मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मत्तय २६:४१सुमारे इ.स. ३३

    तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे.”

  2. मत्तय २६:४२सुमारे इ.स. ३३

    येशू पुन्हा गेले आणि प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, जर हा प्याला मी प्याल्याशिवाय दूर करता येणार नसेल, तर तुमच्या इच्छेप्रमाणे होवो.”

  3. मत्तय २६:४३सुमारे इ.स. ३३

    नंतर ते परत त्यांच्याकडे आले, त्यावेळीही ते झोपी गेलेले आढळले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते.

  4. मत्तय २६:४४सुमारे इ.स. ३३

    म्हणून ते प्रार्थना करण्यासाठी परत गेले आणि पुन्हा त्यांनी तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली.

  5. मत्तय २६:४५सुमारे इ.स. ३३

    नंतर ते शिष्यांकडे परत आले आणि त्यांना म्हणाले, “तुम्ही अजूनही झोप व विसावा घेत आहात काय? पाहा, वेळ आली आहे आणि मानवपुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे.

  6. मत्तय २६:४६सुमारे इ.स. ३३

    उठा, आपण जाऊ! माझा विश्वासघात करणारा आला आहे.”

  7. मत्तय २६:४७सुमारे इ.स. ३३

    येशू बोलत आहेत तोच, त्यांच्या बारा पैकी एक, यहूदाह तिथे पोहोचला. त्याच्याबरोबर महायाजक आणि वडीलजनांनी पाठविलेला मोठा जमाव तरवारी आणि सोटे घेऊन आला होता.

  8. मत्तय २६:४८सुमारे इ.स. ३३

    आता विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा.”

  9. मत्तय २६:४९सुमारे इ.स. ३३

    तत्क्षणी यहूदाह येशूंच्या जवळ गेला, “सलाम, रब्बी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले.

  10. मत्तय २६:५०सुमारे इ.स. ३३

    येशू त्याला म्हणाले, “मित्रा, ज्या कामासाठी तू आला आहेस ते आटोपून घे.” मग त्या पुरुषांनी पुढे येऊन येशूंना धरले आणि अटक केले.

  11. मत्तय २६:५१सुमारे इ.स. ३३

    तेवढ्यात येशूंच्या बरोबर जे होते, त्यांच्यातील एकाने तरवार उपसली आणि महायाजकाच्या दासाचा कान कापून टाकला.

  12. मत्तय २६:५२सुमारे इ.स. ३३

    तत्काळ येशू त्यांना म्हणाले, “तुझी तलवार म्यानात घाल,” कारण “तलवार उपसणारे तलवारीनेच मारले जातील.

  13. मत्तय २६:५३सुमारे इ.स. ३३

    मी माझ्या पित्याला विनंती केली तर, ते देवदूतांच्या बारापेक्षा अधिक सैन्यतुकड्या ताबडतोब पाठविणार नाहीत काय?

  14. मत्तय २६:५४सुमारे इ.स. ३३

    पण मी तशी विनंती केली तर जे काही घडत आहे, त्याविषयाचे धर्मशास्त्रात लिहिलेले भविष्य कसे पूर्ण होईल?”

  15. मत्तय २६:५५सुमारे इ.स. ३३

    त्यावेळी येशू जमावाला म्हणाले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय, की तुम्ही तरवारी आणि लाठ्या घेऊन मला धरावयास आला आहात? मी दररोज मंदिराच्या परिसरात बसून शिकवीत असे, पण त्यावेळी तुम्ही मला धरले नाही.

  16. मत्तय २६:५६सुमारे इ.स. ३३

    यासाठी की संदेष्ट्यांनी लिहिलेल्या शास्त्राप्रमाणे होण्यासाठीच हे सर्व घडत आहे.” मग सर्व शिष्य त्यांना एकट्याला सोडून पळून गेले.

  17. मत्तय २६:५७सुमारे इ.स. ३३

    येशूंना अटक करून त्यांना महायाजक कयफा याच्याकडे नेले; त्या ठिकाणी सर्व वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक एकत्र झाले होते.

  18. मत्तय २६:५८सुमारे इ.स. ३३

    परंतु पेत्र काही अंतरावरून त्यांच्यामागे चालत, महायाजकाच्या अंगणात आला. त्याने प्रवेश केला आणि पहारेकर्‍यांसोबत जाऊन काय होते ते पाहत बसला.

  19. मत्तय २६:५९सुमारे इ.स. ३३

    मुख्य याजक आणि सर्व यहूदी न्यायसभा येशूंना जिवे मारण्यासाठी खोटे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करीत होते.

  20. मत्तय २६:६०सुमारे इ.स. ३३

    परंतु अनेक खोटे साक्षीदार पुढे आले तरी ते त्यांना सापडले नाही. शेवटी दोन माणसे पुढे आली,

  21. मत्तय २६:६१सुमारे इ.स. ३३

    “हा मनुष्य म्हणाला, ‘मी परमेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यास व तीन दिवसात ते पुन्हा बांधण्यास समर्थ आहे.’ ”

  22. मत्तय २६:६२सुमारे इ.स. ३३

    हे ऐकून महायाजक उभा राहिला आणि त्याने येशूंना म्हटले, “या आरोपांना तू उत्तर देणार नाही काय? हे लोक जी साक्ष तुझ्याविरुद्ध सांगत आहेत ती काय आहे?”

  23. मत्तय २६:६३सुमारे इ.स. ३३

    पण येशू शांत राहिले. नंतर महायाजकाने त्यांना विचारले, “जिवंत परमेश्वराच्या नावाने शपथ घालून मी तुला विचारतो की, परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस का?”

  24. मत्तय २६:६४सुमारे इ.स. ३३

    येशूंनी उत्तर दिले, “असे तुम्ही म्हणता, परंतु मी तुम्हा सर्वांना सांगतो की येथून पुढे तुम्ही मला, अर्थात् मानवपुत्राला, सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशातून मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहाल.”

  25. मत्तय २६:६५सुमारे इ.स. ३३

    येशूंचे हे उद्गार ऐकल्याबरोबर महायाजकाने आपली वस्त्रे फाडली आणि तो ओरडला, “याने ईश्वरनिंदा केली आहे! आता आणखी साक्षीदारांची आपल्याला गरजच काय? पाहा, तुम्ही ईश्वरनिंदा ऐकली आहे.