circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मत्तय २६:६६सुमारे इ.स. ३३
तुम्हाला काय वाटते?” “तो मृत्युदंडास योग्य आहे.” त्यांनी ओरडून प्रत्युत्तर दिले.
- मत्तय २६:६७सुमारे इ.स. ३३
मग ते येशूंच्या तोंडावर थुंकले आणि त्यांना बुक्क्या मारल्या. काहींनी त्यांच्या तोंडात चपराका मारल्या,
- मत्तय २६:६८सुमारे इ.स. ३३
आणि म्हटले, “ख्रिस्ता, आम्हासाठी भविष्यवाणी करा. तुम्हाला कोणी मारले?”
- मत्तय २६:६९सुमारे इ.स. ३३
हे सर्व होत असताना, पेत्र अंगणात बाहेर बसला होता आणि एक दासी त्याच्याकडे आली व ती त्याला म्हणाली, “तू गालीलकर येशूंबरोबर होतास.”
- मत्तय २६:७०सुमारे इ.स. ३३
परंतु पेत्राने सर्वांच्यासमोर नकार दिला. तो म्हणाला, “तू कशाबद्दल बोलतेस हे मला समजत नाही.”
- मत्तय २६:७१सुमारे इ.स. ३३
मग तो बाहेरील आवाराच्या दाराजवळ गेला, तिथे त्याला दुसर्या एका दासीने पाहिले आणि ती लोकांना म्हणाली, “हा मनुष्य नासरेथच्या येशूंबरोबर होता.”
- मत्तय २६:७२सुमारे इ.स. ३३
या खेपेसही पेत्र नाकारून आणि शपथ घेऊन म्हणाला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही!”
- मत्तय २६:७३सुमारे इ.स. ३३
थोड्या वेळाने जी माणसे तिथे उभी होती, ती पेत्राला म्हणाली, “तू खरोखर त्यांच्यापैकीच आहेस हे आम्हाला माहीत आहे. तुझ्या भाषा-शैलीवरून आम्ही हे सांगू शकतो.”
- मत्तय २६:७४सुमारे इ.स. ३३
हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” तेवढ्यात कोंबडा आरवला.
- मत्तय २६:७५सुमारे इ.स. ३३
त्याच क्षणाला पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “पेत्रा, कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” पेत्र दूर निघून गेला आणि अतिशय दुःखाने रडला.
- मत्तय २७:१सुमारे इ.स. ३३
प्रातःकाळ झाल्यावर सर्व महायाजक आणि लोकांच्या वडीलजनांनी येशूंचा वध कसा करता येईल याची योजना केली.
- मत्तय २७:२सुमारे इ.स. ३३
सभेनंतर त्यांनी येशूंना बंदिस्त करून रोमी राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले.
- मत्तय २७:३सुमारे इ.स. ३३
ज्या यहूदाहने, त्यांचा घात केला होता, त्याने पाहिले की येशूंना दोषी ठरविण्यात आले, तेव्हा त्याला खेद झाला आणि त्याने चांदीची तीस नाणी महायाजक व वडीलजन यांच्याकडे परत केली.
- मत्तय २७:४सुमारे इ.स. ३३
“मी पाप केले आहे.” तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताचा विश्वासघात केला आहे.” “त्याचे आम्हाला काय? तू स्वतःच त्याला जबाबदार आहेस,” त्यांनी प्रत्युत्तर केले.
- मत्तय २७:५सुमारे इ.स. ३३
यावर त्याने ते पैसे मंदिरात फेकून दिले आणि बाहेर जाऊन गळफास घेतला.
- मत्तय २७:६सुमारे इ.स. ३३
महायाजकांनी ते पैसे गोळा केले आणि ते म्हणाले, “हे पैसे आपल्याला मंदिराच्या खजिन्यात भरता येणार नाहीत, हे नियमाविरुद्ध आहे. कारण हे रक्ताचे पैसे आहेत.”
- मत्तय २७:७सुमारे इ.स. ३३
म्हणून त्या पैशात परदेशी लोकांच्या दफनासाठी कुंभाराचे शेत विकत घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
- मत्तय २७:८सुमारे इ.स. ३३
यामुळे त्या शेताला रक्ताचे शेत असे आजपर्यंत म्हणतात.
- मत्तय २७:९सुमारे इ.स. ३३
हे शेत विकत घेण्याच्या घटनेने यिर्मयाह संदेष्ट्याची भविष्यवाणी पूर्ण झाली. ती अशी: “त्यांनी चांदीची तीस नाणी घेतली आणि इस्राएली लोकांनी त्याचे मोल ठरविले,
- मत्तय २७:१०सुमारे इ.स. ३३
आणि प्रभूने मला आज्ञा दिल्याप्रमाणे, त्यांनी कुंभाराचे शेत विकत घेण्यासाठी त्यांचा उपयोग केला.”
- मत्तय २७:११सुमारे इ.स. ३३
येशू राज्यपालाच्या पुढे उभे होते आणि राज्यपालाने त्यांना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हटले तसे.”
- मत्तय २७:१२सुमारे इ.स. ३३
महायाजक आणि यहूदी पुढाऱ्यांनी येशूंवर अनेक आरोप केले त्यावेळी येशू अगदी शांत राहिले.
- मत्तय २७:१३सुमारे इ.स. ३३
“हे लोक तुझ्यावर अनेक गोष्टींचा दोषारोप करीत आहेत, हे तू ऐकत नाही काय?” पिलाताने येशूंना विचारले,
- मत्तय २७:१४सुमारे इ.स. ३३
परंतु येशूंनी एकाही आरोपाचे उत्तर दिले नाही. राज्यपालासाठी ही खूप आश्चर्यचकित गोष्ट होती.
- मत्तय २७:१५सुमारे इ.स. ३३
आता सणामध्ये जमावाच्या निवडीनुसार एका कैद्याला सोडून देण्याची राजपालांची प्रथा होती.