मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मत्तय २७:४१सुमारे इ.स. ३३

    त्याचप्रमाणे प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक यांनीही त्यांची थट्टा केली.

  2. मत्तय २७:४२सुमारे इ.स. ३३

    ते म्हणाले, “त्याने दुसर्‍यांचे तारण केले, पण त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही. तो इस्राएलाचा राजा आहे! मग त्याला क्रूसावरून खाली उतरून येऊ दे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू.

  3. मत्तय २७:४३सुमारे इ.स. ३३

    तो परमेश्वरावर भरवसा ठेवतो. मग परमेश्वराची इच्छा असल्यास त्याने त्याची सुटका करावी, कारण तो म्हणाला होता की, ‘मी परमेश्वराचा पुत्र आहे.’ ”

  4. मत्तय २७:४४सुमारे इ.स. ३३

    त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळलेल्या त्या चोरांनीही त्यांचा अपमान केला.

  5. मत्तय २७:४५सुमारे इ.स. ३३

    त्या दिवशी दुपारपासून तीन वाजेपर्यंत सर्व प्रांतावर अंधार पडला.

  6. मत्तय २७:४६सुमारे इ.स. ३३

    दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास येशूंनी मोठ्याने आरोळी मारली, “एली, एली,लमा सबकतनी,” म्हणजे, “माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला?”

  7. मत्तय २७:४७सुमारे इ.स. ३३

    तिथे उभे असलेल्या काही लोकांनी हे ऐकले व ते म्हणाले की तो, “एलीयाहला बोलावित आहे.”

  8. मत्तय २७:४८सुमारे इ.स. ३३

    लागलीच त्यांच्यापैकी एकाने धावत जाऊन शिरक्यात भिजविलेला एक स्पंज काठीवर ठेवून येशूंना प्यावयास दिला,

  9. मत्तय २७:४९सुमारे इ.स. ३३

    इतर म्हणाले, “त्याला एकटे सोडा. एलीयाह त्याला खाली उतरावयास व तारावयास येतो की काय हे आपण पाहू!”

  10. मत्तय २७:५०सुमारे इ.स. ३३

    मग येशूंनी पुन्हा एकदा मोठी आरोळी मारली आणि आपला प्राण सोडला.

  11. मत्तय २७:५१सुमारे इ.स. ३३

    त्याच क्षणाला, पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला, पृथ्वी हादरली, खडक फुटले

  12. मत्तय २७:५२सुमारे इ.स. ३३

    आणि कबरा उघडल्या. मृत पावलेल्या अनेक पवित्र लोकांची शरीरे पुन्हा उठविली गेली.

  13. मत्तय २७:५३सुमारे इ.स. ३३

    येशूंच्या पुनरुत्थानानंतर ते कबरेच्या बाहेर आले आणि पवित्र शहरात गेले आणि पुष्कळ लोकांनी त्यांना पाहिले.

  14. मत्तय २७:५४सुमारे इ.स. ३३

    जेव्हा शताधिपतीने आणि त्याच्याबरोबर येशूंवर पहारा करणारे रोमी शिपायांनी भूकंप आणि घडलेल्या इतर सर्वगोष्टी पाहिल्या, तेव्हा ते अत्यंत भयभीत झाले आणि त्यांनी उद्गार काढले, “खरोखरच हा परमेश्वराचा पुत्र होता!”

  15. मत्तय २७:५५सुमारे इ.स. ३३

    अनेक स्त्रिया हे दुरून पाहत होत्या. त्या गालील प्रांतातून येशूंची सेवा करीत त्यांच्यामागे आल्या होत्या.

  16. मत्तय २७:५६सुमारे इ.स. ३३

    त्या स्त्रियांमध्ये मरीया मग्दालिया; याकोब व योसेफ यांची आई मरीया आणि जब्दीचे पुत्र याकोब व योहानाची आई होती.

  17. मत्तय २७:५७सुमारे इ.स. ३३

    संध्याकाळ झाली असताना, येशूंचा अनुयायी झालेला, अरिमथिया शहराचा योसेफ नावाचा एक श्रीमंत मनुष्य,

  18. मत्तय २७:५८सुमारे इ.स. ३३

    पिलाताकडे गेला व त्याने येशूंचे शरीर मागितले आणि पिलाताने ते त्याला देण्यात यावे अशी आज्ञा दिली.

  19. मत्तय २७:५९सुमारे इ.स. ३३

    योसेफाने येशूंचे शरीर घेतले, एका स्वच्छ तागाच्या वस्त्रात गुंडाळले,

  20. मत्तय २७:६०सुमारे इ.स. ३३

    आणि खडकात खोदलेल्या आपल्या मालकीच्या एका नव्या कबरेमध्ये ते ठेवले. कबरेच्या दाराशी त्याने एक मोठी शिला लोटून ठेवली. नंतर तो तिथून निघून गेला.

  21. मत्तय २७:६१सुमारे इ.स. ३३

    मरीया मग्दालिया आणि दुसरी मरीया या दोघीजणी कबरेसमोर बसल्या होत्या.

  22. मत्तय २७:६२सुमारे इ.स. ३३

    सणाच्या तयारीच्या दुसर्‍या दिवशी, वल्हांडण सणाचा पहिला दिवस संपताना, प्रमुख याजकवर्ग आणि परूशी लोक पिलाताकडे गेले.

  23. मत्तय २७:६३सुमारे इ.स. ३३

    “महाराज,” ते म्हणाले, “आम्हाला आठवण आहे की तो लबाड जिवंत असताना म्हणाला होता की, ‘तीन दिवसानंतर मी पुन्हा जिवंत होईन’

  24. मत्तय २७:६४सुमारे इ.स. ३३

    यास्तव त्याची कबर तीन दिवसापर्यंत सुरक्षित ठेवण्याचा हुकूम आपण द्यावा. नाही तर त्याचे शिष्य येऊन शरीर चोरून नेतील आणि तो पुन्हा जिवंत झाला आहे, असे लोकांना सांगतील. असे झाले तर ही शेवटची फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.”

  25. मत्तय २७:६५सुमारे इ.स. ३३

    पिलाताने उत्तर दिले, “सैनिकांना घ्या, तुमच्याने होईल तसा कबरेचा बंदोबस्त करा.”