत्राणाचे बंद सोडणारा एक गुलाम होण्याची सुद्धा माझी पात्रता नाही.

  4. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करतील.”

  5. त्यावेळी येशू गालील प्रांतातील नासरेथ गावातून आले आणि योहानाने यार्देन नदीत त्यांचा बाप्तिस्मा केला.

  6. येशू पाण्यातून बाहेर येत होते त्याचवेळेस, आकाश उघडलेले आणि आत्मा कबुतरासारखा त्यांच्यावर उतरत आहे असे त्यांनी पाहिले

  7. त्याचवेळी स्वर्गातून एक वाणी झाली: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी संतुष्ट आहे.”

  8. नंतर लगेच पवित्र आत्म्याने त्यांना अरण्यात पाठविले,

  9. रानात चाळीस दिवस असताना, सैतानाने त्यांची परीक्षा घेतली. त्यांच्या सोबतीला जंगली प्राणी होते आणि देवदूतांनी त्यांची सेवा केली.

  10. मार्क १:१४सुमारे इ.स. २७

    योहानाला बंदिवासात टाकल्यानंतर, परमेश्वराच्या शुभवार्तेची घोषणा करीत येशू गालील प्रांतात आले.

  11. मार्क १:१५सुमारे इ.स. २७

    ते म्हणाले, “वेळ आली आहे,” व “परमेश्वराचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि शुभवार्तेवर विश्वास ठेवा!”

  12. मार्क १:१६सुमारे इ.स. २७

    एके दिवशी येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन पेत्र आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना सरोवरात जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते.

  13. मार्क १:१७सुमारे इ.स. २७

    येशू त्यांना म्हणाले, “चला, माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन.”

  14. मार्क १:१८सुमारे इ.स. २७

    लगेच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले.

  15. मार्क १:१९सुमारे इ.स. २७

    थोडे पुढे जाताच, त्यांनी जब्दीचे पुत्र याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना होडीत बसून आपली जाळी तयार करताना पाहिले.

  16. मार्क १:२०सुमारे इ.स. २७

    त्यांनी उशीर न करता त्यांना बोलाविले, तेव्हा ते आपला पिता जब्दी याला नावेमध्ये मजुरांबरोबर सोडून त्यांच्यामागे गेले.

  17. मार्क १:२१सुमारे इ.स. २७

    ते कफर्णहूम येथे गेले, आणि शब्बाथ आला तेव्हा सभागृहामध्ये जाऊन शिक्षण देण्यास सुरुवात केली.

  18. मार्क १:२२सुमारे इ.स. २७

    त्यांच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण ते नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे नव्हे तर ज्याला अधिकार आहे असे त्यांना शिकवीत होते.

  19. मार्क १:२३सुमारे इ.स. २७

    इतक्यात, सभागृहामध्ये अशुद्ध आत्म्याने पछाडलेला एक मनुष्य ओरडला,

  20. मार्क १:२४सुमारे इ.स. २७

    “हे नासरेथकर येशू, तुम्हाला आमच्याशी काय काम? तुम्ही आमचा नाश करावयास आले काय? तुम्ही कोण आहात हे मला माहीत आहे—परमेश्वराचा पवित्रजन आहेस!”

  21. मार्क १:२५सुमारे इ.स. २७

    “गप्प राहा!” येशूंनी धमकाविले, “यातून बाहेर ये!”

  22. मार्क १:२६सुमारे इ.स. २७

    त्या अशुद्ध आत्म्याने किंकाळी फोडली आणि त्या मनुष्याला पिळवटून तो त्याच्यामधून निघून गेला.

  23. मार्क १:२७सुमारे इ.स. २७

    हे पाहून सर्व लोक चकित झाले आणि आपसात म्हणू लागले, “हे काय आहे? नवी शिकवण आणि काय हा अधिकार! ते अशुद्ध आत्म्यांना आदेश करतात आणि ते त्यांची आज्ञा पाळतात.”

  24. मार्क १:२८सुमारे इ.स. २७

    त्यांच्याबद्दलची बातमी पूर्ण गालील प्रांताच्या सर्व भागात झपाट्याने पसरत गेली.

  25. मार्क १:२९सुमारे इ.स. २७

    सभागृहातून बाहेर पडल्याबरोबर ताबडतोब, याकोब व योहानासह शिमोन व आंद्रियाच्या घरी गेले.